काय तुम्हाला ही आम्लपित्ताचा त्रास होतोय? तर जाणून घ्या त्या विषयी उपाययोजना : Home Remedies Of Hyperacidity

Home Remedies of Hyperacidity आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटी हा आजार असून बऱ्याच लोकांना हा त्रास जाणवतो. काही लोकांना ऍसिडिटीपासून खूपच त्रास सहन करावा लागतो. सर्वच लोक घरच्या घरी काही ना काही उपाय करून बघतात परंतु त्यांना आराम मिळत नाही आम्ही दिलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला आराम मिळेल. आज आपण आम्लपित्त विषयी माहिती जाणून घेणार आहोत. ते कशामुळे होते? त्याचे उपाययोजना काय आहेत?

काय तुम्हाला ही आम्लपित्ताचा त्रास होतोय? तर जाणून घ्या त्या विषयी उपाययोजना : Home Remedies of Hyperacidity

बदलत्या जीवनशैलीमध्ये अपुरी झोप तसेच अवेळी खाने-पिणे यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतोय. यामुळे ऍसिडिटी म्हणजेच आम्लपित्ताचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. शरीराला ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या आपण दिल्या पाहिजेत.

तसेच खाण्याचे चोचले देखील आपण कमी केले पाहिजे. बाहेरील खाणे आपल्या शरीरासाठी हानिकारक असले तरी देखील आपल्या शरीराची काळजी न घेता आपण बाहेरील खाणे पिणे, जंक फूड मोठ्या आवडीने खात असतो. परिणामी आपण ऍसिडिटी सारख्या त्रासाने ग्रस्त होतो. जर तुम्ही अवेळी खाल्ले तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

तसेच अपुऱ्या झोपेमुळे सुद्धा आरोग्याचा संपूर्ण दिवसावर परिणाम होत असतो. जेवनामध्ये काही नियम बनवायला हवेत तसेच त्या नियमांचे आपण काटेकोरपणे पालन करायला हवे. यामुळे तुम्ही तुमचे शरीर सुदृढ व निरोगी ठेवू शकता.

ऍसिडिटीची कोणती कारणे आहेत?

तर ऍसिडिटी होण्याचे कारण ती म्हणजे अतिशय चिंता, मसालेदार पदार्थ खाणे, धावपळ, अनियंत्रित खाणे पिणे, जागरण, राग इ.

आहारामध्ये अति तिखट, अति आंबट पदार्थ खाणे त्याचप्रमाणे हरभरा, तुरीची डाळ, दही लिंबू मसूर डाळ लोणचं यांचं अति प्रमाणात सेवन करणे, तसेच चहा, कॉफी यांचं प्रमाण वाढवणे, अवेळी जेवणे, घाई घाई जेवणे, तंबाखू खाणे, दारू पिणे आणि अनियमित पोट साफ न होणे ह्या गोष्टी आम्लपित्ताला कारणीभूत असतात.

आम्लपित्ताची लक्षणे जाणून घ्या :

तुम्हाला आम्लपित्त झाले आहे हे कशावरून कळते तर शरीरामध्ये पित्ताचे उत्पादन जास्त होणे म्हणजेच ऍसिडिटी होय. ही ऍसिडिटी कोणालाही होऊ शकते. याचे प्रथम लक्षण म्हणजे छातीमध्ये जळजळ होणे किंवा हृदय जवळ जळजळ होणे तसेच आंबट ढेकर येणे, मळमळ करणे, गळ्यात जळजळ होणे, उलटी होणे, पोटात गॅस तयार होणे, पोट जड वाटणे, छातीत दुखणे, श्वासाची दुर्गंधी, पायामध्ये आणि हातामध्ये जळजळ, थकवा, चक्कर येणे व पूर्ण शरीरामध्ये खाज येणे हे सर्व ऍसिडिटी ची लक्षणे आहेत.

तर चला मग जाणून घेऊया आम्लपित्तावर घरगुती उपाय

ऍसिडिटीचा त्रास जर तुम्हाला होऊ द्यायचा नसेल तर सकाळी लवकर उठणे व रात्री लवकर झोपणे यामुळे देखील बऱ्याच कमी प्रमाणात ॲसिडिटीचा त्रास होतो.

तुम्हाला जर ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर तुम्ही सकाळी आणि रात्री दररोज एक चमचा साजूक तूप एक कप दुधातून घेतल्यास तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास कमी झालेला जाणवेल शक्य नसल्यास तुपाचा उपयोग तुम्ही जेवणामध्ये सुद्धा करू शकता.

तुमच्या शरीरात उष्णता खूप वाढली असेल व त्यामुळे जर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर तुम्ही तांदळाचे किंवा भाताचे पाणी पिले तर हा त्रास तुम्हाला कमी झालेला दिसेल तसेच शरीराची उष्णता देखील कमी होईल.

ऍसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी आपल्याला जेवणाचे रुटीन व्यवस्थित चालवावे लागेल. सकाळचा नाष्टा भरपेट करून घ्यावा तसेच दुपारी बाराच्या दरम्यान जेवण करून घ्यावे व रात्रीचे जेवण संध्याकाळी सातच्या आत घेणे आवश्यक असते. असे केल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास कमी झालेला दिसून येतो.

ऍसिडिटी कमी करण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे काळ्या मनुक्याचे पाणी तुम्ही प्यायला हवे.
यामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट असतात आणि मुख्य म्हणजे हे पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो. हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आराम पडेल.

तुम्हाला जर ऍसिडिटीचा त्रास जाणवत असेल तर तुम्ही नियमित केळे सेवन केले पाहिजे. कारण त्यामधून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो. त्यामुळे पोटातील आम्ल निर्मितीची प्रक्रिया कमी होते. तसेच फायबर शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे आम्लाचा विघातक परिणाम कमी होतो व आपल्या शरीराचे रक्षण होते.

तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. तसेच प्रत्येकाच्या घरी तुळस ही आढळतेच जर तुम्ही दररोज तुळशीची पाने खाल्ली तर ऍसिडिटी पासून तुम्हाला आराम मिळतो. परंतु त्यासाठी तुम्हाला तुळशीची जर रोज चार ते पाच पाने चावून खावी लागेल.

दुधामुळे देखील ऍसिडिटीचा त्रास कमी होऊ शकतो. कारण दुधामध्ये कॅल्शियम असतं आणि कॅल्शियमच्या घटकांमुळेच पोटात तयार होणारं आम्ल निर्मिती थांबते व अतिरिक्त आम्ल दूध खेचून घेते.
थंड दूध घेतल्यास पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते. दूध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर व इतर पदार्थ न मिसळता प्यावे. हवे असल्यास, त्यात चमचाभर साजूक तूप घालून तिने फायदेशीर ठरते.

वेलची ही शरीरातील वात कफ व पित्त यांच्यामध्ये समतोल राखण्याचे काम करते. तसेच स्वादाला सुगंधी व औषध गुणांनी परिपूर्ण असते म्हणून तुम्ही वेलची पूड खाणे केव्हाही फायदेशीर ठरते. जेवण झाल्यानंतर जर तुम्ही वेलची पूड खाल्ली तर ते अन्न सुद्धा व्यवस्थित पचवते. पित्ता पासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून पाण्यात टाकून उघडा व थंड झाल्यानंतर हे पाणी पिऊन घ्या. असे केल्यास त्वरित तुम्हाला आराम मिळेल.

पुदिना हे पोटातील आम्लाची तीव्रता कमी करते. पुदिन्यातील वायुहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिनातील थंड हवेमुळे पोटदुखी व जळजळ देखील थांबते. पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्याची पाने बारीक करून व पाण्यात उकळून घ्या. थंड झाल्यानंतर हे पाणी पिल्यामुळे सर्दी डोकेदुखी व पित्ताचा त्रास थांबतो.

भारतीय स्वयंपाक घरात प्रामुख्याने वापरले जाणारे आलं हे औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. मात्र आल्याच्या सेवनाने आपले अन्नपचन होते. तसेच पोटातील अल्सर सारख्या बिमारीशी सामना करून त्याचा फायदा आपल्याला होतो. आल्यातील तिखट व पाचक रसामुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा सगळंच रहा. जर तुम्हाला आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून पाणी प्यावे.

चवीला आंबट असणारा आवळा हा कफ व पित्तनाशक असून त्यातील विटामिन सी ही अन्ननलिका व पोट साफ ठेवण्यास मदत करते. रोज एक चमचा आवळा पावडर घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही. तसेच कच्चा आवळा मीठासोबत खाल्ल्यामुळे शरीरास पोषक घटक मिळतात.
तर मित्रांनो तुम्हाला ही पित्ताचा त्रास होत असेल तर सर्व उपाय तुम्ही घरी करून बघू शकता.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment