Stay Healthy Tips In Marathi दैनंदिन धावपळीच्या जीवनामध्ये मानव आपले शरीर स्वास्थ्य नीट ठेवू शकत नाही कारण त्यांना सर्वच गोष्टीमध्ये घाई असते. योग्य आहार व त्यामधून मिळणारे पोषक घटक आहारातून वगळत चालले आहेत.
आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? Stay Healthy Tips In Marathi
जर आपल्याला शरीर स्वास्थ्य टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला दैनंदिन आहारातून पोषक घटकांची पूर्तता होणे आवश्यक आहे. तसेच योग्य आहार, शरीराचे वजन आणि हृदयविकार इतर प्रकारचे कर्करोग तसेच मधुमेह व जुनाट आजार कमी करण्यास मदत करते.
आपण नियमित निरोगी आहार घेतल्यामुळे शरीर स्वास्थ्य तर चांगलेच राहते तसेच आपली प्रगती देखील स्वस्त राहते. शारीरिक ऊर्जा तसेच शरीराचे चांगले पोषण होते. आपण पाहिले आहे की, किती कमी वयात हृदयविकार सारख्या रोखाने मनुष्याला पछाडले आहे.
त्या व्यतिरिक्त मधुमेह, बरेच असे आजार आहेत, ज्यामध्ये आजचा मनुष्य भरडला जात आहे. संधिवात किंवा मधुमेह जर तुम्हाला सतवत असतील तर तुम्ही मेथी रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ली पाहिजेत असे केल्यामुळे तुम्हाला सांधेदुखी पासून लगेच आराम मिळेल.
सांधेदुखीची समस्या महिलांमध्ये खूपच दिसत आहे. मेथी दाणे पोटासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. तसेच आतडे स्वच्छ व पचन संस्था देखील सुधारते. मधुमेही व्यक्तींसाठी मेथी खूपच चांगली आहे.
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे?
दैनंदिन जीवनाचा व ऑफिशियल कामाचा बराचसा आपल्याला तणाव नैराश्य किंवा वेदना जाणवू शकतात. इत्यादी शारीरिक समस्या दूर करण्यासाठी आपण नियमित व्यायाम केला पाहिजे.
आहार : खाद्यपदार्थांमध्ये पोषक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक देखील असतात. पौष्टिक आहार घेतल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. दैनंदिन जीवनातील स्निग्ध पदार्थ, खनिज तसेच विविध जीवनसत्वांनी युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचे आरोग्य सुधारते. तुम्ही जेवढा आहार चांगला घ्याल तेवढे तुमचे आरोग्य उत्तम राहील. जेवणामध्ये दूध, हिरव्या भाज्या, तृणधान्ये, कोथिंबीर इत्यादी प्रकारचे पदार्थ समाविष्ट करून घ्या.
स्वच्छता : जरी तुम्ही उत्तम प्रकारचा आहार घेत असला आणि जेवण बनवत असताना जर स्वच्छता नसेल तर त्यामधून अनेक विषाणू आपल्या पोटामध्ये जातील म्हणून आहार बनवत असताना आपण स्वच्छतेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. स्वच्छतेमुळेच आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते.
आपण स्वच्छता राखली नाही तर त्यामधून मलेरिया, गॅस्ट्रो यांसारखे हानिकारक रोग आपल्याला होऊ शकतात. त्यामुळे जेवण बनवत असताना तसेच सार्वजनिक पातळीवर स्वच्छता विषयक काळजी घेणे गरजेचे असते.
व्यायाम : नियमित व्यायाम हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. त्यामुळे नियमित व्यायाम केला पाहिजे व्यायाम केल्यामुळे आपल्या आरोग्याचा दर्जा वाढतो.
व्यायाम केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
मनोरंजन : जीवन जगत असताना मनोरंजनात्मक जीवन जगणे खूपच फायदेशीर ठरते. जर तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर जीवनामध्ये मनोरंजन केले पाहिजे. त्यामुळे आपण आनंदी राहू शकतो. तुम्हाला कंटाळवाणे वाटत असेल तर एखाद्या निसर्गरम्य वातावरणामध्ये जाऊन आपले मन हलके करावे. तसेच समुद्रकिनारी किंवा ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल अशा ठिकाणी जावे.
विश्रांती : शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विश्रांती घेणे खूपच गरजेचे असते. विश्रांती घेतल्यामुळे आपण उत्साही राहतो. नियमित कामाचा थकवा निघून जातो. झोप देखील तेवढीच महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही थकाल तेव्हा विश्रांती घ्या.
फळांचे सेवन करा : दररोजचच्या आहारामध्ये फळांचा समावेश करा. फळे हे जीवनाचे मूलतत्त्व आहे. फळांमध्ये अनेक प्रकारचे घटक असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात.
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही टिप्स खालील प्रमाणे :
कोरड्या उन्हात उभे रहावे : सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये उभे राहावे. त्यामुळे आपल्या शरीरावर विटामिन ‘डी’चा चांगला स्त्रोत उपलब्ध होतो. शरीराची त्वचा तसेच डोळे देखील चांगले राहतात. आपल्या शरीरासाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे.
सकाळचा नाश्ता : सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन तसेच कार्बोहायड्रेट असणे गरजेचे आहे. प्रोटीन युक्त नाष्टा केल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. तसेच शरीराला चांगली ऊर्जा मिळते व दिवसभर आपले शरीर उत्साहीत राहते. हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.
सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्या : सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिणे हे शरीरासाठी आवश्यक आहे. हे पाणी सकाळी लवकर उठून दात न घासता पिणे फायदेशीर ठरते. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त घाण बाहेर पडते.
सूर्यनमस्कार करा : हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपले शरीर सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार योगा करावा. जर तुम्हाला जास्त काही करता येत नसेल तर किमान दोनदा तरी सूर्यनमस्कार करा. सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीराची पाचक प्रणाली चांगली राहते. यासोबतच ध्यान आणि प्राणायाम देखील करणे गरजेचे आहे. मानसिक तणाव दूर करण्यासाठी पंधरा मिनिटे ध्यान व प्राणायाम जरूर करावा.
जेवण करण्याआधी कोथिंबीर खा : जर तुम्ही जेवणाच्या आधी कोथिंबीर खाल्ला तर जेवण पचायला हलके जाते. तसेच जेवणाच्या अर्धा तास अगोदर कोथिंबीर खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे.
जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका : जेवण झाल्यानंतर आपण कधीही लगेच पाणी पिऊ नये. कारण पाणी पिल्यामुळे जेवण व्यवस्थित पचत नाही.
8 तास झोप घ्या : आपण कमीत कमी सहा तास आणि जास्तीत जास्त आठ तास झोप घेणे गरजेचे असते. झोपेच्या वेळी आपली प्राणशक्ती आपल्या शरीराला दुरुस्त करते. आपल्या शरीराला आराम मिळतो. त्यामुळे आपण शरीर उत्साहीत राहते.
तेलाचा वापर कमी करा : आपल्या आहारामध्ये जास्त तेलाचा वापर करू नका. भाज्या जास्त वेळ शिजवू नका. त्यामुळे भाज्यांमधील पौष्टिक घटकांचा नाश होतो. ओव्हनचा वापर करत असाल तर तापमानाची विशेष काळजी घ्या व नियमित जेवण झाकून ठेवा.
रात्रीचे जेवण : रात्रीचे जेवण हे कमीत कमी घेतले पाहिजे आणि झोपण्याच्या तीन तास अगोदर आपण जेवण घेतले पाहिजे. जेणेकरून रात्रीचे जेवण पचायला अवघड जाणार नाही तसेच रात्रीचे जेवण हे हलक्या स्वरूपाचे असावे म्हणजेच पचायला जड जाणार नाही.
आठवड्यातून एकदा उपवास करावा : आपल्या शरीराला साफ करण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी उपवास ठेवावा. यामुळे आपल्या पचन क्रियेला आराम मिळतो व आपले शरीर स्वस्त चांगले राहते.
संध्याकाळी फिरायला जाणे : जेवण झाल्यानंतर रात्री दररोज फिरणे शरीरासाठी खूप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे आरोग्य देखील चांगले राहते.
गरज नसताना चिंता करू नये : अतिरिक्त कामाचा ताण किंवा चिंता करणे आरोग्यासाठी घातक असते. अनावश्यक तणाव टाळा. त्यामुळे आरोग्य चांगले राहील.
तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या : तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्यामुळे लिव्हर आणि आरोग्य चांगले राहते.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. इतरांना शेअर करा व तुम्ही देखील तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.