वजन वाढलंय चिंता करू नका…! आम्ही तुमच्याकरिता खास घेऊन आलो आहोत वजन कमी करण्याचे उपाय…Weight Loss Tips In Marathi

Weight Loss Tips In Marathi हल्ली मानवाचे जीवन खूपच धावपळीचे झाले असून त्यामध्ये माणूस व्यस्त होत चाललेला आहे. त्याची पूर्ण जीवनशैली बदलून गेली आहे. वेळेवर झोप न घेणे, वेळेवर जेवण न करणे, व्यायाम न करणे याचा परिणाम मानवी जीवनावर होत असल्याचे आपल्याला दिसून येतो. हा परिणाम म्हणजे व्यक्तीचे वजन अचानक वाढू लागते. शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होते. वाढलेली अतिरिक्त चरबी आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या समस्या उद्भवण्यास कारणीभूत ठरते. एकदा जर वजन वाढली तर ते वजन कमी करणे खूपच कठीण होते.

वजन वाढलंय चिंता करू नका…! आम्ही तुमच्याकरिता खास घेऊन आलो आहोत वजन कमी करण्याचे उपाय…Weight Loss Tips In Marathi

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी अन्न खूपच कमी प्रमाणात खातात किंवा जेवण कमी करतात. मात्र याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर होतो. जेवण कमी केल्याने वजन कमी होत नाही. त्या उलट आपल्या शरीराला मिळणारे प्रोटीन देखील कमी होते. त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो.

वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत व कोणते पदार्थ खाऊ नये. हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. या खास जीवनशैलीमध्ये मनुष्य कृत्रिम रित्या बनवलेले पदार्थ जास्त प्रमाणात खात आहे. त्यामध्ये अनेक कंपन्यांनी वर्चस्व गाजवले आहे. त्यामध्ये पौष्टिक घटक आहे किंवा नाही. याचा देखील आपण विचार करत नाही. असे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो.

एकदा शरीरामध्ये चरबीचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली तर मधुमेह, उच्च रक्त हृदयविकार अशा जीवघेण्या आजार आपल्याला होऊ शकतात. जर आपल्याला या आजारातून वाचायचे असेल तर योग्य वेळी आपण वजन कमी करायला हवेत. तर चला मग जाणून घेऊया. वजन वाढल्यामुळे कोणकोणते नुकसान होईल? वजन कमी करण्यासाठी कोण कोणते उपाय करावेत.

वजन वाढल्यामुळे होणारे नुकसान काय आहे ते जाणून घेऊया :

शरीराचे वाढते वजन ही आजची सर्वात मोठी समस्या झाली आहे. वजन वाढल्यामुळे केवळ आजारच होत नाही तर तुमच्या दिसण्यावरही वाईट प्रभाव पडतो. वजन वाढण्याची अनेक कारणे आहेत.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच तणाव इत्यादी कारणही वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी उपाशी राहून शरीराला नुकसान पोहोचवितात. तर चला मग जाणून घेऊया अशी कोणती कारणे आहेत, ज्यामुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

टेन्शन : शरीराचा जाडपणा आरोग्यासाठी धोकादायक आहे. तसेच बरेच लोकांना जाडपणामुळे टेन्शन येऊ शकतो. त्यांना डिप्रेशनचा देखील सामना करावा लागतो. म्हणून आपण वेळीच लठ्ठपणावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

स्लिप एपनिया : शरीर लठ्ठ झाल्यामुळे जेव्हा तुम्ही खाली वाकता तेव्हा छातीत किंवा मानेत जमा झालेल्या अतिरिक्त मासांमुळे तुमची श्वसनलिका दाबली जाते. त्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होते. झोपताना शरीरात योग्य प्रमाणात हवा न पोहोचल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते.

कोलेस्ट्रॉल : तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते आणि जर शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असेल तर तुम्हाला हृदय विकाराचा धोका होऊ शकतो.

मधुमेह : मध्यम स्वरूपाचे जाडेपणा आल्यामुळे देखील टाईप 2 चा डायबिटीस होण्याची शक्यता असते.

त्वचारोग : लठ्ठपणामुळे तुमच्या शरीरातील संतुलन बिघडून तुमची त्वचा प्रभावित होऊ शकते. या कारणांनी त्वचेवर काळे डाग येऊ शकतात.

वाढत चाललेल्या वजन हे आईच्या गर्भावस्थेच्या काळापासून असू शकतात. गर्भावस्थेतील अति पौष्टिक आहार देखील जन्मानंतरच्या वाढलेल्या वजनात कारणीभूत ठरू शकते.

वजन कमी करण्यासाठी खाली काही उपाय दिलेले आहेत ते जाणून घ्या :

भरपूर पाणी पिणे :
तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला शरीरात पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासेल. पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया सुरळीत राहते. शरीरामध्ये होणारे हलचल खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे आपल्या पचनक्रिया सुधारल्या जाऊ शकतात. यामुळे अन्नपचन होऊन आपले आरोग्य चांगले राहते.

शक्य असल्यास पायी चालणे किंवा सायकलचा उपयोग करणे :
वजन कमी करण्याचा आणखी दुसरा एक उपाय म्हणजे आपल्याला शक्य असेल तेथे आपण पायी चालावे किंवा सायकलचा उपयोग करावा. यामुळे आपल्या शरीराचा व्यायाम होतो. यामुळे आपले शरीर स्वस्थ राहते.

गोड पदार्थ खाणे टाळा :
शक्य असेल तेवढे गोड पदार्थ खाणे टाळावे. आपल्याला जर आपल्या शारीरिक वजन कमी करायचे असेल तर फायबर युक्त पदार्थ खाणे कमी करणे खूप गरजेचे आहे. साखरेचे पदार्थ कमी प्रमाणात खायला पाहिजे. जास्त प्रमाणात साखर खाल्ली गेली तर आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढवून वाढीसाठी साखर प्रभावी ठरते. त्यामुळे साखर किंवा गोड पदार्थ खूप कमी खायला पाहिजे.

जेवण झाल्यानंतर ओवा खा :
वजन कमी करण्यासाठी जेवण झाल्यानंतर ओव्याचे सेवन करा. त्यामुळे आपले अन्नपचन होते व शरीराला देखील अन्न पचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते.

पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय :

वजन वाढीबरोबर तर पोटाची चरबी वाढली असेल तर ती कमी करण्यासाठी आपल्याला काही पथ्य पाळावे लागेल. दिवसातून दोन ते तीन वेळा जेवण करणे गरजेचे राहते. आपण दिवसातून एकदाच भरपूर जेवण करणे हे चुकीची पद्धत आहे. त्यामुळे एकत्रितपणे न खाता तेवढेच अन्न दोन ते तीन वेळा खायला पाहिजे.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळी गरम पाणी पिणे :
रोज सकाळी उठल्याबरोबर दात न घासता एक ग्लास गरम पाण्यामध्ये लिंबू व मध मिक्स करून पिणे आवश्यक आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी गरम पाणी अत्यंत फायदेशीर आहे.

मॉर्निंग वॉक करणे :
पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळच्या शुद्ध हवेत फिरणे अत्यंत आवश्यक आहे. शुद्ध हवेतील पूर्णपणे आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक मिळतात. त्यामुळे शारीरिक ऊर्जा प्राप्त होते ते आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते.

रात्री झोपण्याच्या तीन तास अगोदर जेवण करणे :
तुमच्या पोटाची चरबी वाढली असेल किंवा तुमची वजन वाढले असेल तर रात्री झोपण्याच्या तीन तास अगोदर जेवण करणे आवश्यक आहे. जेवण झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे फिरायला जा. त्यामुळे जेवण पचायला सोपे होते.

चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे :
पोटावरची किंवा शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत लाभदायक आहे. दररोज अर्धा ते एक तास योगा करणे उत्तम आहे. व्यायाम केल्यामुळे अनावश्यक चरबी निघून जाण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा :
पोटावरची किंवा शरीरावरचे अतिरिक्त चरबी कमी करायचे असेल तर आपल्या आहारामध्ये फळभाज्या, कोबी, काकडी, सफरचंद, पपई, पेरू इत्यादी फळे खाणे अत्यंत गरजेचे आहे.

मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment