उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला घामोळ्याचा त्रास होतोय….तर जाणून घ्या त्यावर घरगुती उपाय Home Remedies For Prickly Heat

Home Remedies For Prickly Heat उन्हाच्या दिवसांमध्ये घामोळ्या येणे ही एक सामान्य बाब आहे. परंतु हा एक त्वचा रोग आहे. जे आपल्या त्वचेमध्ये घाम अडकल्यामुळे होतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हवामान दमट असल्यामुळे बऱ्याच लोकांना हा त्रास होत असतो. काही दिवसांनी मात्र हा त्रास निघून जातो. परंतु कधी कधी घामोळ्या त्वचेवर एवढ्या घातक परिणाम करतात की, खूप जास्त त्रास देऊ लागतात. त्यामधून सुटणारी खाज आणि जळजळ खूपच त्रासदायक असते. त्यामुळे आपण बाजारामध्ये मिळणाऱ्या घामोळीच्या पावडरचा वापर करत असतो. परंतु असे केल्यामुळे पावडर त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊन त्यांना ब्लॉक करते. त्यामुळे ही समस्या आणखीन वाढू शकते. याशिवाय तुम्ही तेथे बर्फ लावू शकता. तसेच त्वचा कोरडी ठेवल्यामुळे घामोळ्या कमी होतात याशिवाय लवकर त्रास सुद्धा कमी होतो.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला घामोळ्याचा त्रास होतोय….तर जाणून घ्या त्यावर घरगुती उपाय Home Remedies For Prickly Heat

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घामोळ्या ह्या लहान ते मोठ्यापर्यत सर्वांनाच होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळा हा ऋतू खूपच तापदायक जातो. अशा या गर्मीच्या वातावरणामध्ये शरीरावर अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. गरम वातावरणामध्ये शरीराला खूपच घाम येतो त्यामुळे शरीरावर लालसर रंगाचा थर उठल्याचा आपल्याला दिसतो.

बरेचदा आपल्या शरीरातील विषारी पदार्थ घामंद्वारे बाहेर फेकले जातात. परंतु ते पूर्णतः बाहेर फेकले जात नाही त्यामुळेच तेथे घामोळ्या लाल पुरळ निर्माण होते. लहान मुलांना बरेचदा खूप घामोळ्याचा त्रास सहन करावा लागतो. जर तुम्हाला घामोळ्यांपासून सुटका मिळवायचे असेल तर तुम्ही स्वतः शरीर स्वच्छ ठेवले पाहिजे आणि घामोळ्या झाल्यास त्याकडे दुर्लक्ष कळता कामा नये.

घामोळ्या ह्या कोणालाही होऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये दमट उष्ण वातावरणामुळे शरीराला घाम येतो व त्यामुळे आपल्या शरीरावरील छिद्रे बंद होतात. त्यामुळे शरीरावर लालसर रंगाचे पुरळ येतात घामोळ्यामुळे त्वचेवर जळजळ होते तर कधी खाज सुटते आणि ही समस्या केवळ पाठीवरच होते असे नाही तर छाती, पाठ, हात, कंबर व मानेवर जास्त प्रमाणात यांचा त्रास सहन करावा लागतो.

जर आपण योग्य काळजी घेतली नाही तर शरीरावर घामुळे येणारच…! त्यामुळे आपण आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला घामोळ्याचा त्रास झाला असेल तर तुम्ही तुझ्या कोडी राहण्यासाठी सैल व सुती कपडे यांचा वापर करावा तसेच डॉक्टरांकडे जाऊन औषध उपचार सुद्धा करावा.

तर चला मग जाणून घेऊया घामोळ्या कमी करण्याचे घरगुती उपाय :

मुलतानी माती हे सर्वांच्या घरी उपलब्ध असणारे आहे. त्यामुळे या मातीचा उपयोग तुम्ही घामोळ्या या समस्येवर करू शकता. कित्येक वर्षापासून मुलतानी मातीचा वापर त्वचारोगांमध्ये केला जातो. आयुर्वेदामध्ये सुद्धा मुलतानी मातीला अतिशय महत्त्व दिले गेले आहे.

कामामुळे त्वचेवरील छिद्रे बंद झाली असल्यास मुलतानी मातीमुळे ती मोकळे होतात.
तसेच शरीरावरील दुर्गंध विषारी पदार्थ व घाण देखील बाहेर फेकली जाते. त्यातील पोषक तत्त्वामुळे त्वचा देखील फ्रेश राहते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर तुम्ही मुलतानी मातीचा उपयोग तुमच्या शरीरावर करत असाल तर त्वचेला खूप फायदा होतो तसेच थंडावा देखील मिळतो.

मुलतानी माती आणि गुलाब जल एकत्रित करून घ्या व यांची जाडसर पेस्ट तयार करून जिथे तुम्हाला घामोळ्या झाल्या आहेत तेथे ही पेस्ट लावा. वीस मिनिटांसाठी ही पेस्ट आपल्या शरीराच्या भागावर राहू द्या व त्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. हा उपाय नियमित केल्यामुळे घामोळ्यांचा त्रास तुम्हाला लगेच कमी झालेला दिसेल.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही थंड पदार्थांचे सेवन केले पाहिजे जसे काकळी. काकळीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले पाहिजे. काकळीतील पोषण तत्त्वामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. काकळीमुळे घामोड्यांचा त्रास देखील कमी होतो.

काकळीचा फेस मास्क लावल्यामुळे त्वचेवर चमक देखील येते. घामोड्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काकडीचे स्लाइड्स कापून घ्यावेत. काही मिनिटासाठी हे स्लाईट फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. यानंतर जेथे तुम्हाला घामोळ्या झाल्या आहेत, त्यावर हे स्लाइट्स ठेवावे. हवी असल्यास तुम्ही काकडीची पेस्ट सुद्धा करून वापरू शकता.

बऱ्याचदा त्वचेच्या रोगांमध्ये कोरफड ही खूप बहुमूल्य अशी औषधी वनस्पती आहे. कोरफड मध्ये अँटीबॅक्टरियल अँटिसेप्टिक असे गुणधर्म आहेत. या घटकांमुळे आपले उन्हाळ्याच्या त्रासात संरक्षण होते. सूर्याची हानीकारक किरणामुळे आपल्या त्वचेवर वेगवेगळे रोग होऊ शकतात.

त्यामध्ये एलोवेरा जेल आपल्या त्वचेला त्या हानिकारक किरणांपासून वाचवण्यास खूप मदत करते. जर तुम्ही योग्य पद्धतीने कोरफड जेलचा देखील उपयोग केला तर तुम्हाला घामोळ्याच्या त्रासापासून आराम मिळेल. हा उपयोग तुम्हाला दिवसातून दोन वेळा करायचा आहे.

खाण्याचा सोडा हा एक वाटी पाण्यामध्ये मिसळून घ्या आणि जेथे शरीरावर घामोळ्या झाल्या आहेत तेथे लावा. थोडा वेळ लावलेले बेकिंग सोडा पाणी शरीरावर राहू द्या. त्यानंतर काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. यामुळे देखील तुमच्या शरीराला थंडावा मिळेल व आग किंवा जळजळ पासून शांतता मिळेल.

घामोळ्या शरीरावर झाल्या असतील तर तुम्ही खोबरेल तेलामध्ये थोडा कापूर मिसळून घ्या व या तेलाने संपूर्ण शरीराची मालिश करा. यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल.

घामोळ्याचा त्रास तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाला असेल तर तुम्ही तिथे बर्फाचा वापर देखील करू शकता. बर्फ आपल्या त्वचेला थंड ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे आपल्याला आराम मिळतो; परंतु डायरेक्ट त्वचेवर बर्फ लावू नका बर्फ एखाद्या कॉटनच्या कपड्यांमध्ये गुंडाळून घ्या व नंतर घामोड्यांवर हलक्या हाताने लावा.

त्या व्यतिरिक्त उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण गरम पाण्याने आंघोळ करणं टाळावं. उन्हाळी दिवसांमध्ये थंड कोमट पाण्याने अंघोळ करावी. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त आहारामध्ये फळ आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करावे. उन्हाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त पाणी पिले गेले पाहिजे.

जर तुमच्या शरीरावर घामोळ्या झाल्या असतील आणि त्यांची जळजळ तसेच खाज सुटत असेल तर तुम्ही तिथे पपईच्या गराचा उपयोग करू शकता. कारण पपयामध्ये औषधी गुणधर्म आहेत जे त्वचेचे विकार कमी करतात. तुम्हाला पपई मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करायचे आहे व नंतर ही पेस्ट आपल्या त्वचेवर जेथे जळजळ किंवा घामड्या झाल्या आहेत. तेथे वीस ते पंचवीस मिनिटं लावून ठेवायचे आहे. व नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यामुळे तुमच्या शरीरावर घामोळ्या येणार नाहीत.

तुम्हाला घामोळ्यांचा त्रास होत असेल तर तुम्ही वरील उपाय नक्की करून बघा.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment