तुम्ही सांधेदुखीच्या त्रासपासून त्रस्त आहात तर जाणून घ्या घरगुती उपाय : Home Solution In Joint Pain

Home Solution In Joint Pain वयाने एक मर्यादा गाठली की आपले हात पाय दुखणे मागे लागते. ही सामान्य गोष्ट आहे; परंतु आजकाल तरुणांचे देखील हात पाय किंवा सांधेदुखीचे प्रमाण वाढले आहे. त्यामागे आपले धकाधकीची जीवन तसेच योग्य आहार न घेणे, सतत कामात राहणे. हे देखील एक कारण असू शकतं.

तुम्ही सांधेदुखीच्या त्रासपासून त्रस्त आहात तर जाणून घ्या घरगुती उपाय : Home Solution In Joint Pain

रात्री झोपल्यावर किंवा सकाळी उठताना कोणीतरी आपले पाय चेपून द्यावेत, असं तुम्हाला वाटत असेलच कारण दिवसभर ज्या पायांच्या जोरावर आपण सगळीकडे फिर-फिर करत असतो व आपली कामे देखील करत असतो. त्या पायांनी आपल्याला साथ देणे जर बंद केले तर आपल्या दैनंदिन कार्य देखील आपण पूर्ण करू शकणार नाहीत. परंतु त्यासाठी आपण आधीच प्रयत्न केले पाहिजे आधीच आपल्या पायांची किंवा शरीराची निगा आपण राखली पाहिजे. त्यासाठी आपण घरगुती उपचारांचा देखील उपयोग केला पाहिजे.

हातपाय दुखीची कारणे बरीच असू शकतात. जसे बैठकची काम करणे, लठ्ठपणा, हालचाल कमी करणे, अपुरी झोप, पोषक आहार न घेणे, चुकीच्या चपला घालणे, सतत उभे राहण्याची काम करणे इत्यादी कामामुळे हाडाची संबंधित समस्या उद्भवू शकते. ही समस्या महिलांमध्ये तर सर्वच वयोगटात दिसून येते. कधीही पाय एक सारखे ठणकतात तर मध्येच कळा येतात, कधी पायात मुंग्या येतात तर कधी पायांवर सूज येते. अश्या समस्यांवर वेळीच उपाय न केल्यामुळे ही समस्या आणखी वाढत जाते व दैनंदिन कार्यावर देखील त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो.

सांधे दुखीची काही कारणे आहेत जी आपण जाणून घेऊया :

बऱ्याचदा गुडघ्याच्या दुखापती सामान्य असतात. परंतु कधी कधी पाय फ्रॅक्चर झालेला असेल किंवा खाली वाकणे, एखाद्या एक्सीडेंट यामुळे देखील गुडघ्यांमध्ये त्रास होऊ शकतो.

बऱ्याचदा गुडघ्याच्या साध्यातील कुच्या नष्ट होतात. यामुळे देखील हाडांचे घर्षण होते व गुडघेदुखी आपल्याला सुरु होते.

संधिवात हा देखील एक प्रकारचा रोग आहे. ज्यामुळे शरीरातील सर्वच सांधे दुखतात. यामुळे गुडघ्याच्या सांध्याला देखील मोठ्या प्रमाणात वेदना जाणवतात.

सांध्यांचा अतिवापर झाल्यामुळे देखील त्यामध्ये त्रास सुरू होतो. असे बरेच लोक आपल्या दैनंदिन कार्यामध्ये व्यस्त असतात. त्यांना खूप वाकणे किंवा वळणे अशा प्रकारचे काम जास्त करावे लागते. त्यामध्ये धावणे, उडी मारणे यांचा समावेश आहे.

सांधेदुखीवर घरगुती उपाय :

सांधेदुखी हा त्रास थंडीच्या दिवसात जास्त जाणवतो. तो वातावरणातील गारव्यामुळे देखील होतो. बऱ्याचदा आपण वापरत असलेले चप्पल बूट किंवा सॅंडल यांचा परिणाम देखील आपल्या पायांच्या नसांवर होतो. त्यामुळे ही समस्या त्यामुळे देखील होऊ शकते; परंतु चांगल्या दर्जाची चप्पल घेतली तर आपल्या पायांना आराम मिळतो.

आज काल सर्वांच्याच घरात स्टाईल बसवलेल्या असतात आणि या सर्व स्टाईल ठणक असतात. सतत या स्टाईलवर उभभे राहिल्यामुळे महिलांच्या टाचा आणि पावले दुखू शकतात. यामुळे महिलांनी घरात स्लीपरचा नियमित वापर करायला पाहिजे.

शरीराचा रक्तपुरवठा हा सतत खालच्या दिशेने होत असतो. त्यामुळे आपण झोपताना पायाच्या दिशेने उशी ठेवावी. त्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होईल व पाय कमी दुखतील.

जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर शक्य होईल तेव्हा तेलाने मालिश करणे हे खूप फायदेशीर ठरते. यामध्ये पायाची तळवे टाचा व बोटे, पोटऱ्या, गुडघे यांना मालिश करावी. यामुळे शिरा मोकळ्या होऊन आराम मिळतो.

सांधेदुखीचा त्रास असल्यास बडीशोप व सुंठ यांचे मिश्रण करून पाण्यात उकळून घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा एरंडेल तेल घाला. याप्रमाणे तुम्ही महिनाभर घेतल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

जर तुम्हाला साधा वात असेल तर मुठभर ओवा एरंडेल तेल घालून गरम करा. गरम झाल्यानंतर हे मिश्रण एका सुती कापडात बांधून जेथे त्रास होतो तेथे शेकून घ्या. यामुळे सुद्धा तुम्हाला नक्की आराम मिळेल.

सांधेदुखीमध्ये जर वेदना किंवा सूज असेल तर एरंडेलची पाने वाफवून दुखत असलेल्या सांध्यावर बांधून घ्यावेत. त्यामुळे सूज उतरते व वेदनाही कमी होतात.

जास्त पाय दुखत असल्यास वीस ते पंचवीस मिनिटे मीठ टाकून गरम केलेल्या पाण्यात पाय ठेवावे. यामुळे पायातील नसा मोकळ्या होतात व पायांना आराम मिळतो.

आहारामध्ये प्रतिदिन जीवनसत्वे व शरीरासाठी आवश्यक असणारे सर्वच पोषक घटक घेणे गरजेचे असते. जर हे योग्य घटक आपण आहारातून घेतले नाही तर सांधेदुःखी सारखी समस्या निर्माण होऊ शकते तसेच आपण नेहमीच संतुलित आहार घेण्यावर भर दिला पाहिजे.

गुडघ्यामध्ये जास्त वेदना होत असेल किंवा सूज आली असेल तर तेथे बर्फ लावल्याने सूज कमी होते. गुडघ्याला शेक दिल्यामुळे देखील गुडघा बरा होतो. टॉवेल उबदार करून जिथे दुखत आहे. तेथे एकावेळी 15 ते 20 मिनिटे लावा असे दिवसातून चार-पाच वेळा केल्याने त्रास कमी होते.

वरील उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. याव्यतिरिक्त जर तुम्हाला जास्त त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment