Stomach Pain Problem In Marathi पोट दुखीचा त्रास हा लहानपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. पोटदुखीचा शक्यतो त्रास हा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जाणवतो. पावसाळ्यामध्ये पोटांच्या त्रासाचे अनेक पेशंट आपल्याला दिसतील किंवा इतर ऋतूमध्ये देखील पोटदुखीचा त्रास दिसून येतो. परंतु पोट दुखीचा नेमकं कारण काय आहे? हे लवकर लक्षात येत नाही. लहान मुलांच्या बाबतीत त्यांच्या पोटात जंत झाल्यामुळे दुखतं तर वयस्कर व्यक्तींना सुद्धा गॅसेस अपचन किंवा ऍसिडिटी सारख्या करणामुळे त्यांचं पोट दुखत.
पोटदुखीचा त्रास होतोय… तर जाणून घ्या घरगुती उपाय…! Stomach Problem In Marathi
त्या व्यतिरिक्त बरेचदा तुम्ही जर बाहेरचं जेवण केलं असेल तर बाहेरच्या खाण्यापिण्यामुळे पोटात दुखायला सुरुवात होतं. तेव्हा पोट बिघडतं. कारण बाहेरचं जेवण जरी चविष्ट आणि रुचकर लागत असलं तरीही ते करत असताना वापरलेले घटक चांगल्या दर्जाच्या आहेत किंवा नाही.
तेल व ताजेपणा याबाबत बाहेरच्या जेवणांमध्ये विशेष लक्ष दिले जात नाही. त्यामुळेच पोट बिघडणं जुलाब, उलट्या यांसारख्या तक्रारी समोर येतात. हे सर्व उद्भवते ते अन्नातून विषबाधा झाल्यामुळे. म्हणून आपण आधीच सावध राहिले पाहिजे. बऱ्याचदा पोटदुखीचा त्रास खूपच भयानक असतो, त्यावेळेस आपण लगेच डॉक्टरांकडे गेले पाहिजे.
पोट दुखीची कारणे :
पोटदुखी ही बिमारी आपल्याला बाहेरून दिसत नाही आणि नेमकं रुग्णाला देखील पोटदुखीचं काय कारण आहे किंवा कुठे दुखतं याचे देखील वर्णन करता येत नाही. पोटदुखीची अनेक कारणे असू शकतात.
जास्त उपवास केल्यामुळे देखील पोट दुखतं खूप हसणे, बोलणे, अति व्यायाम करणे, जागरण करणे, तूर, हरभरे यांच्यासारखी धान्य किंवा अति तिखट पदार्थ, मसालेदार पदार्थ खाणे, अवेळी जेवणे, वारंवार अजीर्ण होणे, मलमूत्र अडवून धरणे किंवा आम्लपित्त, सुकलेल्या भाज्या खाणे, शीळ अन्न भाज्या खाणे.
त्या व्यतिरिक्त पोटाच्या आत मधील बिघाड असल्यास, वात, प्रजनन संस्थेचे विकार मूत्रपिंड व मूत्र वितरण संस्थेतील दोष, रक्तवाहिन्यांचे आजार, किडनी स्टोन इत्यादी करणामुळे देखील पोटदुखीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.
थायरॉईडच्या रुग्णांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्या रोगामुळे बिघडलेल्या कार्यामुळे अन्नपचनाच्या समस्या निर्माण होतात. एखाद्या व्यक्तीच्या पोटातून व आतड्यांमधून अन्न जाणे मंद झाले तर या समस्येमध्ये पचन गती मंद होते व छातीत जळजळ, बद्धकोष्ठता पोट फुगणे, ऍसिडिटी सारखी लक्षणे दिसू लागतात व परिणामी पोटदुखीचा त्रास होतो.
तर चला मग जाणून घेऊया पोटदुखीवर घरगुती उपाय :
जेव्हा तुम्हाला बाहेरच्या खाल्लेल्या अन्नातून विषबाधा होते. तेव्हाच तुम्हाला उलटी, डायरिया, जुलाब, पोटदुखी होत असते. यावेळेस तुमच्या शरीरातील पाणी खूपच कमी होतं व तुम्हाला थकवा अशक्तपणा जाणवतो.
अशावेळी आपण वारंवार लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत घेतलं पाहिजे. फूड पॉइझनिंग कमी करण्यासाठी एक चमचा लिंबाच्या रसात एक चिमूटभर साखर घालून दिवसातून दोन ते तीन वेळा असे मिश्रण घेतले तर ते खूपच फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमची पोटदुखी नक्की कमी होईल व तुम्हाला आराम मिळेल.
पोटदुखी साठी आणखी एक उपाय म्हणजे तुम्ही दही खाऊ शकता. एका वाटीत थोडस दही घ्या त्यामध्ये एक चमचा मेथी दाणे घाला. व्यवस्थित एकत्र करून हे मिश्रण न चावता गिळून घ्या. पोटदुखी आणि उलट्यांवर हे खूपच परिणामकारक आहे. मेथीचे दाणे कडू असूनही अतिशय लाभदायी असतात.
व्यतिरिक्त दहा ग्रॅम गूळ आणि अर्धा चमचा हिंग एकत्र करून त्याची एक गोळी तयार करा. ही गोळी घेतल्यावर एक ग्लास कोमट पाणी घ्या. ही गोळी खाऊन त्यावर कोमट पाणी पिल्यामुळे पोटातील जंत मरतात व पोटदुखी कमी होते.
जर तुम्हाला पोटदुखी आणि जुलाब होत असेल तर काळ्या चहामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाका, नंतर हा चहा पिऊन घ्या. यामुळे जुलाब आणि पोटदुखी थांबते.
पोट दुखत असल्यास एक चमचा बेकिंग सोडा एक ग्लास कोमट पाण्यात टाका. नंतर हे पाणी पिऊन घ्या. यामुळे सुद्धा तुम्हाला आराम मिळतो.
पोटातील अन्न व्यवस्थित पचले नसेल तर आलं आणि मध एकत्र करून हे मिश्रण प्या. एक चमचा मधात थोडा आल्याचा रस मिसळून घेऊ शकता. यामुळे पोटदुखीला आराम मिळतो.
एक कप गरम पाणी करा. त्यामध्ये दोन चमचे ॲपल सीडर व्हिनेगर घालून ते पाणी पिल्यास अन्नापासून विषबाधा झाली असेल तर त्यापासून तुम्हाला आराम मिळतो.
मसाल्यातील जिरे हे थंड व पचनासाठी महत्त्वपूर्ण आहेत. पोटदुखी असेल तर तुम्ही थोडे जिरं तव्यावर भाजून त्याची पूड करा. ही पूड सुप किंवा इतर पदार्थांमध्ये घालून तुम्ही खाऊ शकता.
पोटदुखीसाठी केळ सर्वोत्तम फळ आहे. जर तुमचं पोट दुखत असेल तर एक केळ दह्यामध्ये कुस्करून घ्या. नंतर हे मिश्रण खाऊन घ्या, यामुळे अन्नातून विषबाधा झाली असेल तर ते देखील बरी होते व पोटदुखी देखील कमी होते.
तुळस ही अनेक रोगांवर औषधी म्हणून उपयोगात आणली जाते. तसेच ही तुळस सर्दी खोकल्यासाठी गुणकारी तर आहेच; परंतु तुमचं पोट दुखत असेल तर एका वाटीत तुळशीचा रस घ्या. त्यामध्ये थोडं मध मिसळा हे मिश्रण एकत्र करून खा, त्यामुळे पोटदुखी कमी होते.
जर तुमचं पोट दुःखी थांबत नसेल तर पोटदुखी थांबवण्याचा सर्वात सोपी मार्ग म्हणजे एक ग्लास पाणी प्या. बऱ्याचदा पोट रिकामे असल्यामुळे पोट दुखीचा त्रास होतो. त्यामुळे जर आपल्याला लवकर काही खाणे शक्य नसेल तर एक ग्लास पाणी हे देखील तुमच्या पोटाला आराम देऊ शकते. पाणी पचनाला ही मदत करते, त्यामुळे दिवसभरात थोडे थोडे आणि हळूहळू पाणी पिणे फायद्याचे ठरते.
पोट दुखीची अनेक कारणे आहेत, हे आपण वर पाहिले आहे. जर तुम्हाला पोटाचा खूपच त्रास असेल वरील उपाय काम करत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.