Hemoglobin Increasing In Marathi बऱ्याचदा आपल्याला थकवा किंवा ऑक्सिजनची पातळी कमी झालेली जाणवते. परंतु आपण या गोष्टींकडे कधी लक्ष देत नाही व आपल्या दैनंदिन रुटीनमध्येच व्यस्त असतो. याचा परिणाम थेट आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनवर होत असतो. ज्यावेळी आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते. त्यावेळी आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पातळी कमी झालेली आपल्याला दिसते. तसेच आपल्याला थकवा किंवा चक्कर आल्यासारखे वाटते. रक्त कमी होण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आढळते.
तुमच्या शरीरातील रक्त कमी झालंय तर चिंता करू नका…! जाणून घ्या रक्त वाढवण्याची घरगुती उपाय Hemoglobin Increasing In Marathi
शरीर प्रकृती चांगली राहण्यासाठी शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण आवश्यक असते. शरीरात रक्त भरण्याचे प्रमाण कमी झालं म्हणजेच आपल्याला अनेक दोघांनी आपली शरीर खचू शकते तर जसं हाड कमजोर होणे, डोळ्यांवर परिणाम होणे, मेंदूच्या कार्यावर देखील परिणाम होतो.
त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही. आरोग्याच्या या लहान सहान समस्या आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असल्यामुळे होते. त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये सर्वच पोषक घटकांचा वापर करून शरीरातील रक्त वाढवू शकतो.
शरीरात रक्त कमी होण्याची कारणे जाणून घेऊया :
तुमच्या शरीरात रक्त कमी होण्याची कारण म्हणजे ऑक्सिजनची कमतरता असते. त्यानंतर जेव्हा तुमच्या शरीरात रक्त कमी होतं त्यावेळेस तुम्हाला श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये रक्ताचे सर्वात महत्त्व आहे.
शरीरात जर कोणताही आजार झाला असेल तर निदान हे केवळ रक्ताच्या नमुन्यांमधूनच कळू शकते. मानवी शरीरात रक्ताची पातळी ठराविक मर्यादेपर्यंत असणे अत्यंत आवश्यक असते. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक समस्या शरीरामध्ये उद्भवू शकतात. थकवा येणे, अशक्तपणा व चक्कर इत्यादी.
रक्त वाढवण्यासाठी आहार मध्ये कोणत्या घटकांचा समावेश असायला पाहिजे :
शरीरातील रक्त पातळी वाढवण्यासाठी पोषक आहार घेणे गरजेचे आहे. जसे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लोह समाविष्ट असणे अत्यंत आवश्यक आहे. लोहाच्या कमतरतेमुळेच शरीरामध्ये रक्त निर्मिती होऊ शकत नाही.
महिलांमध्ये गर्भधारणेच्या वेळी शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊ शकते. मासिक पाळीत जर जास्त रक्तस्त्राव झाला तरी देखील शरीरात रक्त कमी होऊ शकतं. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास आपण बाहेरील तेलकट तिखट जंक फूड खाणे टाळले पाहिजे. त्या व्यतिरिक्त आहारामध्ये जीवनसत्वे आणि कॅल्शियमचा समावेश करणे गरजेचे आहे.
रक्त वाढवण्यासाठी घरगुती उपाय :
मनुका : रक्त वाढवण्यासाठी भिजवलेली मनुके खाणे फायदेशीर ठरते सर्व ड्रायफ्रूट्समध्ये लोह असतेच जर आपण मनुके खाल्ले तर त्यामध्ये लोहा सोबतच तांबे कॉपर आणि व्हिटॅमिन आपल्या शरीराला मिळू शकतात. जे रक्त निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असते. आठ ते दहा मनुके रात्री भिजवत ठेवा व सकाळी रिकाम्या पोटी खा त्यामुळे तुमचे आरोग्य खूप चांगले राहते.
चवळी : लोहाच्या कमतरतेमुळे रक्त निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही चवळीचा उपयोग तुमच्या आहारामध्ये नक्की करा. यामुळे तुमच्या शरीराला लोह मिळून रक्ताची कमतरता लवकरच दूर होईल.
डाळिंब : डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. त्यामुळे रक्त वाढण्यासाठी डाळिंब हे अत्यंत फायदेशीर आहे. डाळिंबाचा ज्यूस करून पिण्यापेक्षा डाळिंब खाणं खूप फायदेशीर ठरतं.
मीट : तुम्ही मांसाहारी असाल तर ऑर्गन मीट हे रक्त वाढीसाठी फायदेशीर ठरते. कारण यामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. नॉनव्हेज मधील लिलीवर किडनी मेंदू अशा अवयवांचे मास सेवन केल्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात लोह मिळते व यातून लवकरच रक्त निर्मिती होते.
बीट : शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीट अत्यंत फायदेशीर आहे. आहारात सलादपासून अगदी गोडाच्या पदार्थांपर्यंत बीटाचा समावेश करता येऊ शकतो. सकाळी नाश्ताला बीटाचा रस, पराठे यांचा समावेश केला जाऊ शकतो.
सफरचंद : सफरचंद खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन प्रमाण शरीरामध्ये वाढते. सफरचंदासोबत मध मिसळून खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतं. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.
पालक : पालक हे भाजी रक्तवर्धक आहे. शरीरात जर रक्ताची कमतरता असेल तर पालकाचा रस नियमित प्यायल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. तसेच आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता देखील भरून निघते.
आवळा : आवळ्यामध्ये विटामिन सी कॅल्शियम आणि लोह यांसारखे गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे आवळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. आवळ्यापासून अनेक पदार्थ तयार करून तुम्ही खाऊ शकता जसे आवळा कँडी, आवळा पावडर, मुरब्बा इत्यादी. तुम्ही दररोज एक आवळा खाल्ला तरी देखील तुमच्या शरीराला खूप फायदे मिळतात.
डाळी : आपल्या आहारामध्ये डाळींचा समावेश बऱ्याच केला जातो. डाळींमध्ये प्रथिन असतात, तसेच रोज डाळ-भात, डाळ-पोळी किंवा पातळ सूप डाळिपासून तयार केला जातो. कारण त्यामध्ये लोह असतं. त्यामुळे डाळ खाल्ल्यास आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते.
गूळ : शरीरात बऱ्याचदा रक्त कमी होतो, तेव्हा तुम्हाला शेंगदाणे व गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण गुळामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असते. रोज एक तुकडा गुळ खाणं ही चांगली सवय आहे. शरीरात लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी गुळ व शेंगदाणे खाणे खूपच फायदेशीर ठरतं.
केळ : केळामध्ये प्रथिन, लोह तसेच इतर बरीच तत्व असतात. त्यामुळे रोज एक केळ खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. रोज एक केळ खाल्ल्यामुळे शरीराची लोहाची गरज पूर्ण होते. त्यामुळे रोज एक केळ खाणे फायद्याचे ठरते.
खजूर : शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी खजूर हा पदार्थ आहारात वापरला पाहिजे. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भरून निघते. त्यासाठी दुधामध्ये खजूर मिसळून प्यावा बारीक पूड देखील फायदेशीर आहे.
ब्रोकली : शरीरामध्ये लोह या तत्त्वाचं प्रमाण कमी झालं असेल तर ब्रोकली ही भाजी खूप फायदेशीर ठरते. या भाजीमध्ये लोह त्यासोबतच के व क हे जीवनसत्व तसेच फॉलिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते. शरीराला यातून पोटॅशियम तंतुमय घटक देखील मिळतात. त्यामुळे आहारामध्ये या भाजीचा समावेश करावा.
भोपळ्याच्या बिया : भोपळ्याच्या बियामध्ये अँटिऑक्सिडंट, मॅग्नेशियम, झिंक आणि ऍसिड असतं. यासोबतच लोहाचं प्रमाण देखील खूप असतं. म्हणून तुम्ही रक्त वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बियांचा देखील उपयोग करू शकता.
जर तुम्हाला शरीरामध्ये श्वास घेण्याचा त्रास किंवा ऑक्सिजनची कमतरता असेल तसेच शरीराला जडपणा येत असेल तर शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असू शकते. रक्ताच्या कमतरतेमुळे छातीमध्ये दुखू शकते तसेच डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच शरीरात संधिवात कर्करोग आणि किडनीशी संबंधित आजारांचा देखील धोका संभवतो. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे जाऊन चेक करून घ्यावे.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.