Mouth Ulcer In Marathi बऱ्याच लोकांच्या तोंडात फोड येणे किंवा अल्सर होणे वारंवार असे घडत असते. यालाच आपण आपल्या भाषेमध्ये तोंड येणे असे म्हणत असतो. हा प्रकार खूपच त्रासदायक असतो तर कधी कधी सामान्य देखील असतो. जेव्हा हा त्रासदायक असतो तेव्हा आपल्याला काय खावं व काय प्यावं हे देखील कळत नाही. तसेच तोंडाची आग होत असते. काहीही खाल्लं तरी तोंडामध्ये आग होते किंवा खूपच वेदना होतात.
तुम्ही तोंड येण्याच्या त्रासाने हैराण आहात…! तर जाणून घ्या घरगुती उपाय… Mouth Ulcer In Marathi
अनेक जण तर स्वतःची उपासमार सुरू करतात. उपाशी राहिल्याने ही समस्या मात्र कधीही सुटणार नाही, उलट आणखीनच वाढत जाईल कारण पोटात अन्न कमी असल्यामुळे त्रास होऊ शकतो किंवा उष्णता देखील वाढते. मग हा त्रास जर तुम्हालाही होत असेल तर हा त्रास कशामुळे होतो व त्याचे काय कारणे आहेत तसेच त्यावर उपाय काय आहेत? याविषयी आज आपण या पोस्टमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत.
तोंड येणे ही समस्या सर्वसामान्य कुणालाही होऊ शकते. यामध्ये तोंडाची आग होते तसेच हा आजार नेहमीच सुद्धा होऊ शकतो. सौम्य आजार जरी हा वाटत असला तरी तो रुग्णांना तोंड आल्यावर तिखट किंवा मसाल्याचे पदार्थ खाण्यास त्रास देतो.
हा आजार जर वाढत गेला तर काही रुग्णांची रोजची जेवणे सुद्धा खूपच कठीण होऊन बसते. पाणी सुद्धा तोंडाला रुतत जातं. तोंड येणे म्हणजे नेमकं काय होतं.
तर यामध्ये छोट्या छोट्या जखमा मोठ्या आकारात वाढत जातात आणि साधारणता सात ते आठ दिवसात आपोआप वाढत जातात अशा जखमा जर तुम्हाला त्रास देत असेल तर यांना वेळीच आडा घातला पाहिजे म्हणजेच वेळेवर डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे तसेच त्यावर योग्य ते औषध घेतली पाहिजेत.
तोंड येणे जर सर्वसाधारण असेल तर तुम्ही घरगुती उपाय करून देखील यावर समाधान मिळवू शकता. परंतु हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता असते.
हा आजार मुख्यतः तंबाखू किंवा गुटखा खाणाऱ्या लोकांमध्ये जास्तीत जास्त आढळून येतो. या आजारामध्ये गालामध्ये पट्टे तयार होऊन रुग्णाला तोंड उघडणे सुद्धा अवघड होते. याकडे वेळीच लक्ष जर दिले नाही तर हा आजार गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो किंवा त्याचे रूपांतर कर्करोगामध्ये सुद्धा होऊ शकते.
तुमच्या शरीरातील जर उष्णता वाढली असेल तर तोंड येते. म्हणजेच शरीराचे टेंपरेचर वाढले की, तोंडामध्ये फोडे येतात. मसालेदार पदार्थ खाणे काही जणांच्या प्रकृतीला मानवत नाही, त्यामुळे सुद्धा त्यांची तोंड येऊ शकते. तोंड येणे ही समस्या बऱ्याचदा तुमच्या पचन व्यवस्थेवर सुद्धा अवलंबून असते.
ज्यांना पचन संस्थे संदर्भात समस्या असते. त्यांची तोंड वारंवार येत असते. तसेच शरीरामध्ये विटामिन बीची कमतरता असलेल्यास तोंड येण्याचे प्रमाण वाढते. तोंड येणे किंवा तोंडात फोड येणे ही समस्या जर तुम्हाला आठवडाभरात बरे होत असेल तर चांगले आहे.
ज्या लोकांना वारंवार तोंड येण्याचा त्रास होत असतो, त्या लोकांनी या आजाराकडे दुर्लक्ष करता कामा नये. कारण हे पचन तंत्र क्रियेशी संबंधित आजाराचे लक्षण आहे तसेच तोंडाच्या स्वच्छतेची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. जर तुमच्या शरीरामध्ये विटामिन बी, फॉलिक ऍसिड, झिंग यासारख्या पोषक तत्वांचा अभाव असेल तर तुम्हाला तोंडाचा अल्सर देखील होऊ शकतो.
तोंड येण्याचे प्रमाण पालेभाज्या न खाणाऱ्या किंवा खूपच कमी प्रमाणात खाणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत आढळून येतात तसेच सतत चहा कॉफी किंवा तंबाखू, धूम्रपान दारू यांसारखे व्यसन करणाऱ्या व्यक्तींचे सतत तोंड येत असते तसेच पोटात जंत असतील किंवा काही जुनाट आजार असतील तर देखील तुमचे तोंड येऊ शकते.
चला मग जाणून घेऊया तोंड येण्यावर घरगुती उपाय :
कोथिंबीर प्रत्येकाच्या घरात आढळते अतिशय सोपा उपाय आहे. सर्वप्रथम कोथिंबीरचा रस काढा. एक चमचा कोथिंबीरचा रस तोंडात घ्या आणि एकदा एक मिनिट तोंडात ठेवा. चूळ भरण्यासारखे करा हा प्रयोग तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळा करायचा आहे असे केल्याने तुम्हाला दोन दिवसातच आराम मिळतो.
एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या. त्यामध्ये एक चमचा मीठ घाला या पाण्याने गुळण्याकरता दिवसातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करून बघा तुम्हाला लगेच आराम मिळेल.
तुळशीची पाच ते सहा पाने दिवसभरात चार ते पाच वेळेस बारीक चावून खा. यामुळे सुद्धा तोंड येत असेल तर तुम्हाला त्यापासून आराम मिळतो.
खोबऱ्याचे तुकडे बारीक चावून खाल्ल्यामुळे देखील तोंडातील जखमा लवकर बऱ्या होतात.
दोन-तीन इलायची बारीक करून मधामध्ये एकत्र करून घ्या व हे मिश्रण जिथे तोंड आले आहे, तेथे लावा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
पेरूच्या झाडाची पाने पाण्यामध्ये उकडून घ्या व ते पाणी कोमट झाल्यावर गुळण्या करून घ्या. पेरूची पाने घेत असताना अतिशय रापलेली किंवा अधिक कोवळी पाणी घेऊ नका, मध्यम स्वरूपाची पाने घेतल्यामुळे लवकर आराम मिळतो.
जर तुम्ही दूध घेत असाल तर दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतो. जे तोंडातील फळांच्या वायरस सोबत लढण्याचे काम करतो तसेच कॅल्शियम मुळे झालेली झीजसुद्धा लवकर भरण्यास मदत होते.
- ज्येष्ठमधातील औषधी गुणधर्मामुळे अल्सर झाला असेल तर त्यातील होणारी आग किंवा वेदना कमी होण्यास मदत होते. जेष्ठमधच्या काड्या किंवा ज्येष्ठमधाची पावडर तुम्ही वापरू शकता. ज्येष्ठमध असल्यास ती उगवून त्याची पेस्ट करावी व जिथे फोड झाला आहे तेथे लावावे. जर तुमच्याकडे जेष्ठमधाची पावडर असेल तर ती पावडरमध्ये मिक्स करून तुम्ही जिथे फोड आला आहे तेथे लावू शकता.
- दातांचा पिवळेपणा जाण्यासाठी घरगुती उपाय
हा प्रयोग तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा करून बघावा.
हळदिमध्ये औषधी गुणधर्म आहे. त्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल व अँटी-फंगल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हळदीचा वापर केल्याने तोंडात येणारे फोड आणि संसर्गापासून मुक्ती मिळू शकते. हळदीचा लेप लावल्याने तोंडातील फोडाचा त्रास कमी होतो व वेदनाही कमी होतात. त्यासाठी थंड पाण्यात हळदीची पावडर मिक्स करून एक पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट फोड आलेल्या जागी लावावी. दिवसातून 3 ते 4 वेळा हा उपाय करावा. वेदनांपासून आराम मिळेल.
नियमित तोंड येऊ नये म्हणून आपण स्वतः आपली काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी नियमित पाणी पिले पाहिजे. सकस व पौष्टिक आहार आपण घ्यायला पाहिजे. मसालेदार पदार्थ कमी खावे तसेच व्यायाम देखील केला पाहिजे. धूम्रपान करणे, तंबाखू खाणे आपण सोडले पाहिजे.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.