Home Made Solution In Tooth Pain गोड पदार्थ खाणे सर्वांनाच आवडते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत चॉकलेट लाडू खाणाऱ्यांची कमी नाही परंतु खाण्याबरोबरच आपले दात देखील स्वस्त असायला पाहिजे. जर दातांमध्ये वेदना निर्माण झाल्या तर आपण चॉकलेट, लाडू किंवा इतर गोड पदार्थ खाऊ शकत नाही. अनेक लोक ही समस्या छोटी म्हणून सोडून देतात परंतु हीच समस्या कधी मोठं रूप घेईल सांगता येत नाही. त्यामुळे आधीच आपण दातांची निगा राखली पाहिजे, दात स्वच्छ घासले पाहिजे.
काय तुम्ही सुद्धा दात दुखीच्या त्रासाने त्रस्त आहात..? तर जाणून घ्या घरगुती उपाय…Home Made Solution In Tooth Pain
बऱ्याचदा दातांची समस्या एवढी भयंकर असते की दाढ पूर्ण सुजून जातं. दातांमध्ये खूपच वेदना होऊ लागतात. त्यावर लगेच उपचार करणे गरजेचे असते. दात दुखीची अनेक कारणे असू शकतात. बरेच लोक कडक पदार्थ खातात तर काहींचे दात गोड पदार्थ खाल्ल्यामुळे दुखतात. याशिवाय दाढ दुखी बॅक्टेरिया आणि संक्रमण याने देखील होऊ शकतं. तेव्हा त्यामध्ये खूपच वेदना होतात. जर आपले दात दुखत असतील तर आम्ही तुमच्याकरिता खास घेऊन आलो आहोत. दात दुखीवर सोपे घरगुती उपाय :
गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या टाका. मीठ हे नैसर्गिकरित्या जंतुनाशक आहे. त्यामुळे कोमट पाण्यामध्ये मीठ मिक्स करून त्या पाण्याने गुळण्या केल्या तर दातांमधील वेदना दूर होतात. तुम्ही पाहिले असेलच की डॉक्टर सुद्धा सर्वप्रथम उपाय म्हणून हीच गोष्ट करायला सांगतात. बऱ्याचदा यामुळे फरक देखील पडून जातो. त्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये मीठ घ्यावे. नंतर ते पाणी थोडा वेळ तोंडात घेऊन मग थुंकून द्यावे. अशा प्रकारे चार ते पाच वेळा हा प्रयोग केल्यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल.
दातांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा सुद्धा तुम्हाला मदत करू शकतो. फक्त तुमच्या नेहमीच्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा मिक्स करा व जेथे दात दुखत आहे तेथे लावा. यामुळे अगदी काही मिनिटातच तुम्हाला फरक जाणवेल. अगदी सोपा उपाय असला तरी रामबाण उपाय आहे.
बऱ्याचदा दात दुखी होते तेथे आपल्या गालावर सूज येत असते. ही सूज कमी करण्यासाठी तुम्ही बर्फाचा उपयोग करू शकता. तुमच्या दातांमध्ये जर जास्त वेदना होत असतील तर गालाच्या किनाऱ्यावर आईस पॅक लावा. हा पॅक किमान पंधरा मिनिटे गालावर राहू द्या. यामुळे वेदना खूप कमी होतील व भागाला अधिकाधिक शेक मिळतो.
आपल्याला माहित आहे, व्हेनिलाचा वापर फक्त एक किंवा आईस्क्रीम यांच्यामध्ये केला जातो. परंतु त्या व्यतिरिक्त आणखी देखील त्याचा उपयोग म्हणजे दातांच्या वेदना दूर करण्यासाठी व्हेनिला खूप महत्त्वाचं औषध ठरतं. यासाठी एका कापसाच्या बोळ्यावर व्हेनीला रसाचे काही थेंब घेऊन जिथे वेदना होत आहेत तिथे पंधरा मिनिटे ठेवायचे. यामुळे दातातील वेदना हळूहळू कमी होत जातात.
बऱ्याचदा दात दुखीमुळे होणाऱ्या वेदनांपासून मुक्तता मिळण्यासाठी चहाच्या पिशवीचा वापर केला जातो. उबदार चहाच्या पिशवीमुळे सूज कमी होते व चहाची पिशवी थेट दुखणाऱ्या दातांवर लावल्याने वेदना देखील कमी होतात. चहामध्ये टॅनिक ॲसिड असते. जे वेदनांवर विजय मिळवते.
आपल्या घरातील लवंग ही दात दुखीवर पहिल्यांदा लावली जाते. कारण दात दुखी सुरू झाली की, लवंग वापरण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो लवंगी मध्ये एंटीबॅक्टरियल आणि एटीसेप्टिक गुण असतात.
त्यामुळे ज्या ठिकाणी जास्त वेदना होत आहेत, तिथे लवंग किंवा लवंग तेलाचा सुद्धा वापर केला जातो. हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
पेपरमिंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुदिनाचे तेलाचे काही थेंब दुखणाऱ्या दातावर जर टाकले तर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. बऱ्याचदा दात सडतात व त्यातून दुर्गंधी येते. या तेलाचा वापर केल्यामुळे दात दुखीपासून तर सुटका मिळतेच परंतु दुर्गंधी देखील दूर होते.
दात दुखीसाठी आल्याची पावडर तुम्ही वापरू शकता. आल्यामध्ये पेन किलर शक्ती आहे. जे तुम्हाला दात दुखी पासून तसेच हिरड्या सुजल्या असतील तर आल्याचा उपयोग करून तुम्हाला आराम मिळू शकतो. हलक्या फुलक्या त्रासावर तुम्ही आल्याचा घरगुती उपयोग करू शकता.
हिंग हा देखील दात दुखीवर घरगुती उपाय म्हणून केला जातो जर तुमच्या दातांमध्ये दात दुखी झाली असेल तर तुम्ही हिंग या पदार्थाचा उपयोग दात दुखी साठी करू शकता. हिंगामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे सडणाऱ्या दातांना वाचवतात. हिंग दातांवर एखाद्या औषधी प्रमाणे काम करतात व तोंडाच्या दुर्गंधी पासून देखील आराम मिळतो.
जेवणात वापरला जाणारा कांदा केवळ जेवणातच वापरला जातो असे नाही तर त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. आपले आरोग्य आणि दातांसाठी देखील कांदा खूप फायदेशीर ठरतो दात दुखीवरील घरगुती उपायामध्ये कांद्याचे महत्त्व आहे. कांद्यामध्ये एंटीबॅक्टरियल गुण तसेच तोंडातील बॅक्टेरिया घालवण्याची क्षमता आहे. त्यामुळे तुम्ही दात दुखीवर कांदा नैसर्गिक औषध म्हणून उपयोग करू शकता. दात दुखी जिथे होते, त्या बाजूने कांदा चावून घ्या. कांदा पोटात गेला तरी तुम्हाला कोणताही अपाय होणार नाही.
दात दुखीवर तुम्ही पेरूच्या पानांचा देखील उपयोग करू शकतो कारण त्यामध्ये देखील दात दुखी किंवा त्यांच्या वेदना कमी करण्याचे गुणधर्म असतात. जे तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. पेरूच्या पानांमध्ये अँटीमाइक्रोबियल, एनाल्जेसिक व अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. ते दात दुखी पासून तुम्हाला दूर ठेवतात. त्यामुळे तोंडाचा अल्सर आणि दात दुखणे दोन्ही देखील कमी होते.
लसणामध्ये अनेक फायदे आहेत त्यामुळे जर तुम्ही दात दुखीवर लसणाचा उपयोग करत असाल तर ते चांगलेच आहे. लसणामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. जे दातांच्या चढण्यापासून त्यांना वाचवतात तसेच हिरड्यांवरील किटाणूंचे संक्रमण होण्यापासून देखील वाचवतात. अनेक टूथपेस्ट किंवा माऊथ वॉशचा देखील तुम्ही वापर करू शकता. जर दातांची समस्या भयंकर असेल तर डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपाय करून घ्यावा.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.