Homemade Solution In Headache In Marathi बऱ्याचदा आपण एखादे काम करत असताना अचानक आपल्या डोक्यात वेदना किंवा डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. अशातच हाती घेतलेले काम आपल्याला करता येत नाही किंवा काम करणे सुचत नाही. त्या व्यतिरिक्त हे आजकालच्या धावपळीच्या जीवनात डोकेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे.
अचानक होणाऱ्या डोकेदुखीच्या त्रासापासून मिळवा आराम…. जाऊन घ्या त्यासाठी घरगुती उपाय….Homemade Solution In Headache In Marathi
डोकेदुखी का होते ?
बऱ्याचदा आपल्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता किंवा आवश्यक पोषक तत्वे कमी झाल्यामुळे डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.
डोकेदुखीचे आणखीन एक मुख्य कारण म्हणजे पुरेशी झोप न घेणे पुरेशी झोप न झाल्यामुळे देखील बऱ्याचदा डोकेदुखीचा त्रास होतो. म्हणून आपण सहा ते आठ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.
जीवन जगत असताना अनेक समस्या आपल्या जीवनात येत असतात; परंतु डोकेदुखीची समस्या असल्यास विनाकारण घेतलेले पेन किलर देखील ठरू शकते. म्हणून आपला आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण पेन किलरचा सतत वापर करणे योग्य नाही.
डोके दुःखीच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी काही घरगुती उपाय :
तुम्हाला जर डोकेदुखीची समस्या अचानक उद्भवली असेल तर तुम्ही दालचिनीचा उपयोग करू शकता. कारण दालचिलीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. त्यासाठी दालचिनीचे तीन ते चार तुकडे घेऊन त्याचे बारीक चूर्ण करावं. त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून त्याची घट्ट पेस्ट तयार करून घ्या. आणि ती कपाळाला लावा हा लेप साधारणपणे अर्धा तास कपाळावर राहू द्या व त्यानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.
अचानकपणे उद्भवलेली डोकेदुखी पळवण्यासाठी लिंबू हे खूप उपयुक्त आहे. कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून हे पाणी पिल्याने डोकेदुखीला आराम तर मिळतेच तसेच गॅसेसचा त्रास होत असेल तर तो देखील बरा होतो. यामध्ये थोडे सेंधे मीठ टाका व डोकेदुखी पासून आराम मिळवा.
डोकेदुखीचा त्रास जर तुम्हाला सर्दी, खोकला यामुळे होत असेल तर तुम्ही एक चमचा ओवा भाजून सुती कापडात तो बांधून घ्यावा व डोक्यावर जेथे त्रास होत आहे, तेथे शेकल्यामुळे डोकेदुखीचा त्रास त्वरितच कमी होतो.
जर डोकेदुखीचा त्रास डोळ्यांमध्ये किंवा सायनसमुळे होत असेल तर आपल्या दोन्ही हाताची तर्जनी लव्हेंडर तेलामध्ये बुडवा आणि डोक्यापासून सुरू झालेल्या नाकाच्या दोन्ही बाजूच्या हाडांना हलक्या हाताने दाबा व मसाज करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच विश्रांती मिळेल. जेणेकरून आपल्या डोकेदुखी समस्या देखील दूर होईल.
फेशियल ऑईलने मसाज केल्यामुळे देखील तुमचे डोकेदुखी दूर होऊ शकते. त्यासाठी दोन्ही हातांच्या चारी बोटांच्या वरच्या भागात स्पेशल ऑइलमध्ये बुडवून त्या दोन्ही हातांच्या बोटाने भोळ्यांच्यामध्ये एकसाथ हळुवारपणे मालिश करा.
मालिश करत असताना डोळे बंद करा तसेच मालिश हलक्या हाताने करा. डोळ्यांवर कोणताही दबाव येऊ देऊ नका. तसेच असे करत असताना एक दीर्घ श्वास घ्या. आणि रिलॅक्स रहा. ही मसाज दोन ते तीन मिनिटे करा. यामुळे तुम्हाला डोकेदुखी पासून नक्कीच आराम मिळेल.
बऱ्याचदा शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे भरपूर पाणी पिल्यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो. कारण डीहायड्रेशनमुळे आपल्याला डोकेदुखी होऊ शकते.
म्हणून भरपूर पाणी प्या. ज्यामुळे डोकेदुखीचा त्रास आपल्याला होणार नाही.
आपण घरी तेल तयार करून डोकेदुखीवर वापरू शकतो. त्यासाठी सात आठ थेंब पुदिन्याचे तेल पाच ते सहा थेंब लवंगाचे तेल तसेच चार ते पाच थेंब आल्याचे व दोन चमचे नारळाचे तेल, सात ते आठ थेंब विंटर ग्रीन तेल हे सर्व तेल एकत्रित मिक्स करून डोक्याला किंवा मानेवर लावा व हळूहळू मालिश करा. त्यामुळे डोक्यातील वेदना कमी होतात व डोकेदुखीवर आराम मिळतो.
बऱ्याचदा अचानक डोकेदुखी होते. तेव्हा लवंग ही खूपच उपयोगी ठरते लवंग आणि लवंगेच्या तेलामध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात. त्यामुळे दहा ते पंधरा लवंगाची बारीक पूड करून ही पूड एका कपड्यात बांधून त्याचा वास सतत घेतल्याने डोकेदुखी पासून आराम मिळतो. तसेच वेदना देखील कमी होतात.
दोन चमचे खोबरे तेल व त्यामध्ये एक चमचा मीठ चार ते पाच थेंब लवंग ते मिक्स करून हलक्या हाताने कपाळाला लावा. त्यामुळे देखील लगेच डोकेदुखीला आराम मिळतो.
दोन चमचे खोबरेल तेल त्यामध्ये एक चमचा मिठ आणि चार-पाच थेंब लवंग तेल मिसळून ते हलक्या हाताने कपाळाला लावावं. याने त्वरीत आराम मिळतो.
डोकेदुखीचा त्रास असल्यास मॅग्नेशियमयुक्त पदार्थ खावेत. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित तसेच मज्जातंतु संक्रमणांनी शरीरात असंख्य कार्य करण्यासाठी मॅग्नेशियम एक महत्त्वपूर्ण खनिज असते. त्यामुळे मॅग्नेशियम युक्त पदार्थ खाणे डोक्याच्या त्रासासाठी फायदेशीर ठरतात.
दीर्घ श्वास घेतल्याने सुद्धा दुखीपासून आपणास आराम मिळतो. जेव्हा जेव्हा आपल्याला डोकेदुखी होईल तेव्हा तेव्हा एका जागी शांत बसून, आपण डोळे बंद करा व हळूहळू दीर्घ श्वास घ्या. यामुळे आपल्याला काही मिनिटातच आरामदायक वाटू लागेल व डोकेदुखी पासून आराम मिळेल.
डोकेदुखीचा त्रास थोडाफार असल्यास पेन किलर घेणे घातक ठरू शकतील म्हणून वरील दिलेल्या उपाययोजना जर आपण पेन किलर घेण्याऐवजी वरील उपाय करून बघा डोकेदुखी अगदी सहजपणे मुक्त होईल.
डोकेदुखी होऊ नये म्हणून खालील गोष्टी टाळावे :
आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या हिस्टामाईन नावाचे एक रसायन असते. जे रोगप्रतिकार शक्ती, पाचप तसेच मज्जा संस्थाशी कार्यरत असते आणि याचे प्रमाण जर जास्त झाले तर डोकेदुखीचा त्रास आपल्याला होऊ शकतो. हे रसायन चीज, आंबवलेले पदार्थ, बियर वाइन, बारीक मास यांमध्ये असते. त्यामुळे आपण असे अन्नपदार्थ खाणे टाळायला पाहिजे.
बऱ्याच लोकांना मद्यपान करणे खूप आवडते परंतु मद्यपान करत असताना, आपण मर्यादित केले पाहिजे. अल्कोहोलयुक्त पेय बरेच लोकांचे डोकेदुखीचे कारण ठरते. अल्कोहोलमुळे बऱ्याच लोकांमध्ये तणाव निर्माण होऊन डोकेदुखीचा त्रास निर्माण होतो.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.