डोक्याचा ताण वाढलाय….. काळजी करू नका…Mind Fresh Tricks

Mind Fresh Tricks घरगुती काम असो किंवा ऑफिशियल काम कामाचा ताण तर असतोच. बऱ्याचदा आपल्यावर येणाऱ्या कामाचा बोजा आपल्या करिता मानसिक त्रास घेऊन येत असतो. शारीरिक आरोग्यासोबतच आपले मानसिक आरोग्य देखील सुदृढ राहणे आवश्यक असते.

डोक्याचा ताण वाढलाय….. काळजी करू नका…Mind Fresh Tricks

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी खालील व्यायाम करा

तुम्हाला जर हेल्दी जीवन जगायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला मानसिक आरोग्य सुधारले पाहिजे. परंतु आज काल लोक स्वतः एवढे बिझी झाले आहे की, त्यांना स्वतःसाठी वेळच नाही. त्याच्यामुळेच आरोग्याविषयी अनेक समस्या त्यांना घेरतात.

जर तुम्हाला स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे असेल तर आज पासून योगा तसेच योग्य आहार घेणे सुरू करा. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल योगासने केल्यामुळे केवळ शरीरच चांगले राहते असे नाही तर आपला माईंड देखील फ्रेश राहतो व आपण आनंदी, निरोगी जीवन जगू शकतो.

तर चला मग जाणून घेऊया मानसिक आजार काय आहे व कशामुळे होतो?

बऱ्याचदा आपल्यावर कामाचा बोजा पडतो. त्यामुळे मेंदूला काम करणे सुचत नाही, मानसिक संतुलन बिघडते यालाच मानसिक आजार असे म्हटले जाते. मेंदूमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांमुळे मानसिक आजार होतात. मानसिक आजाराची लक्षणे आपल्याला दिसत नाहीत मात्र मानसिक आजार समजण्यासाठी रक्तपुरवठा दाखवणाऱ्या पेशींमध्ये बदल असणाऱ्या तपासण्या देखील कराव्या लागतात. यावरून आपल्याला मानसिक आजार कळू शकतो.

मानसिक आजार निर्माण होण्याची कोणकोणती लक्षणे आहेत?

शक्यतो, मानसिक आजार कोणालाही होऊ शकतो परंतु कोणत्या कारणामुळे होतो तर अचानकपणे घाबरणे, चक्कर येणे, सतत अस्वस्थता वाटणे, आत्महत्येचा विचार येणे, घाम येणे ही सर्व मानसिक आजाराची लक्षणे आहेत.

मानसिक आजार दूर करण्याचे उपाय :

मानसिक आजार जर आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या दररोजच्या जीवनामध्ये योगाचा समावेश केला पाहिजे. योगा किंवा व्यायाम केल्यामुळे मानसिक आजार तर बरा होतोच तसेच शारीरिक दृष्ट्या देखील मनुष्य तंदुरुस्त राहतो. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी दररोज प्राणायाम ध्यान आणि आसनं केली पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीने दररोज सूर्योदयापूर्वी सुमारे 60 मिनिटे वेळ काढून दररोज योगासने करावी. चालणे फिरण्यामुळे आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होत असतो.

नियमित चालल्यामुळे मेंदूची सकारात्मकता वाढते. योग आणि प्राणायाम यांच्यामुळे तुमची फिटनेसच काम करत नाही तर त्यांचा मनावरही सकारात्मक परिणाम होतो.

पोहणे हा देखील एक प्रकारचा व्यायाम आहे. यामुळे आपल्या शरीराची हालचाल होते. तुमचे संपूर्ण शरीर आणि हृदय तसेच रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली चांगली राहते. यामुळेच आपला माईंड देखील फ्रेश होतो. म्हणजेच मानसिक आजार दूर होण्यास मदत होते. पोहल्यामुळे चांगली झोप लागते, नैराश्य दूर होते.

माईंड फ्रेश करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे सायकलिंग. सायकल चालवल्यामुळे बऱ्याच प्रमाणात रोग नियंत्रित केले जाऊ शकतात. सायकल चालवताना आपली शारीरिक ऊर्जा लागते म्हणजेच आपण जे अन्न खातो त्यातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. तसेच त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतो व शरीर प्रगती देखील चांगली राहते.

डान्स केल्यामुळे देखील तुमचा माईंड फ्रेश राहू शकतो. म्हणून करमणूक म्हणून आपण पार्टी किंवा कोणत्याही फंक्शन जात असाल तर तिथे डान्स करा. आपल्यामुळे आपली मानसिक स्थिती सुद्धा होऊ शकते. डान्स करत असताना एक वेगळीच एनर्जी आपल्या शरीरात निर्माण होते त्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळतो. व मानसिक आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर ती लगेच कमी होते.

मानसिक समस्या असेल तर ते दूर करण्यासाठी डोक्यामध्ये चांगले विचार असणे फायद्याचे ठरते. त्यामुळे आपण आपले मन एखाद्या चांगल्या गोष्टीकडे वळवणे फायद्याचे ठरते. शरीरात चांगले विचार येण्यासाठी विटामिन्स मिनरल्स घेणे गरजेचे असते. ज्या पदार्थांमध्ये विटामिन्स आणि मिनरल्स असतं अशा पदार्थाचे जास्तीत जास्त सेवन करा.

बऱ्याचदा एखाद्या गोष्टीमुळे आपली चिडचिड निर्माण होते; पण मात्र काही आजार असे असतात. जी औषधी घेतल्याने सुद्धा बरी होतात परंतु मानसिक आजार औषधे घेतल्याने बरा होत नाही. मानसिक आजार चांगले बोलण्याने बरा होऊ शकतो. एकमेकांशी संवाद करून आपल्या मनातील एखादी गोष्ट जवळच्या व्यक्तीला सांगणे देखील आपल्या मनातील द्विधा स्थिती सुधारू शकते. जवळच्या व्यक्तीसोबत बोलल्यामुळे आपले मन हलके होते, म्हणून हा देखील महत्वाचा एक उपाय आहे.

डोकं शांत ठेवण्यासाठी नियमित ध्यान साधना केली पाहिजे. यामुळे आपल्या मेंदू नियंत्रणात राहतो. ध्यान साधना केल्यामुळे तुमचे मन चांगले राहते तसेच मानसिक आजार बरा होण्यास मदत होते.

याव्यतिरिक्त तुम्ही योगासने करून देखील तुमचे मनस्थिती चांगली करू शकता. जर तुम्ही योगाभ्यास करत असाल तर तुमचे मन पूर्वीपेक्षा खूप शांत आणि कमी त्रासदायक तसेच अनेक समस्यांमधून तुम्हाला सुटका मिळेल. शरीराच्या उर्जेचा योग्य दिशेने वापर करू शकाल. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची तुम्हाला शक्ती प्राप्त होईल.

वज्रासन केल्यामुळे देखील आपल्या मनाची एकाग्रता वाढते. वज्र हा शब्द संस्कृतमध्ये असून याचा अर्थ आकाशातून इंद्राने वज्र फेकल्याप्रमाणे वीज पडणे असा होतो. त्याला इंग्रजीमध्ये डायमंड पोज देखील म्हटले जाते.

अंजनायासन नियमित केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत राहतो. तसेच आसनाला हाय लंज असेही म्हटले जाते. हे आसन केल्यामुळे आपले मन शांत राहते. तसेच आपला तणाव देखील खूप कमी होतो माय फ्रेश राहतो.

वीरभद्रासन केल्यामुळे देखील आपल्या शरीराची लवचिकता कायम राहते. वीरभद्रासन करण्याचे अनेक फायदे आहेत. हे आसन शरीर लवचिक आणि मजबूत बनवते. तसेच मनशांत होण्यास मदत होते. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे. त्यांना विरभद्रासन करण्याचा सल्ला दिला जातो. हे आसन केल्याने मनाची एकाग्रता शक्ती वाढते.

ज्यांना मानसिक आजाराची लक्षणे जाणवतात त्यांनी नियमित योगा करणे आवश्यक असते. योगा केल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळते. जर तुम्ही हे उपाय रोज केले नाही. तर तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसून येणार नाही. अशा प्रकारे दिलेले उपाय मानसिक तणाव दूर करण्यासाठी दिला असून प्रयोग करून पहा. मानसिक शांतता जर मिळत नसेल तर योग्य तज्ञांचा सल्ला घ्या.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment