Water Health Benefits In Marathi उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी पिण्याचे कोण नाही म्हणणार परंतु थंड पाणी पिणे खरंच आपल्या आरोग्यासाठी आरोग्यदायी आहे किंवा नाही हे आज आपण बघणार आहोत. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे आणि त्यामुळे ऊन खूप तापते. अशातच आपल्या शरीराला सातत्याने खूप तहान लागत असते.
कोणते पाणी पिणे आरोग्यासाठी योग्य आहेत? जाणून घ्या त्याविषयी माहिती Water Health Benefits In Marathi
शरीर पाण्याची मागणी करत असताना उन्हातून आल्यानंतर आपण थंड फ्रीजमधील किंवा माठातील पाणी पीत असतो. थंड पाणी पिल्यामुळे आपली तहान भागते व जीवाला शांतता देखील लाभते. परंतु जास्त थंड पाणी तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.
जास्त थंड पाणी तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करू शकते. उन्हाळ्यात लोकांनी जास्त पाणी प्यावे परंतु पाणी कसे आणि कोणते प्यावे याची खबरदारी मात्र तुम्हालाच घ्यायची आहे. नैसर्गिकरित्या थंड झालेले पाणी मानवी शरीरासाठी आरोग्यदायी ठरू शकते.
आपण दिवसभरात किती पाणी प्यायला हवे ?
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही किंवा वारंवार पाणी पिण्याची समस्या ही आपल्याला उद्भवणार नाही. म्हणजे शरीर हायड्रेट राहण्यासाठी दिवसभरात कमीत कमी तीन लिटर पाणी पिणे आरोग्यदायी मानले जाते. जी लोक शारीरिक कष्टाची कामे करत असतात, त्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लिटर पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे असते, मात्र अन्य ऋतूंमध्ये पाणी आठवणीने प्यावे लागते.
माणसाला निरोगी आरोग्य जगायचे असेल तर दिवसभरात जवळपास आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्यापैकी बरीच लोक असे आहेत की, वातावरणात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जेवढी तहान लागते त्यांना तितकंच पाणी प्यावं. तर काही लोक शरीराला लागणाऱ्या तहानेच्या तुलनेत अधिक प्रमाणात पाणी पितात. कारण हे सर्व शरीर रचनेनुसार गरज असू शकते. कारण यावर आरोग्याशी संबंधित अन्य घटक देखील असू शकतात.
अति थंड पाणी पिल्यामुळे काय होते ?
अति थंड पाणी पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. कारण हे पाणी पिल्यामुळे शरीरांमध्ये अन्न व्यवस्थित पचत नाही, पोटामध्ये बिघाड होतात. त्यामुळे तुम्ही नेहमी सामान्य तापमान असलेले पाणी पिणे हेच सर्वोत्तम ठरेल.
उन्हाळ्यात काही जणांना गरम पाणी प्यायल्याने त्रास होऊ शकतो. अशातच जर तुम्ही गरम पाणी प्यायल्यास उलटी सुद्धा होऊ शकते. याउलट थंड पाणी पिल्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल परंतु या दिवसात जास्त थंड पाणी पिल्यामुळे ही पचनक्रियेमध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो.
पाणी कमी पिल्यास काय होईल ?
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप ऊन तापतं, त्यामुळे एखाद्या ठिकाणी तुम्हाला थंड पाणी मिळाले तर तुम्ही खूप आनंदी होता व थंड पाणी पिता; परंतु हे थंड पाणी तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्त्वाचं असतं.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे देखील आरोग्याविषयीच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर थंड पाणी पिणे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे सामान्य तापमान किंवा नैसर्गिकरित्या थंड झालेले पाणी आपल्या शरीरासाठी पुरेसे आहे.
पाणी कमी पिल्यामुळे देखील आपल्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शरीर थंड ठेवण्यासाठी पाणी नियमित पिणे आरोग्यदायी राहते. तर चला मग जाणून घेऊया थंड पाणी पिण्याचे तोटे.
थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला सर्दी फ्लूची समस्या होऊ शकते. बऱ्याच लोकांना थंड पाणी पचत नाही अशातच तुम्ही थंड पाणी पिले तर शरीराच्या इतर अवयवांना देखील हानी पोहोचू शकते. तसेच थंड पाणी पिल्यामुळे श्वसन समस्या देखील निर्माण होऊ शकते.
थंड पाणी पिणे टाळावे. यामुळे सर्दीशी संबंधित समस्या देखील तुम्हाला होऊ शकतात. बऱ्याचदा थंड पाणी पिल्यामुळे तुम्हाला डोकेदुखी देखील होऊ शकते. थंड पाणी पिल्याने मायग्रेनची समस्या वाढू शकते.
ज्याप्रमाणे थंड पाणी पिण्याचे तोटे आहेत त्याचप्रमाणे थंड पाणी पिण्याचे फायदे देखील आहेत. थंड पाणी पिणे केवळ हानिकारकच आहे असे म्हणणे देखील योग्य नाही कारण अनेक परिस्थितीमध्ये त्याचे फायदे देखील आपल्याला दिसून येतात.
व्यायाम करताना जर आपण थंड पाणी पिले तर शरीराचे तापमान खूप जास्त वाढण्यापासून रोखू शकते. त्यामुळे थंड पाणी पिण्याचे फायदे आहे. थंड पाणी पिण्याचे फायदे असले तरी देखील शरीरासाठी अति थंड पाणी पिणे नुकसानदायी असते.
कसे पाणी पिणे शरीरासाठी योग्य राहील?
थंडीच्या दिवसांमध्ये तर आपण थंड पाणी पिणे टाळतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मात्र आपण थंड पाणी पिणेच पसंत करतो. ही सवय तुम्हाला बदलायला हवी. कोमट पाणी पिणे तुमच्या शरीराला फायदेशीर असते. कारण कोमट पाणी पिल्यामुळे रक्तभिसरण क्रिया व पचनक्रिया सुरळीत चालते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर टाकले जातात.
कोमट पाणी पिल्याने तहान कमी लागते उन्हाळ्यात सामान्य पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. दिवसभरात पाणी पिणे आवश्यक असते; परंतु पाण्याची मात्रा लिटरमध्ये लक्षात ठेवणे आपल्याला अवघड जात असेल तर आपण कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी दिवसभरात पिणे आवश्यक आहे.
पाणी पिणे हे आपण ज्या वातावरणामध्ये राहता, त्यावर अवलंबून असते. आपल्या शरीराच्या आवश्यक कार्यासाठी पाणी आवश्यक असते. मात्र ज्या लोकांना कोरड्या त्वचेची समस्या, मधुमेह, यूरिन इन्फेक्शन, डीहायड्रेशन व कोरड्या त्वचेची समस्या आहेत, अशा लोकांनी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर तुम्ही सुद्धा योग्य पाणी पिले पाहिजे तसेच पाण्याचे प्रमाण तुम्ही राहता त्या वातावरणानुसार ठरविले पाहिजे.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.