दातांचा पिवळेपणा जाण्यासाठी घरगुती उपाय Yellowing Teeth In Marathi

Yellowing Teeth In Marathi बऱ्याच लोकांचे दात पिवळे झालेले आपल्याला दिसतात. त्यांचे ते पिवळे दात बघून आपल्याला मळमळ झाल्यासारखं वाटतं. जर तुमचेही दात पिवळे असतील तर आम्ही तुमच्याकरिता खास घरगुती उपाय दात पांढरे करण्यासाठी घेऊन आलो आहोत. बऱ्याचदा वाईट खाण्याच्या सवयीमुळे दात पिवळे होतात. बऱ्याच लोकांना चहा, कॉफी, कोल्ड्रिंक, तंबाखू, गुटखा, दारू असे पिण्याचे किंवा खाण्याचे शोक असतात. त्यामुळे त्यांच्या दातांवर या सर्व पदार्थांचा परिणाम होत असतो. परिणामी त्यांचे दात पिवळे होतात किंवा काळे पडतात. बऱ्याचदा दात स्वच्छ न घासल्यामुळे देखील पिवळे झाल्याचे आपल्याला दिसतात.

Yellowing Teeth In Marathi

दातांचा पिवळेपणा जाण्यासाठी घरगुती उपाय Yellowing Teeth In Marathi

दातांचा नैसर्गिक शुभ्र रंग निघून जाण्याचं सर्वात मोठं कारण हेच असतं अनेक चुकीच्या गोष्टींचा वापर दातांवर चमक आणण्यासाठी बरेच उपाय तुम्ही करू शकता. बरेच लोक दवाखान्यामध्ये जाऊन आपले दात स्वच्छ करून आणतात, त्यामध्ये पैसा खूप जातो.

दात स्वच्छ करण्याच्या नादामध्ये दात आणखी खराब होत जातात. दातांवर वाढत्या वयामुळे येनामेल कधी जमा होतो हे कळत नाही, त्यामुळे दात पिवळे दिसतात. त्या व्यतिरिक्त शरीरातील व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे देखील दात पिवळे होतात. बऱ्याचदा दात स्वच्छ करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल व पेस्ट वापरले जाते, त्यामुळे सुद्धा दात खराब होतात. दात खराब होण्याची कारणे आपण जाणून घेऊया.

दात पिवळे होण्याची अनेक कारणे आहेत. बऱ्याचदा काही लोक चहा, कॉफी किंवा थंड पेय यांचे जास्त सेवन करतात, त्यामुळे दात पिवळे होतात.

तसेच जास्त चॉकलेट, गोडपदार्थ, धूम्रपान करणे, तंबाखू किंवा गुटखा यांचे सेवन केल्यामुळे सुद्धा दातांना पिवळेपणा येतो.

वाढते वय झाल्यास देखील दात पिवळे पडू शकतात. बऱ्याचदा अनुवंशिकतेनुसार दात पिवळे असू शकतात.

तोंडात काही जखमा झाल्या असेल तर सुद्धा त्याचा परिणाम दातावर होतो.

जर तुम्ही दात स्वच्छ करत नसाल तर दात पिवळे होतात. त्यामुळे तोंडाची स्वच्छता करणे गरजेचे असते.

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय :

केळीची साल : केळ सर्वांच्या परिचयाचा आहे, केळ्यांच्या सालीचा उपयोग आपण दात स्वच्छ करण्यासाठी करू शकतो. केळ्यांच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे दाताचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची साल उपयोगी पडते. केळी खाल्ल्यानंतर त्याची साल न फेकता त्याची साल जर आपल्या दातांवर घातली तर काही आठवड्यातच तुमचे दात स्वच्छ व पांढरे होतील. हा उपाय तुम्हाला किमान आठवड्यातून दोन वेळा करायचा आहे.

स्ट्रॉबेरी : दातावरील पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरीचा देखील उपयोग करू शकता. स्ट्रॉबेरी नैसर्गिकरीत्या अँटिऑक्सिडेंट आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी आपल्या दातांवर घासल्यामुळे दातांवरील पिवळेपणा दूर होतो.

बेकिंग सोडा : बेकिंग सोडा आणि लिंबू यांची मिश्रण तयार करून त्यांची व्यवस्थित पेस्ट बनवा. ही पेस्ट टूथब्रशवर घेऊन काही मिनिटे आपले दात स्वच्छ करा. या उपायामुळे तुमचे दात मोत्यासारखे चमकतील.

सफरचंद : सफरचंदाचा उपयोग दात स्वच्छ ठेवण्याकरिता बऱ्याचदा केला जातो. दररोज सफरचंदाच्या दोन फोडी तुम्ही चघळल्या तर तुमचे दात स्वच्छ व पांढरे होण्यास मदत होते. दातातील काळेपणा निघून जातो तसेच दात तेवढे होत नाही. जर तुम्ही गाजर आणि काकडी भरपूर प्रमाणात खात असाल तर त्यापासून देखील दात स्वच्छ राहतात. दातांवर पिवळा पणा येत नाही.

तुळशीची पाने : तुळशीच्या पानांचा उपयोग तुम्ही दात स्वच्छ करण्याकरिता करू शकता. कृतीमध्ये अनेक बॅक्टेरिया विरोधक असे घटक गुणधर्म आहेत. त्यामुळे तुमचे दात चमकदार बनवण्यासाठी मदत होईल. तुळशीच्या पानांचा कसा उपयोग करायचा तर तुळशीचे पाने सुकवल्यानंतर ती बारीक करून मोहरीच्या तेलात मिसळून घ्या आणि ते दातांवर लावा तसेच तुम्ही दातांसाठी तुळशीच्या वाढलेल्या पानांची पावडर देखील वापरू शकता. तुळशीची पावडर व संत्र्याची साल सोलून मिक्स करून दातांवर ब्रश केल्यामुळे देखील दातावरील पिवळेपणा दूर होतो.

खोबरेल तेल : दात स्वच्छ करण्याकरता तुम्ही खोबरेल तेल सुद्धा वापरू शकता. पाच मिनिटांसाठी दातांवर खोबरेल तेल लावा व तुमच्या टूथब्रशवर देखील खोबरेल तेलाचे काही थेंब टाका आणि नंतर ब्रश करा असे आपण दररोज केले तर लवकरच आपल्या दातांवरील पिवळेपणा दूर होईल.

लिंबाची साल : लिंबाच्या सालीचा उपयोग तुम्ही दातावरील पिवळेपणा घालवण्यासाठी करू शकता. कारण लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते आणि हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग असतात. त्यामुळे तुमचे दात स्वच्छ होऊ शकतात. तुमच्या दातांवर लिंबाची साल चोळा व नंतर स्वच्छ धुवा तसेच लिंबाच्या सालीचे तुम्ही पावडर देखील तयार करू शकता आणि टूथब्रशवर घेऊन दात घासा काही मिनिटातच तुमचे दात पांढरे शुभ्र होतील.

पाणी : दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही साध्या पाण्याचा देखील वापर करू शकता. साधे पाणी तुमचे दात स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर तुमच्या आरोग्यासाठी पाण्याचे खूप फायदे असतात. दात पाण्याने स्वच्छ धुत रहा त्यामुळे दातांवरील आंबटपणाचा प्रभाव देखील कमी होतो. दातावरील इतर पदार्थ खाल्ल्यामुळे जमा होणारा थर घाणेरडापणा बाहेर काढण्याचे काम स्वच्छ पाणी करते. त्यामुळे तुम्ही काहीही खाल्ल्यानंतर अधून- मधून दिवसभरात पाण्याने चुळ भरा. शक्य झाल्यास जेवण झाल्यानंतर ब्रश करणे फायदेशीर ठरेल. त्यामुळे तुमच्या दातांवर इतर घटकांचा थर जमा होणार नाही. परिणामी दात स्वच्छ राहतील.

तर अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी साध्या सोप्या उपायांमुळे आपले दात पांढरे शुभ्र करू शकता. ह्याव्यतिरिक्त जर तुम्हाला दात स्वच्छ करण्याचे असतील आणि वरील पदार्थांची एलर्जी असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment