घशात कफ जमा झाला सतत खोकला येतोय…. तर चिंता करू नका जाणून घ्या घरगुती उपाय.. Home Remedies Of Cold Cough

Home Remedies Of Cold Cough बऱ्याचदा थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला सर्दी, खोकला व कफ यांसारखे आजार होतात. परंतु असे आजार झाल्यास आपण त्वरित घरगुती इलाज करायला हवा. ज्यामुळे दवाखान्यामध्ये जाण्याची वेळ येणार नाही तसेच नेहमीच सर्दी-खोकला होत असेल तर दिलेले उपाय तर तुम्ही नेहमीच करून पाहायला पाहिजे.

घशात कफ जमा झाला सतत खोकला येतोय…. तर चिंता करू नका जाणून घ्या घरगुती उपाय.. Home Remedies Of Cold Cough

सर्दी दोन-तीन दिवसात बरी होते; परंतु बऱ्याचदा खोकला लवकर बरा होत नाही. पण काही जणांचा खोकला मात्र लवकरच बरा होतो. या खोकल्यामुळे कधी कधी आपल्या छातीमध्ये दुखतं तर छाती जड झाल्यासारखे वाटते, आवाज देखील बसतो, श्वासाची दुर्गंधी सुद्धा कधी कधी येऊ शकते. हे सर्व घशात कफ तयार झाल्यामुळे होते. यावर अनेक घरगुती उपाय आहेत. तर या पोस्टमध्ये कफ कमी होण्याची घरगुती उपाय बघणार आहोत.

कफची समस्या थंडीच्या दिवसांमध्ये जास्त होते. त्यामुळे कफ झाल्यावर तुम्ही थंड पदार्थांचे सेवन करणे टाळावे तसेच कफ कमी करण्यासाठी तुम्ही गरम पेय घेतली पाहिजे. गरम सूप पिल्याने सुद्धा कपची समस्या बरी होते.

जर तुम्हाला कफ झाला असे वाटत असेल तर तेव्हा तुम्ही धूम्रपान करणे टाळावे कारण धूम्रपान केल्यामुळे आणखीन हा त्रास जास्त वाढतो. तसेच कफ झाल्यास किंवा घशामध्ये खवखव झाल्यास तुम्ही जर सातत्याने गरम मिठाच्या गुळण्या टाकल्या तर कफची समस्या बऱ्याच प्रमाणात साफ होते.

घशामध्ये सारखा कप तयार होत असेल तर फुफ्फुसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. तसेच आरोग्य विषयीच्या समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळे आपण कफ झाला असल्यास वेळीच काळजी घेणे गरजेचे असते.

कप छातीत जमा होण्याची कारणे :

छातीत कफ जमा होण्याची अनेक कारणे आपल्याला माहित असेलच त्यामध्ये विषाणू संसर्ग किंवा फ्लू झाल्यानंतर घशात कप तयार होतो. यामुळे सर्दी, खोकला व ताप तसेच घशात कफ जमा होऊ लागतो. एखाद्या गोष्टीची एलर्जी असल्यास कफाचा त्रास जास्त होतो.

जर कफ बराच काळ घशात राहिला तर फुफुसांचा गंभीर आजार बनू शकतो म्हणून याकडे दुर्लक्ष करू नका. फुफ्फुस आणि खालच्या श्वसनमार्गाद्वारे कफ निर्माण होतो. आणि कपमध्ये बॅक्टेरिया विषाणू जमा होऊ लागतात.

कफ काढण्यासाठी घरगुती उपाय :

कोरडा कप असेल तर अशा कफपासून सुटका मिळवण्यासाठी स्टीम घेणं चांगलं ठरू शकतं. स्टीम घेतल्यानंतर डीहायड्रेशनपासून बचाव होतो. त्यासाठी एका भांड्यातील पाण्यात हर्ब किंवा एसएन्शिअल ऑइल जसे की, निलगिरी रोजमेरी ऑइलचे काही थेंब टाकावे. स्टीम घेताना काही सेकंदाचा ब्रेक घ्यावा, नाही तर स्किन जळू शकते.

प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असणार आलं हे खूप उपयोगी आहे. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जे सर्दी खोकला दूर करण्यासाठी उपयुक्त असतात. जर तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही आल्याची किसून किंवा ठेचून त्याचा रस काढावा व तो सेवन करावा. तसेच तुम्ही आलं पाण्यात उकडूनसुद्धा पिऊ शकता.

सर्वांच्या स्वयंपाक घरात आढळणारी हळद बहुउपयोगी आहे. केवळ स्वयंपाक घरातच हळदीचा उपयोग होतो असे नव्हे समजणाऱ्या प्रसाधनापासून ते औषधीपर्यंत हळदीचा उपयोग केला जातो. हळदीची अँटी बॅक्टेरियल गुणधर्माने परिपूर्ण आहे. त्यामुळे मुलांना किंवा मोठ्यांना सर्दी खोकला झाला असल्यास हळद घातलेले दूध पिण्यास द्यावे, यामुळे लगेच आराम मिळतो.

कफची समस्या नेहमी सतावत असेल तर वाफ घेणे देखील फायदेशीर ठरते. वाफेची उष्णता घसा आणि नाकातून शरीरात गेल्यानंतर कफ कमी होतो. बऱ्याचदा डॉक्टर आपल्याला वाफ घेण्याचा देखील सल्ला देतात.

तुम्ही कफ कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा देखील उपयोग करू शकता. एक चमचा मध आणि दोन चमचे लिंबाचा रस एकत्रित करून प्या. त्यामुळे घशाला आराम मिळतो. तसेच कफची समस्या देखील दूर होते कारण मधामध्ये जिवाणुरोधक आणि बुरशी रोधक गुण असतात लिंबामध्ये सी जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे घशाला लगेच आराम मिळतो.

प्रत्येकाच्या घरात मसाल्यामध्ये असणारी काळी मिरी थोडी तिखट आणि कडूसर चवीची असली तरी ती वातदोष कमी करण्यात अत्यंत फायदेशीर आहे. काळ्या मिरीचा चहा घेतल्यामुळे कफ कमी होतो. तसेच खोकला देखील कमी होतो. म्हणून काळी मिरीची पूड एक ग्लास पाण्यात उकडून घ्या व थंड झाल्यानंतर त्या पाण्याचे सेवन करा. यामुळे देखील तुम्हाला बरे वाटेल.

कफ काढण्यासाठी बऱ्याचदा पानात ओवा खायला देतात. यामुळे घशातील कफ कमी होतो. ओव्यामध्ये घशातील कफ दूर करण्याचे घटक असतात. ओव्याच्या पानांचा रस सेवन केल्यामुळे देखील कफ दूर होतो आणि घशाला आराम मिळतो. ओव्याच्या पानांमध्ये फ्लेवोनोइड्स नावाची तत्व असते. ज्यामुळे खोकून-खोकून घसा जरी सुजला असेल तरी घशाला लगेच आराम मिळतो.

कफ दूर करण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे पेपरमिंट पेपरमिंटची पाने म्हणजे पुदिन्याची पाने आपल्या ही लीग तत्त्वासाठी बरीच प्रसिद्ध असली तरी त्यामध्ये मेथॉल हा घटक असतो. जो घशातील खवखव कमी करतो व यामुळे कफ निघून जाण्यास देखील मदत होते. तुम्ही पेपरमींटचा वापर चहामध्ये देखील करू शकता.

घसा कोरडा झाला असल्यास किंवा कोरडा खोकला येत असल्यास त्यासाठी लसुन खूप फायदेशीर ठरतो.
कारण लसणामध्ये अँटिऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल व अँटिबायोटिक असे गुणधर्म असल्यामुळे घशाच्या दुखण्यापासून लसुन खाल्ल्यामुळे लगेच आराम मिळतो. तुम्ही लसणाच्या दोन कळ्या ठेचून त्यामध्ये मध मिक्स करून दोन ते तीन वेळा चाटण केल्यास खोकल्यापासून आराम मिळतो.

आरोग्य नेहमी चांगले रहावे यासाठी बऱ्याचदा पुदिन्याचे तेल देखील छातीला लावले जाते. त्यामुळे छातीत साचलेला कफ नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यास मदत होते. गरम पाण्यात तेलाचे काही थेंब टाकून त्या पाण्याची वाफ घेतली तर कफची समस्या दूर होते.

द्राक्षांचा रस देखील बऱ्याच आजारांमध्ये खूप फायदेशीर ठरतो. कारण त्यामध्ये हेरास्टीलवेन नावाचा पदार्थ असतो. त्यात भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात. जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तसेच हा घटक छातीतील कफ काढून टाकण्यास देखील फायदेशीर ठरतो. जमा झालेला कफ बाहेर पडण्यासाठी द्राक्षाच्या रसात दोन चमचे मध घालून रोज प्यावे असे केल्यामुळे कफ बाहेर पडण्यास मदत होते. तसेच द्राक्षांच्या रसात मीठ, काळीमिरी मिसळून पिणे खूप फायदेशीर ठरतं.

तुम्हाला कफ झाला असल्यास थंड पाण्याची कोमट पाणी पिणे योग्य राहील. कफ झाल्यास कोमट पाणी पीत रहावे. त्यामुळे घशातील निर्माण होणाऱ्या कफाचे प्रमाण कमी होते. लिंबू पाणी किंवा लेमन टी सारखे पेय पिल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहतं व आपला घसा देखील ओलसर राहण्यास मदत होते. तर मित्रांनो तुम्हाला जर आमचे घरगुतीउपाय आवडले असतील तर नक्कीच उपयोग करा व कफापासून मुक्ती मिळवा. तसेच तुम्हाला जर जास्त त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment