केसतोड म्हणजे काय? जाणून घ्या त्यावर घरगुती उपाय…! Home Remedies For Hair Follicle Boils

Home Remedies For Hair Follicle Boils आपल्या शरीरावर असा किंवा बारीक केस असतात तसेच यापैकी बारीक चा केस जरी उन्हापासून बाहेर येताना तुटला किंवा तो तोडला जाऊन दुखवला गेला की केसतोड होतो. म्हणजेच केसांना दुखापत झाल्यामुळे तेथील भाग हा काहीसा प्रमाणात लाल होतो आणि केसांच्या ग्रंथींना त्रास झाल्यामुळे त्या ठिकाणी थोडीशी पुरळ येते किंवा तो भाग चांगलाच लाल झाल्याचा आपल्याला दिसतो. ही पुरळ साधी नसून त्यामध्ये बऱ्याचदा पच असल्याचा आपल्याला दिसतो आणि त्यामध्ये वेदना देखील खूप असतात.

केसतोड म्हणजे काय? जाणून घ्या त्यावर घरगुती उपाय…! Home Remedies For Hair Follicle Boils

शरीराच्या भागांवर केस आहेत, त्या सगळ्याच ठिकाणी केसतोड होण्याची शक्यता असते केस तोडीकडे जर आपण दुर्लक्ष केले तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून केस तोड झाल्यास कधीही त्याकडे दुर्लक्ष करू नका.

कारण हा फोड लाल रंगाचा व छोटासा जरी वाटत असला तरी देखील त्यामध्ये काही काळानंतर पच साचून त्याचा आकार मोठा होण्याची शक्यता जास्त असते. तसेच त्यापासून जास्तीत जास्त त्रास देखील होऊ शकतो. ज्या भागावर केसतोड झाला आहे, त्या भागावर सूज देखील येऊ शकते.

केसतोड होण्याचे प्रमाण जास्तीत जास्त हिवाळा या ऋतूमध्ये होतो. कारण हिवाळ्याच्या अंतिम मध्ये आपण स्वतःला थंडी वाजू नये म्हणून लोकरीचे कपडे उबदार जाड कपड्यांनी झाकायला सुरुवात करतो. परंतु बऱ्याचदा जाड कपडे घासल्यामुळे आपले केस तुटले जातात. यानंतर आपल्याला तेथे केसतोडा या समस्येला सामोरे जावे लागते.

केसतोड हा एक संसर्ग किंवा ज्याला आपण इन्फेक्शन असे देखील म्हणू शकतो. या इन्फेक्शनच्या प्रकारामध्ये केस तुटण्याच्या ठिकाणी एक गाठ तयार होते. याशिवाय लाल रंगाचा छोटासा मुरूम तयार होतो म्हणजे संसर्गामुळेच केसतोडा तयार होतो.

तर चला मग जाणून घेऊया केसतोडा झाल्यावर घरगुती उपाय :

आपल्या स्वयंपाक घरातील हळद संसर्ग दूर करण्यासाठी मदत करतात. हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिबायोटिक गुणधर्म असतात. हळदीमध्ये आढळणारे कर्क्युमिन विविध प्रकारच्या जीवाणविरुद्ध एक उत्कृष्ट अँटिबायोटिक औषध म्हणून काम करतात. म्हणून जिथे आपल्याला केस तोडा झाला असेल त्या त्रासापासून बरे होण्यासाठी तुम्ही हळद लावू शकता.

लसूणचा देखील तुम्ही केस तोडा झालेल्या ठिकाणी उपयोग करू शकता. लसणाच्या रसामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीइम्फ्लेमेट्री गुण असतात. त्यामुळे तुम्ही लसणाचा देखील उपयोग करू शकता.

लसणाप्रमाणेच कांद्यामध्ये सल्फर संयुग आढळतात. त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया आणि जिवाणू नष्ट करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे तुम्ही कांद्याचा देखील जेथे केसतोड झाला आहे. तेथे उपयोग करू शकता. कांदा गरम करून जेथे केसतोड झाला आहे तेथे ठेवावा. त्यामुळे जखमांचे संरक्षण होते व त्रास कमी होतो.

ॲपल साइडर विनेगर हे एक चांगली औषध मानले जाते. कारण हे प्रभावीपणे जिवाणूंना मारते आणि त्वचेच्या पच पातळीला संतुलन करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही ॲपल साइडर विनेगरचा देखील उपयोग करू शकता.

जिथे आपल्याला केस तोड झाला आहे. तेथील जागा सर्वप्रथम कोरडी करणे गरजेचे असते. जर तुम्हाला सतत घाम येत असेल तर सर्वप्रथम आंघोळ केल्यानंतर ती जागा कोरडी करून घ्या व तेथे पावडर नेहमीप्रमाणे वापरत रहा. त्यामुळे देखील हा संसर्ग वाढणार नाही व तुम्हाला आराम मिळेल.

बऱ्याचदा आपल्या आहार विहाराचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. जर आपण योग्य आहार घेतला तर आपले शरीर देखील चांगले राहते. त्यामुळे विविध पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे ठरते. तुम्ही आहारामध्ये गाईचे तूप व खजूर यांचा वापर करा, त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

जर तुम्हाला केसतोड झाला असेल तर तुम्ही कोरफडचा देखील उपयोग करू शकता कारण कोरफड ही औषधी गुणांनी संपन्न आहे. या वनस्पतीमध्ये त्वचेशी संबंधित प्रत्येक समस्या सोडवण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे जिथे केसतोडा झाला असेल ते दूर करण्यासाठी कोरफड खूप प्रभावी मानले जाते. जिथे केसतोड झाला आहे, त्या होणाऱ्या दुखापतीला देखील कोरफडमुळे आराम मिळू शकते. कोरफड ही जखमेला लवकर भरण्यास मदत करते. कारण त्यामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आहे.

केसतोड झाल्यास तुम्ही मेहंदीचा देखील उपयोग करू शकता. मेहंदी थंड असल्यामुळे ते पाण्यात कालवून केस तोडायचे झाला आहे. त्याच्या बाजूने लावा त्यामुळे त्रास कमी होतो.

केसतोड जिथे झाला आहे तिथे कडुलिंबाच्या पानाचा देखील लेप लावू शकता कारण कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे तुम्हाला होणाऱ्या वेदना किंवा कोणतीही ऍलर्जी असेल तर ती कमी होते. तसेच शरीरावर कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास कडूनिंबाच्या पानांचा लेप लावल्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल. ही समस्या मुळातून नष्ट होईल.

केस तोड झाला आहे तिथे तुम्ही गरम पाण्यात टॉवेल भिजवून आरामात तेथे शेक देऊ शकता. हा प्रयोग दिवसातून तीन ते चार वेळा केल्यास तुम्हाला नक्की आराम मिळेल. अशाप्रकारे वरील उपायांपैकी तुम्ही कोणतीही उपाय करू शकता.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment