Homemade Solution In Glowing Skin In Marathi प्रत्येकाला सुंदर दिसावं असं वाटतं त्यासाठी बरेच लोक खूप मेहनतही घेतात; परंतु बऱ्याच लोकांना या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी काही करावेसे वाटले, तरी त्यांच्याकडे त्याकरता वेळ नसतो. म्हणून बरेच लोक कृत्रिम मेकअप प्रॉडक्टचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करतात. अनेकजण पार्लरमध्ये जाऊन सुंदर दिसण्यासाठी पैसे देखील खर्च करताना आपल्याला दिसतात. काही जण घरातल्या वस्तूंचा वापर करून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात. सुंदर दिसण्याकरता अनेक महिला महागडे ब्युटी प्रॉडक्ट वापरतात.
तुमच्या चेहऱ्याचा सौंदर्य हरवलंय… जाणून घ्या सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय Homemade Solution In Glowing Skin In Marathi
बऱ्याच महिला आपल्या त्वचेवर महागडे आणलेल्या प्रॉडक्टचा वापर करून सुंदरता वाढवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याचा परिणाम उलट होतो. कधी कधीही प्रॉडक्ट सूट होईलच असं नसतं. असे प्रॉडक्ट कधीकधी आपल्याला खूपच हानी पोहोचवून जातात. त्याचा परिणाम म्हणजे की, आपल्या चेहऱ्याचा जेवढा चांगला लुक आहे. त्यापेक्षा खराब लुक आपल्याला दिसतो. त्यामुळे आपण जर असे कोणतेही प्रॉडक्ट वापरत असाल तर त्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
जसजसे वय वाढू लागते तसतसे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येवू लागतात. ही सामान्य गोष्ट आहे परंतु काही लोकांना वयाच्या आधीच चेहऱ्यावर काळे काळपट डाग आल्यासारखे दिसतात. त्यामुळेच वयाच्या तुलनेने आपण जास्त वयस्कर दिसू लागतो. याचे कारण म्हणजे आपण चेहऱ्याची नीट निघा ठेवत नाही किंवा आपल्या आहारातून पाहिजे तेवढे पोषक तत्व आपल्या शरीराला मिळत नाही. चेहऱ्याला सुरकुत्यांपासून जर वाचवायचं असेल तर चेहरा कोरडा होवू न देणे हे सर्वात महत्त्वाचा आहे. यासाठी किमान दोनदा तरी आपण चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा.
चेहरा स्वच्छ करण्यासाठी सौम्य क्लीनसर वापरावा. जेव्हा तुम्ही उन्हात बाहेर जाल तेव्हा उन्हापासून आपल्या त्वचेचे संरक्षण करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे एसपीएफ असलेले सन स्क्रीन लावून आपले त्वचेचे उन्हापासून संरक्षण केले पाहिजे. तर चला मग जाणून घेऊया घरगुती उपाय ज्यामुळे तुमचा चेहरा आणखीन उजडेल व चेहऱ्यावरील काळे डाग सुरकुत्या नाहीश्या होतील.
सौंदर्य वाढवण्यासाठी उपाय :
घरातील बेसन हे एक सौंदर्यवर्धक पदार्थ आहे. बेसन पीठ हे चणा डाळीपासून बनलेलं असावं. त्याचा उपयोग कसा करावा तर दोन छोटे चमचे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा हळद एकत्र करा. दूध टाकून त्याची एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंघोळीच्या आधी अर्धा तास आपण जर साधारणतः रोज लावली तर चेहरा उठावदार व सुंदर दिसेल तसेच चेहऱ्याचा हरवलेला लूक येण्यास सुरुवात होईल.
चेहऱ्यावर किंवा डोळ्यांच्या आजूबाजूला काळी वर्तुळे तयार झाली असेल तर कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलक्या हाताने तेथे मशाज करा. असे केल्याने काळी वर्तुळे हळूहळू कमी होतील.
चेहरा सुंदर न दिसण्याचा आणखीन एक कारण म्हणजे पुरेशी झोप. संपूर्ण शरीर तेव्हा चांगला ते जेव्हा तुम्ही परिपूर्ण झोप घेता. चांगल्या त्वचेसाठी तुम्ही किमान आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा ताण तणाव घेऊ नये. यामुळे अवेळी चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात.
योग्य व पौष्टिक आहार घेणे आवश्यक असते. आहारामध्ये शक्यतो फळे आणि भाज्यांचा देखील समावेश करायला पाहिजे. सकाळच्या नाश्त्यामध्ये दही, कोथिंबीर यांचा समावेश करून ड्राय फ्रुट्स आणि दिवसभर भरपूर पाणी प्या. असे केल्याने आपली त्वचा बऱ्याच प्रमाणात तरुण दिसते.
तुम्हाला जर सुंदर दिसायचे असेल तर तुम्ही ग्रीन टी आईस क्यूब सुद्धा त्वचेसाठी वापरू शकता. यामुळे तुमची त्वचा सुंदर दिसू शकते. त्यासाठी सर्वप्रथम ग्रीन टी बनवा आणि थंड झाल्यावर आईस ट्रेमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून द्या. सकाळी एक आईस क्यूब घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. त्यामुळे त्वचेवरील डाग, सुरकुत्या निघून जातील. आईस क्यूब वापरण्याआधी तो सुती रूमलामध्ये लपेटून घ्या व नंतरच त्वचेवर लावा.
सुंदर व तरुण त्वचेसाठी आणखीन एक उपयोग म्हणजे की जास्तीत जास्त पाण्याची सेवन करा निरोगी आरोग्यासाठी पाण्याचे सेवन करून कधीही फायदेशीर ठरते. त्यामुळे आपण बऱ्याचदा कमी पाणी पितो याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतो. त्यामुळे तुम्ही दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिले पाहिजे.
बऱ्याचदा विनाकारण तणाव आपण घेत असतो. मात्र हा तनाव किंवा ताण आपल्या शरीरासाठी खूपच हानिकारक असतो. याचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील होतो. त्यामुळे जेवढे तणाव मुक्त राहाल तेवढी तुमची त्वचा उजळेल.
चेहरा सुंदर दिसण्यासाठी अर्धा बटाटा व दोन चमचे दूध मिक्स करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण आपल्या चेहऱ्याला व मानेला लावा तसेच हे मिश्रण अर्धा तास तसेच ठेवावं नंतर धुवून टाका. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केल्यास त्वचेतील घाण निघून जाते व काळे डाग नाहीसे होऊन चेहरा उजळतो व सुंदर दिसतो.
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही मलाई ऐवजी दही व मध वापरून चेहऱ्यासाठी फेसपॅक बनवू शकता. त्यामध्ये एक चमचा काकडीचा रस, एक चमचा संत्र्याचा रस, सर्व मिश्रण मिक्स करून चेहऱ्याला पंधरा ते वीस मिनिटे लावा. यामुळे देखील आपला चेहरा उजळतो.
डोळ्यांवरती काळी वर्तुळे असतील तर तुम्ही जायफळ पाण्यात उगवून पिंपल्स किंवा डोळ्यांच्या भोवती लावावे, त्यामुळे ते निघून जातात.
चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर सफरचंद किसून त्यात एक चमचा कच्चे दूध टाका व ही पेस्ट चेहऱ्याला लावा. हा प्रयोग किमान आठ दिवस करा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात.
टोमॅटोच्या आतील गर कुस्करून आपल्या चेहऱ्याभोवती लेप करा. त्यामुळे चेहऱ्याला चमक येते व चेहरा निखारतो.
नियमित व्यायाम करणे हे देखील आपल्या शरीराच्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतो. त्यामुळे नेहमी सकाळी वॉकला जाणे आवश्यक असते. त्यामुळे देखील तुमची त्वचा निखारते व सुंदर दिसते.
लिंबू पाणी पिल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच नियमित लिंबू पाणी पिल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स देखील दूर होतात. त्या व्यतिरिक्त लिंबाची चार-पाच थेंब मुलतानी मातीमध्ये टाका. त्यामध्ये गुलाबजल घालून एक लेख तयार करा. हा लेख चेहऱ्यावर पंधरा मिनिटे राहू द्या. त्यानंतर चेहऱ्यावरील सर्व घाण निघून जाते.
पिकलेल्या पपयाचा गर देखील चेहऱ्याला लावल्यामुळे किंवा लेप लावल्यामुळे बऱ्याच प्रमाणात उजळतो. पपयाचा गर लावत असताना चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करा. अशाप्रकारे ही उपाय नियमितपणे तुम्ही करून पहा. यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.