Regular Menstruation In Marathi बऱ्याच महिला किंवा मुलींमध्ये मासिक पाळी नियमित नसते. मासिक पाळीचा कालावधी किंवा चक्र हे 21 ते 35 दिवसांचे असते. बऱ्याच स्त्रियांची पाळी येण्याची वेळ देखील निश्चित नसते. त्यामुळे अनेक समस्यांना त्यांना सामोरे जाऊ लागतं. तसेच त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होत असतो. बऱ्याच स्त्रियांना कधी कधी पाणी लवकर येते.
मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय Regular Menstruation In Marathi
तर काहींना तर दोन- तीन महिने उलटले तरी सुद्धा पाळी येत नाही. पाळी जर वेळेवर आले तर निरोगी आहात असे समजले जाते. पाळी वेळेवर आणण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय तुमच्याकरिता घेऊन आलो आहोत. तसेच हे उपाय केल्यामुळे पाळी वेळेवर तर येईलच आणि त्यापासून होणारा त्रास सुद्धा कमी होईल.
मासिक पाळी अनियमित येण्याची काही लक्षणे असतात. अधिक थकवा तुम्हाला असू शकतो, त्यामुळे सुद्धा पाळीमध्ये अनियमितता असू शकते. त्याचप्रमाणे लवकर भूक न लागणे, पोट, कंबर, दुखणे, ओटीपोटीच्या खालच्या भागात जवळ किंवा गर्भाशयाच्या जवळ वेदना होतात.
मासिक पाळी नियमित येण्यासाठी उपाय योजना :
जर तुमची मासिक पाळीमध्ये अनियमितता असेल म्हणजेच दोन-तीन महिन्यांपर्यंत तुमची पाळी येत नसेल तर तुम्ही व्यायाम किंवा योगा करायला सुरुवात करा. बऱ्याचदा जास्त वजन झाल्यामुळे देखील मासिक पाळीच्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. त्यामुळे तुमच्या वजनावर तुम्ही नियंत्रण ठेवायला पाहिजे. त्याकरता तुम्ही हेल्दी आहार घ्यायला पाहिजे. जेवणामध्ये धान्य, फळ, भाज्या, शेंगदाणे, दुधापासून बनवलेले पदार्थ, दूध, दही यांचा समावेश करायला पाहिजे.
मेथीची दाणे पाण्यात उकडून घ्या व ते पाणी थंड झाल्यानंतर प्यावे. यामुळे पिरियड वेळेवर येतात. जर तुम्हाला मासिक पाळीत देखील त्रास होत असेल तर एक चमचा मेथी दाणे एक ग्लास पाण्यात उकडा व पाणी अर्धवट राहिल्यानंतर कोमट पिऊन घ्यावे.
ओवा तुमच्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. ओव्या मधील गुणधर्म पोटातील त्रास दूर करतात.
तसेच मासिक पाळी देखील वेळेवर येते. एक चमचा ओवा आणि गुळाचा एक छोटा तुकडा घेऊन एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या. हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळू द्या व नंतर कोमट पाणी पिऊन घ्या. यामुळे सुद्धा तुमची पाळी नियमित राहील.
तुम्ही नियमित अद्रकचा चहा पिल्यामुळे सुद्धा तुमची पाळी नियमित होईल. हा उपाय केल्यामुळे दर महिन्याला तुमची पाळी येईल. अद्रक ही आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते. त्यामधील गुणधर्म गर्भाशयामध्ये आकुंचन वाढवतो व त्यामुळे पिरियड्स नियमित येतात. आल्याचा रस तुम्ही मधात मिसळून सुद्धा खाऊ शकता किंवा आले चहा मध्ये उकडून पिऊ शकता.
पपई हे मासिक पाळी वेळेवर आणण्यासाठी खूपच महत्वाचा फळ आहे तसेच पपयामुळे गर्भाशयात आकुंचन होण्यास मदत होते. पपई खाल्ल्यामुळे मासिक पाळी वेळेवर येते. पपयामधील कॅरोटीन इस्ट्रोजेन हार्मोन्स आढळतात, जे मासिक पाळी वेळेवर आणण्यात खूपच मदत करते.
मासिक पाळी नियमित येण्यासाठी फळांचा समावेश आहारामध्ये करणे अत्यंत आवश्यक आहे. फळांमध्ये डाळिंबाचा रस पिल्यामुळे सुद्धा तुमचे पिरियड्स वेळेवर येऊ शकतात. मासिक पाळीच्या तारखेच्या पंधरा दिवस आधीच डाळिंबाचा रस पिणे सुरू करा. चांगले मासिक पाळी वेळेवर येण्यास मदत होईल. डाळिंबाचा रस किंवा डाळिंब खाल्ल्यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो व व शरीरामध्ये हिमोग्लोबिनची पातळी सुद्धा वाढते.
आळशीला फ्लेक्स सीड देखील म्हटले जाते. या सीड्सचे जर तुम्ही दररोज एक चमचा सेवन केले तर यामुळे तुमच्या शरीराला खूपच फायदा होतो. तसेच तुमची मासिक पाळी नियमित येण्यास देखील मदत होईल.
तूप हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक तसेच शक्तीवर्धक आहे. तुपामध्ये गाईची तूप शरीरासाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते. त्यामुळे तुम्ही जर दररोज आहारात तुपाचा समावेश केला तर नक्कीच त्यापासून तुम्हाला फायदा मिळेल. घरी तयार केलेल्या तुपामुळे तुमचे वजन देखील संतुलित राहील व तुमची मासिक पाळी नियमित येण्यास मदत होईल.
ज्यावेळी मासिक पाळीची डेट चुकते, त्यावेळेस तुम्ही शरीराला उष्णता मिळवण्यासाठी गर्भाशयाच्या ओटीपोटीला शेक द्या. तुमच्या घरात गरम पाण्याची पिशवी असेल तर त्या पिशवीमध्ये गरम पाणी भरा आणि त्याचा शेक ओटी पोटीला द्या. यामुळे तुमची मासिक पाळी वेळेवर येण्यास मदत होईल. शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली की मासिक पाळी वेळेवर येते.
मासिक पाळी वेळेवर आणण्यासाठी दालचिनी अतिशय महत्त्वाची मसाले पदार्थ आहे. एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकून तुम्ही जर काही आठवडे याचे सेवन केले तर तुमची पाळी नियमित होईल.
मासिक पाळी नियमित येण्यासाठी तुम्ही बड्या शोपचा देखील वापर करू शकता. बडीशेप आपण जेवणामध्ये वापरतो. त्यामुळे जेवण सुद्धा रुचकर बनते तसेच त्याचा दुसरा उपयोग आपल्या आरोग्यासाठी सुद्धा आपण करू शकतो. तर एक ग्लास पाण्यामध्ये बडीशोप रात्रभर भिजवत घाला व दुसऱ्या सकाळी पाणी गाळून पिऊन घ्या. असे नियमित केल्यास काही दिवसात तुमच्या समस्येचे काही दिवसात निवारण होईल.
शेवग्याच्या शेंगा ही आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. तुम्ही जर शेवग्याच्या शेंगांचा उपयोग जेवणामध्ये केला तर यामुळे सुद्धा तुमची पाळी वेळेवर येण्यास मदत होईल.
मासिक पाळी नियमित येण्यासाठी दुधामध्ये हळद टाकून रोज रात्री पिल्यामुळे तुमच्या शरीराला फायदा तर होतो तसेच पाळी नियमित येण्यासाठी सुद्धा मदत होते. हळद ही उष्ण प्रकृतीची असते. त्यामुळे तुम्ही हे घेऊ शकता.
मासिक पाळी वेळेवर आणण्यासाठी अळीवाच्या लाडवाची जर तुम्ही सेवन केले तर तुमची पाळी नियमित येऊ शकते. आठवड्यातून दोनदा अळीवाची खीर खावी यामुळे सुद्धा फायदा होतो.
आहारामध्ये मैदा, साखर आणि तेलकट पदार्थ कमी असावेत जर तुम्हाला मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर मैद्याचे पदार्थ खाणे तुम्ही पूर्णपणे बंद करून टाकावे. तसेच बाहेरचे जंक फूड देखील बंद करा. पावर ब्रेड पिझ्झा यांच्या पदार्थांमध्ये मैद्याचा वापर केलेला असतो त्यामुळे तुम्ही हे पदार्थ खाणे शक्यतो टाळले पाहिजे.
या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.