उन्हापासून आपल्या त्वचेचे संरक्षण कसे करावे ? How To Care Skin In Summer In Marathi

How To Care Skin In Summer In Marathi उन्हाळा सुरू होताच उन्हाच्या झळा आपल्याला सोसाव्या लागतात. तसेच ऋतू नुसार देखील आपल्या त्वचेमध्ये बरेचसे बदल होत असतात. उन्हाळ्यात आपली त्वचा ऊन व घामामुळे तेलकट दिसू लागते, त्वचा काळी होऊ लागते तसेच शरीरावर घामोळ्या, खाज, काळे चट्टे इ. अशा विविध समस्या आपल्याला सताऊ लागतात. ओझोनच्या थरावर झालेल्या परिणामामुळे पृथ्वीच्या पर्यावरणावर दिवसेंदिवस मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो.

How To Care Skin In Summer In Marathi

उन्हापासून आपल्या त्वचेचे संरक्षण कसे करावे ? How To Care Skin In Summer In Marathi

हा परिणाम म्हणजेच पृथ्वीवर सूर्याची हानिकारक किरणे येऊ लागले आहेत. या हानिकारक किरणांच्या संपर्कांमध्ये आपली त्वचा आल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या व विविध आजार आपल्याला उद्भवू शकतात.

या उन्हामुळे त्वचेवर लाल रंगाचे चट्टे उमटू शकतात किंवा त्वचा भाजल्यासारखे देखील होऊ शकते, असे झाल्यास आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल; परंतु आपणही सूर्यकिरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी कोणता आहार घ्यावा? उन्हाळ्याच्या दिवसात आपण आपली त्वचा किंवा शरीर कसे ऊर्जावर्धक ठेवावे तसेच कोण-कोणते उपाय करावेत. हे या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेऊया.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा आपल्याला कुठे बाहेर फिरायला किंवा ऑफिसच्या दररोजच्या कामांमध्ये ये जा करावी लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वात मोठी चिंता असते. ती म्हणजे सनबर्नची..! कारण सूर्याच्या अतिउष्ण किरणांमुळे आपली त्वचा काळवट पडते.

बाहेर फिरायला जाताना लोक सर्व अंघोळ झाकून बाहेर पडतात आणि मी सर्वांनी करायला हवं प्रत्येकाने उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. आपण जर अशा अति उष्ण किरणांमध्ये जास्त वेळ राहलो, तर त्वचेचा कर्करोग तसेच वेगवेगळे आजार देखील उद्भवू शकतात.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपले शरीर स्वास्थ सांभाळण्याची जबाबदारी आपणच घ्यावी. यासाठी आपण बऱ्याच उपाययोजना करू शकतो. व उन्हापासून आपले व आपल्या शरीराचे संरक्षण करू शकतो.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी आपण भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिण्याची आवश्यकता असते. भरपूर पाणी असणारी फळे देखील आपण सेवन केली तर शरीराला पाण्याची कमतरता भासणार नाही. भरपूर पाणी असणारा फळ म्हणजे टोमॅटो, काकडी, द्राक्षे, खरबूज, टरबूज इत्यादी.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त सुती कपडे वापरणे फायदेशीर ठरते. तसेच फिकट रंगाचे कपडे घालावे. लांब बाह्यांचे कपडे किंवा सनकोट, सुती स्टोल वापरावे. हवा असल्यास आपण छत्रीचा देखील उपयोग करावा. डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून गॉगल वापरणे फायदेशीर ठरते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सनस्क्रीन लोशनचा देखील तुम्ही वापर करू शकता.

सनस्क्रीन लोशनचा वापर कसा करावा याविषयी माहिती बघूया.

सनस्क्रीन लोशनमुळे आपल्या त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेला प्रोटेक्शन मिळते. सन स्क्रीनचे सन प्रोटेक्शन फॅक्टर हे 30 किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे.

कॉस्मेटिक क्रीम पेक्षा मेडिकल सन स्क्रीन लोशन नेहमी उपयुक्त असते. तुमची त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवण्यासाठी सन स्क्रीन लोशन भरपूर प्रमाणात लावणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुमच्या चेहऱ्यासाठी अर्धा चमचा व हात पायांसाठी 6 ml आवश्यक आहे. तसेच हे लोशन उन्हात जाण्याच्या वीस मिनिटे अगोदर लावून घेतल्यास उपयोगी ठरते. सर्वप्रथम तुम्ही चेहऱ्यावर लावून नंतर हाता-पायांना लोशन लावून घ्यावे.

जेव्हा तुम्हाला खूप घाम येतो किंवा तुम्ही पाण्यात जातात तेव्हा सनस्क्रीम प्रत्येकी 40 मिनिटांनी लावावे. तसेच लोशन वापरत असताना कॉलिटीचे असावे. कारण आज काल बाजारांमध्ये बरेच डुबलीकेट प्रॉडक्ट उपलब्ध आहेत.

उन्हापासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी कोणते पदार्थ खावेत :

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी किंवा शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण काय खायला पाहिजे याचा विचार बरेच लोक करतात. उन्हाळ्यात पचन संबंधित आजार मोठ्या प्रमाणात होऊ शकतात म्हणून हलके अन्न खाणे तसेच जास्त पाणी पिणे आवश्यक असते.

त्या व्यतिरिक्त बार्ली, ओट्स आणि गव्हाच्या पदार्थांचा समावेश तुमच्या आहारामध्ये नक्की करा. काही पदार्थ असे आहेत जे तुमच्या आहारात समाविष्ट केल्याने तुमचे शरीर थंड राहते व उन्हापासून तुमच्या शरीराचे संरक्षण होते.

तर चला मग जाणून घेऊया अशाच काही पदार्थांविषयी माहिती :

नारळ पाणी : नारळ पाणी आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे. नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते तसेच आपल्या पोटातील आम्लाची पातळी देखील कमी होते.

ओटमील : उन्हाळ्यामध्ये आपले शरीर स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आपण ओटमील हे खाऊ शकता. ओटमिलमध्ये शरीर थंड ठेवण्याचे घटक आहेत. जर तुमची त्वचा उन्हामुळे जळली असेल तर तुम्ही तेथे ओटमिलचा पॅक बनवून देखील लावू शकता. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

दही : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंड ठेवण्यासाठी दही खाणे उत्तम आहे. दह्यामध्ये अन्नपचनाची क्षमता मोठ्या प्रमाणात असते म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये दही दररोज खायला पाहिजे. जर आपल्याला दही खाण्याचा कंटाळा येत असेल तर आपण ताक किंवा मठ्ठा करून देखील पिऊ शकतो. त्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता देखील भासणार नाही.

बटाटे : आपल्या दैनंदिन आहारामध्ये बटाटे भाजी समाविष्ट करायला पाहिजे. कारण बटाट्यांमध्ये असे पौष्टिक घटक असतात. जे तुमच्या शरीराची उष्णता कमी करू शकतात व तुमच्या शरीराचे उन्हापासून संरक्षण करू शकतात.

टोमॅटो : टोमॅटो सुद्धा आपल्या दैनंदिन आहारातील फळभाजी असून टोमॅटोमध्ये जीवनसत्व क आणि लाइकोपीन आढळते. जे आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर असतं.

स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरीमध्ये अनेक चांगले गुणधर्म आहेत त्यातील एक गुणधर्म म्हणजेच की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्ट्रॉबेरी आपल्या शरीराचे उन्हापासून संरक्षण करू शकते. स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आणि किवीसारख्या फळांमध्ये जीवनसत्व ‘क’ ची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तुम्हाला केवळ शंभर ग्रॅम स्ट्रॉबेरी खायची आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात कोणते पदार्थ टाळावेत :

मांस : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मटण खाणे टाळले पाहिजे मटणांमध्ये चरबीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. ज्यामुळे आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढते. उच्च कोलेस्ट्रॉल युक्त पदार्थाचे सेवन केल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात मास खाणे टाळले पाहिजे.

बर्गर, फ्राईज : बर्गर प्राईज यामध्ये फ्लॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपले वजन वाढवण्यास मदत करतात. हे अन्नपचवणे खूपच कठीण असते म्हणून असे अन्न खाणे टाळावे. ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तळलेले पदार्थ खायला खाणे टाळावे. जेणेकरून आपल्याला मळमळ, ऍसिडिटीचा त्रास होणार नाही व आपले शरीर स्वस्त राहील.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment