तुमच्याही टाचांना भेगा पडतायेत तर मग हे करा उपाय…Home Solution In Crack Heels In Marathi

Home Solution In Crack Heels In Marathi शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आपले पाय. पण नेहमीच पायांकडे दुर्लक्ष केले जाते आणि पायांच्या टाचांना भेगा पडतात. टाचा अगदी फाटल्यासारख्या होतात. त्यामध्ये वेदना देखील होतात. त्यावरील उपाय करणे ऐवजी त्या पायाच्या टाचांना झाकण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु आपण वरून किती छान राहण्याचा किंवा दिसण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा टाचा भेगाळलेल्या आणि फाटलेल्या असतील तर सौंदर्याचा निरीक्षण करणारे त्यामध्ये नक्कीच खोट नक्कीच काढतील व आपले सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतील. सौंदर्य केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत नसून टाचांपर्यंत पाहिलं जावं व ते जपलं जावं. त्याबद्दल तुम्ही टाचांना भेगा पडल्या असतील तर त्यावर त्वरित उपचार करावे तसेच आम्ही तुमच्याकरता खास घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. तर चला मग जाणूया त्याविषयी सविस्तर माहिती.

तुमच्याही टाचांना भेगा पडतायेत तर मग हे करा उपाय…Home Solution In Crack Heels In Marathi

बऱ्याचदा थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या त्वचेची आपण खूपच काळजी घेतो. कारण आपली त्वचा कोरडी पडली तर आपल्याला त्रास सुरू होतात. जसे त्वचेवर रेष येतात, अंगाला खाज येते, पांढरी त्वचा होते. त्याचप्रमाणे पायांच्या टाचांना देखील भेगा पडणे सुरू होतात. हा त्रास सर्वांनाच सुरू होतो. हिवाळ्यामध्ये वातावरणात ओलावा कमी असल्यामुळे हा त्रास होऊ शकतो.

हा त्रास अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. सहसा टाचांना भेगा पडण्याची प्रमाण महिलांमध्ये खूप जास्त असल्याचे आढळून आले आहेत; परंतु भारतातील लोक याकडे दुर्लक्ष करतात. गांभीर्याने ही गोष्ट घेत नाही. परंतु टाचांना भेगा पडायला सुरुवात झाली असता, त्याकडे वेळेवर लक्ष देणे गरजेचे असते.

बऱ्याचदा पाय बुटांमध्ये झाकलेले असल्यामुळे आपल्याला एकच कारण मिळतं त्यांना दुर्लक्षित करायचं परंतु पायांना पडणाऱ्या या भेगा अत्यंत वेदनादायी ठरू शकतात. म्हणून वेळीच उपचार घेणे गरजेचे असते. त्यामध्ये कधी कधी वरची कातडी निघते. तर कधी खोलपर्यंत भेग होते व त्यातून बऱ्याचदा रक्तस्त्राव देखील होऊ शकतो तसेच त्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकते.

पायांच्या भेगांचे हे समस्या कमीत कमी त्रासदायक आजार आहेत; परंतु भेगा जेव्हा खोलवर जातात. तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन वेळीच उपचार घेणे फायदेशीर ठरते. कारण सुरुवातीला जर आपण त्याकडे लक्ष दिले नाहीत तर तुम्हाला खूप नुकसान किंवा त्रास सहन करावा लागू शकतो. ज्यांना मधुमेह झाला आहे. त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण या भेगा खोलवर गेल्यामुळे त्यांना संसर्ग होऊन पाय सडण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे मधुमेह रोगींनी पायांना खूप महत्त्व दिले पाहिजे व त्याची काळजी घेतली पाहिजे.

तर चला मग जाणून घेऊया पायांना भेगा पडण्याची कोणती कारणे आहेत :

पायांना भेगा पडण्याची अनेक कारणे आहेत. जसे उघड्या असणाऱ्या चपला किंवा बूट कायम वापरणं त्यामुळे पायावर धूळ जमा होते व धुळांमुळे देखील पायांना भेगा पडू शकतात. दिवसभर तासंतास उभे राहणे. अतिउष्ण तापमान, सतत थंड पाण्याशी संपर्क जीवनसत्व किंवा खनिजांची कमतरता. यामुळे देखील आपल्या पायांना भेगा पडू शकतात.

थायरॉईड या ग्रंथीचे कार्यक्षमता कमी होणे, केमिकल युक्त साबणाचा वापर करणे, थंड वातावरणामुळे हवेतील ओलावा कमी होतो व त्यामुळे देखील आपल्या पायांना भेगा पडू शकतात. याव्यतिरिक्त अजूनही काही असू शकतात; परंतु आपण आपल्या पायांना नियमितपणे मसाज करायला पाहिजे कारण आपली त्वचा कोरडी पडू लागते तेव्हा हा त्रास होऊ शकतो.

चला तर मग जाणून घेऊया पायांना पडणाऱ्या भेगा बरे होण्यासाठी घरगुती उपाय :

पायांच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर त्यासाठी पाय स्वच्छ करून ग्लिसरीन किंवा गुलाब जल पायांना रात्री लावावे. त्यानंतर पायामध्ये मोजे घालावे.

पाच स्ट्रॉबेरी, एक चमचा खडे मीठ, दोन चमचे बदाम तेल एकत्र करून पेस्ट बनवावी. त्याचा लेप पायांना लावावा. हा लेप पायांवर वीस मिनिटे राहू द्यावा. 20 मिनिटानंतर पाय धुऊन घ्यावे.

बदामचा स्क्रब वापरावा पायाला लिंबू चोळून घ्यावे. जेष्ठमध पावडर आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण 30 मिनिटे पायाला लावा.

ज्यांना ड्राय स्किन, सोयरासिस सारखा आजार असेल त्यांनी खोबरेल तेल देखील वापरले तरी चालेल. खोबरेल तेल तुमच्या त्वचेला ओलावा टिकून ठेवण्यास मदत करते. सर्वप्रथम कोमट पाण्यात पाय भिजवत घालावे व नंतर खोबरेल तेलाने त्यावर मालिश करावे.

जर तुम्हाला असे वाटत की, पायातील भेगांमध्ये रक्तस्राव किंवा इन्फेक्शन झाले असेल तर खोबरेल तेलामुळे ते बरे होऊ शकते. कारण अँटीबायोटिक आणि अँटिमायक्रोबियल असे गुणधर्म म्हणजेच त्याला प्रतिबंध करण्यासाठी खोबरेल तेल मदत करू शकते. भेगा पडलेल्या टाचांवर मध देखील नैसर्गिक उपाय म्हणून काम करू शकते.

पाण्यात पाय भिजवल्यानंतर तुम्ही फूट स्क्रब म्हणून मध देखील वापरू शकता. फूट माक्स म्हणून देखील रात्रभर तुम्ही हे स्क्रब लावू शकता.

तसेच एक केळ एका बाऊलमध्ये व्यवस्थित स्मॅश करून त्याची छान पेस्ट तयार करा. त्यानंतर पाय स्वच्छ धुऊन घ्या. तयार झालेली पेस्ट पायाच्या भेगांवर लावा. या पेस्टमध्ये तुम्ही गुलाब जल देखील वापरू शकता. दहा ते वीस मिनिटं पायांना ही पेस्ट लावून ठेवा व त्यानंतर पाय धुऊन घ्या.

हिल बाम : पायांना भेगा पडलेली समस्या सुरू होताच अँटीहिल क्रॅक क्रीम किंवा बाम वापरायला सुरुवात करावी. ही क्रीम तुमच्या टाचांना मुलायम व सुंदर बनवून त्रास कमी होतो. दररोज रात्री हा उपाय करावा. बाम लावण्या अगोदर पाय स्वच्छ धुऊन कोरडे करावे. मग त्यावर हलक्या हाताने क्रीम लावून हा उपचार नियमित करावा म्हणजे भेगा जातील. पायांना भेगा पडल्यास घरात सुद्धा आपण स्लीपर वापरू शकता. त्यामुळे त्याचा फाटत नाही.

पायांच्या टाचा कमी करण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे टपातमध्ये गरम पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ, अर्धा कप लिंबाचा रस व दोन चमचे ग्लिसरीन, दोन चमचे गुलाब जल घाला व मिश्रण एकत्र करा. पायांना जवळपास 15 मिनिटे या पाण्यामध्ये भिजवत घाला. त्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे पायांच्या भेगा मुलायम तसेच हा उपाय आठवड्यातून दोनदा तरी केला पाहिजे.

पायांच्या टाचांची मसाज कशी करावी.

पायाच्या टाचांना भेगा पडू नये म्हणून किंवा पडल्यानंतर पायाच्या टाचांची मसाज करणे फार उपयोगी ठरते.

एक चमचा लोणी, पाव चमचा आंबेहळद मिक्स करून घ्या. तसेच पायाला मसाज करा. अर्ध्या तासानंतर पाय धुऊन घ्या. नियमित पेडिक्युअर करा. डायबेटीसच्या लोकांनी कोमट पाण्यात शाम्पू घालून पाय धुवावे. नंतर पाय पुसून ग्लिसरीन लावून मोचे घालावे.

थंडीच्या दिवसात रोज आपले पाय तपासून पाहणे आवश्यक आहेत. यामुळे आपल्या पायांची त्वचा सॉफ्ट होते. नखे देखील सुंदर दिसू लागतात. त्वचा फाटली असल्यास त्यातील वेदनांना देखील आराम मिळतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या टाचांची काळजी घ्या. जर पायाच्या टाचातील भेगांमधून रक्तस्त्राव होत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना ही शेअर करा.

Leave a Comment