Home Remedies Of Ear Pain खूप लोकांना सवय असते, कानात खाज सुटल्यानंतर बोट किंवा आगपेटीची काळी तसेच सेफ्टी पिन कानामध्ये घालून खाजवण्याची; परंतु असे करणे केवळ कानासाठी धोकादायक आहे असे नाही, तर त्यातून कानात संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. कानात संक्रमण होऊन सूज येते, कानात मळ जमा होणे किंवा दबाव इत्यादीमुळे हे सर्व घडू शकते. जर तुमच्या कानात संसर्ग झाला असेल व कान दुखत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन लगेच उपचार करून घ्यावा. कान दुखी झाली असल्यास त्यावर घरगुती उपचार पाहूया तसेच कोणत्या कारणामुळे कान दुखी होते हे जाणून घेऊया.
तुम्हाला कान दुखीचा त्रास आहे…. तर जाणून घ्या त्यावर घरगुती उपाय….! Home Remedies Of Ear Pain
बऱ्याचदा थंड हवामानामुळे आपल्या कानांमध्ये हलक्या वेदना सुरू होतात. त्यावर उपचार म्हणून चहाच्या झाडांचे तेल देखील तुम्ही वापरू शकता. चहाच्या झाडाच्या तीन चार थेंब, तिळाच्या तेलाचे चार-पाच थेंब गरम करा. यानंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर कानामध्ये कापसाच्या साह्याने दोन-तीन थेंब टाका. तेल कानात टाकत असताना त्याची शुद्धता राखली पाहिजे. नाहीतर कानामध्ये कचरा जाऊ शकतो.
कानामध्ये वेदना होत असल्यास कडुलिंबाचे तेल तुम्ही घालू शकता, यामुळे कानात झालेला संसर्ग बरा होतो. कडुलिंबाचे तेल हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे बऱ्याच रोग या तेलापासून बरे होतात.
कडुलिंबाच्या तेलाचे दोन ते तीन थेंब गरम करून थंड होऊ द्या व नंतर कापसाच्या सहाय्याने या मिश्रणाचे एक ते दोन थेंब कानात टाका.
तुमच्या कानाजवळ नेहमी सूज येत असेल तर गरम पाण्यात टॉवेल भिजवून पिळून घ्या. त्यानंतर हा कोरडा गरम टॉवेलने कानाभोवती शिकून घ्या. असे करत असताना टॉवेल जास्त गरम नसावा. कानातील सौम्य वेदना या उपायामुळे नाहीशा होतील किंवा कमी होतील. लहान मुलांसाठी ही पद्धत उपयोगी ठरू शकते.
कान दुखण्यावर एक आणखीन उपचार म्हणून त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. यासाठी अर्धीवाटी पाणी किंवा त्यापेक्षा कमी गरम पाणी करून घ्या. त्यामध्ये दोन ते तीन चिमूट हिंग मिक्स करून घ्या. आता हे पाणी थंड झाल्यानंतर कापसाच्या मदतीने कानात एक किंवा दोन थेंब घाला. पाणी कानात टाकत असताना जास्त गरम नसावे. कान दुखी झाले असल्यास गरम पाण्याच्या पिशवीने काम शिकून घ्यावा, त्यामध्ये तेल घालू नये.
घर कामांमध्ये कीटक, पाखरू असे केले असल्यास काना तीव्र वेदना होतात. अशा वेळी आपण कान काडीने कोरणे चुकीचे ठरते. डॉक्टरांकडे जाऊन कानाची तपासणी करून घ्यावी व त्यांच्याकडूनच कानातून मळ बाहेर काढून घ्यावा.
नाकातल्या संसर्गामुळे काही वेळा स्त्राव कानावाटे बाहेर पडतो. त्यावर सर्दी बंद होईल असे उपाय आपण करायला पाहिजे.
कानामध्ये मळ साचल्यामुळे कान शेकावा म्हणजे आतील मळ कोरडा होऊन आपोआप बाहेर पडतो. काही वेळा मात्र कानात कधीकधी मळ चिपकून बसतो. अशावेळी तज्ञ डॉक्टरांकडूनच मळ बाहेर काढून घ्या. आपण कानामध्ये आगपेटीची काळी किंवा इतर साहित्य घातले तर कानाचा पडदा फाटण्याची शक्यता असते.
बऱ्याचदा आपण कानामध्ये दागिने अथवा कान टोचून घेतले असल्यास ते चिघळतात. त्यावर तेल घालावे, यामुळेकान चिघळणे बंद होते. कान फारच चिघडून तेथे संसर्ग होते. मात्र असे झाल्यास तुम्ही डॉक्टरांकडून इलाज करून घ्यावा.
जर तुमचे कान दुखत असतील तर कान दुखी पासून मुक्त होण्यासाठी आलो हे फायदेशीर ठरू शकतो कारण आल्यामध्ये नैसर्गिकता अँटीइम्फ्लमेट्री गुणधर्म असतात. जे कान दुखीच्या त्रासापासून तुम्हाला वाचवू शकतात.
तसेच कानाला खाज झाली असेल तर त्यापासून देखील तुम्हाला आराम मिळतो. आल्याचा रस कानाच्या सभोवती लावा. आल्याचा रस हा गरम करून तेलामध्ये मिक्स करा. हे मिश्रण कानाच्या बाहेरून व मागच्या बाजूला लावावे आल्याचा रस चुकूनही कानामध्ये घालू नये.
बऱ्याचदा लसूनचा उपयोग कान दुखी किंवा जेथे वेदना होतात तिथे केला जातो. कारण तसं हे एक औषधी वनस्पती असून त्यामध्ये एंटीबायोटिक हो वेदनाशामक गुणधर्म आहेत त्यामुळेच लसणाचा वापर दुःख किंवा ऍलर्जी झाली असेल तेथे केला जातो. तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल गरम करा व त्यामध्ये लसूण ठेचून घाला. काही मिनिटे भिजू द्या.
हे मिश्रण थंड झाल्यानंतर जेथे खाज सुटण्याची प्रक्रिया सुरू झाली तिथे हे तेल लावा. यामुळे नक्की आराम मिळतो.
ऑलिव्ह ऑइलचा उपयोग कान दुखीवर केला जातो. कानामध्ये ऑलिव्ह ऑइलचे थेंब टाकल्यामुळे कान दुखी थांबते व कानामध्ये ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब टाकणे देखील सुरक्षित मानले जाते. लहान मुलांच्या बाबतीत मात्र हे तेल वापरणे टाळावे.
जर कानामध्ये सतत खाज येत असेल तर घरातील कोरफडचा तुम्ही वापर करू शकता. डोके एका बाजूला झुकून एलोवेरा जेलचे तीन ते चार थेंब कानात टाकू शकतात. तसेच ते बाहेर काढण्यापूर्वी काही सेकंद ते थेंब कानातच राहू द्या कोरफड कानाच्या आतील भागातील पीच पातळी सुधारते. त्याचे गुणधर्म संसर्ग असेल तर ते दूर करतो.
खाज येत असेल किंवा जळजळ करत असेल तर त्या ठिकाणी शांत करते.
अशाप्रकारे आम्ही दिलेले घरगुती उपाय तुम्ही करून पाहू शकता परंतु तुम्हाला जर जास्त त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरेल.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.