तुम्हाला प्रमाणापेक्षा घाम येतोय तर जाणून घ्या त्यासाठी घरगुती उपाय… If You Are sweating Profusely In Marathi

If You Are sweating Profusely In Marathi घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि घाम येणे हे आपल्या आरोग्या करतात महत्त्वाची देखील आहे. जर तुम्हाला घाम येतच नसेल तर ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. जे खूपच मेहनतीचे काम करतात, त्यांना घाम जास्त येत असतो. तसेच चालताना खेळताना किंवा इतर काही कामे करताना घाम येत असेल तर ही गोष्ट सामान्य मानली जाते; परंतु त्या जर तुम्हाला जास्त घाम येत असेल तर ही गोष्ट मात्र सामान्य नाही. अधिक घाम येणे हे एखाद्या रोगाचे लक्षण असू शकते. घाम येण्याची कसे अनेक कारण असू शकतात.

If You Are sweating Profusely In Marathi

तुम्हाला प्रमाणापेक्षा घाम येतोय तर जाणून घ्या त्यासाठी घरगुती उपाय…If You Are sweating Profusely In Marathi

विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंच्या संसर्गामुळे देखील घाम मोठ्या प्रमाणात येऊ शकतो किंवा हृदयाच्या धडपडी मध्ये, जळजळ होणे, हाडांशी संबंधित संक्रमण असेल कोणतेही काम किंवा व्यायाम याच्या व्यतिरिक्त जास्त घाम येणे हे हृदयविकाराची लक्षणे सुद्धा असू शकतात.

तसेच तणाव, भीती व चिंता हे देखील अत्याधिक घाम येण्याची कारणे असू शकतात. गर्मीच्या दिवसात उन्हात फिरण्यामुळे तर घाम येतो. तसेही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण गरम असते, त्यामुळे आपल्याला घाम येतो. बरेच लोक घाम येण्याच्या समस्येने त्रस्त असतात; परंतु त्या गोष्टींकडे लोक गांभीर्याने पाहत नाही.

त्याचा त्रास त्यांना पुढे होऊ शकतो म्हणून आम्ही तुमच्याकरिता खास ही माहिती घेऊन आलो आहे. तुम्हाला जर जास्त घाम येत असेल तर तुम्ही खालील उपाय नक्की करून पहा. यामुळे तुम्हाला घाम येण्याच्या त्रासापासून थोडे का होईना परंतु आराम मिळेल.

घाम येण्याची कारणे कोणती आहे?

शरीरामधून घाम येणे आणि खूप जास्त घाम येणे अशा वेगवेगळ्या दोन सिच्युएशन्स आहेत. जास्त घाम येण्याच्या सिच्युएशनला सामान्यपणे हायपरिड्रोसिस म्हटले जाते. तर घाम येणे ही शरीराची एक सामान्य क्रिया मानली जाते. जर एखाद्या व्यक्तीचे वेगवेगळ्या प्रकारे काम करत असेल तर त्याला घाम येतो.

कोणताही आजार नसताना जास्त घाम येत असेल तर त्या मागे ज्या ग्रंथी शरीरातील घाम बाहेर फेकतात. त्या जबाबदार असतात. या ग्रंथी ओव्हर ऍक्टिव्हेट किंवा प्रमाणापेक्षा जास्त सक्रिय होतात, म्हणून शरीराला सामान्य पेक्षा जास्त घाम येऊ लागतो.

त्या व्यक्तीने जर तुम्हाला थायरॉईड, मधुमेह, ताप किंवा हृदय विकार असेल किंवा एखाद्या कोणत्याही आजाराने जर ग्रस्त असाल तर तुम्हाला घाम येतो. परंतु बऱ्याचदा कोणत्याही रोगाशिवाय भरपूर घाम येतो.

सततच्या येणाऱ्या घामामुळे जर तुम्ही हैराण असाल तर जाऊन घ्या घाम कमी करण्यासाठी घरगुती उपाय :

उन्हाळ्याचा दिवस असेल आणि तुम्हाला सतत घाम येत असेल तर आपल्या आहारामध्ये फळांचा रस, नारळ पाणी, लिंबू पाणी आणि हर्बल टी यांचा समावेश करा. यामुळे तुमच्या शरीरामध्ये पाण्याची पातळी चांगली राहते. तसेच हिरव्या पालेभाज्या, बटाटे, केळी, सफरचंद यांचा देखील तुम्ही उपयोग करा. यामध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची पातळी देखील योग्य राहील.

दररोज एक ते दोन ग्लास टोमॅटोचा रस घ्या. यामुळे सुद्धा घाम कमी होतो. टोमॅटोचा रस घेतल्यामुळे त्यातील एंटीऑक्सीडेंट हा घटक त्वचेवरील छिद्रांना आकुंचित करते. यामुळे शरीराला थंडावा देखील मिळतो.

जास्त घाम येत असल्यास द्राक्ष खावी किंवा द्राक्षांचे ज्यूस घ्यावा. यामुळे जास्त घाम येण्याची समस्या दूर होते.

ॲपल व्हिनेगर घाम कमी करण्यास मदत करते. जर तुम्हाला घाम जास्त येण्याची समस्या असेल तर ज्या ठिकाणी अधिक घाम येतो, तिथे हलक्या कोमट पाण्याने साफ करा आणि त्यानंतर तिथे थोडेसे व्हिनेगर लावा. रात्रभर तसेच ठेवा. तुम्ही सकाळी उठल्यानंतर धुवून घ्या व त्यावर थोडी पावडर लावा. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

घरातील मसाल्यामध्ये वापरण्यात येणारे धने बारीक वाटून रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. यामुळे तुम्हाला शरीरात थंडावा मिळेल व घाम कमी येण्यास मदत होईल.

खसखसचे पाणी जर तुम्ही पिले तर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. दिवसभर साधे पाणी तर आपण पितोच परंतु त्या व्यतिरिक्त तुम्ही एक चमचा खसखस दोन लिटर पाण्यात 20 मिनिटे भिजवत ठेवा. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या व ते पाणी प्या.

जिथे तुम्हाला घामाची दुर्गंधी व सतत घाम येत असेल तेथे लिंबाचा रस बेकिंग सोड्यात घालून लावा. दहा मिनिटे ठेवा व नंतर स्वच्छ धुऊन घ्या.

जास्त घाम येत असलेल्या ठिकाणी तुम्ही टोमॅटो लावल्याने देखील फायदा होईल. टोमॅटो लावून पंधरा ते वीस मिनिटे तसेच ठेवा आणि त्यानंतर त्याच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

जास्त घाम येत असल्यास तुम्ही आलं घालून काळा चहा घेऊ शकता. त्यामुळे देखील ही समस्या कमी होऊ शकते.

पांढऱ्या चंदनाचा लेप तयार करा आणि घाम जास्त येत असेल त्या ठिकाणी लावा. त्यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल. हा लेप 15 ते 20 मिनिटं लावून ठेवा व नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

तुम्हाला सतत घामाचा त्रास असेल तर साध्या पाण्याने आंघोळ करू नका. 20 ग्रॅम नाल प्रमादी चूर्ण पाण्यात 15 ते 20 मिनिट आधी टाकून ठेवा व त्यानंतर पाणी गाळून आंघोळ करा.

तुम्हाला सतत जास्त घाम येत असेल तर मसालेदार आणि आंबट अन्नपदार्थांचे सेवन करणे कमी करा किंवा पूर्णतः बंद केले तरी चालेल.

आहारामध्ये गरम पदार्थांचा समावेश करू नका. दररोज भिजवलेले दहा मनुके उपाशीपोटी खा तसेच आहारामध्ये अधिक तुरट आणि गोड चवीचे पदार्थ खाणे फायदेशीर ठरेल.

याव्यतिरिक्त जर तुम्हाला खूपच घामाचा त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment