Height Growth Tips सामान्य उंची ही प्रत्येकालाच आवडते परंतु सामान्य उंचीपेक्षाही बऱ्याच लोकांची उंची वाढत नाही ती खुंटते. परंतु प्रत्येकाला वाटतं आपण उंच असावं. कारण बुटका असेल तर लोक चिडवतील. यासाठी आपण आपल्या उंचीची एक मर्यादा गाठली पाहिजे. बऱ्याचदा दररोजच्या चुकीच्या रुटीनमुळे आपली उंची खुंटू शकते. तिची पूर्णपणे वाढ होत नाही तसेच आपण उंची वाढवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आहारामध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत? तसेच कोणता व्यायाम करावा? बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात. परंतु आम्ही तुमच्यासाठी आज ही माहिती घेऊन आलो आहोत तर जाणून घेऊया उंची ची कारणे तसेच उंची वाढवण्यासाठी घरगुती टिप्स व व्यायाम :
तुम्हाला उंची वाढवायची आहे तर मग जाणून घ्या उंची वाढवायची कशी… Height Growth Tips In Marathi
उंची वाढण्याचे एक वय असते म्हणजेच किशोरावस्था मध्ये उंची वाढवता येऊ शकते. परंतु ज्या मुलांची उंची कमी असते. ते काही विशेष उपाय करून उंची वाढवण्याचे प्रयत्न करू शकतात; परंतु वयाने एक मर्यादा गाठली की आपण उंची वाढवू शकत नाही. म्हणून ज्यांना उंची वाढवायचे आहे अशा लोकांनी खालील उपाययोजनांचा उपयोग करावा व आपली उंची वाढवावी.
बऱ्याचदा आपण डॉक्टरांकडे जाऊन देखील उंची वाढवण्याचे औषधे घेऊ शकतो परंतु त्यापासून आपल्याला काहीसा फरक जाणवत नाही त्यासाठी आपली शारीरिक स्थिती परिणामकारक बनवावी लागते. उंची वाढवण्यासाठी आपल्याला थोडे परिश्रम देखील घ्यावे लागतात.
उंची न वाढण्याची कोणती कारणे आहेत तर चला मग जाणून घेऊया.
उंची न वाढण्याचे पहिले कारण म्हणजे अनुवंशिकता जर कुटुंबातील आई-वडील आजी आजोबा यापैकी कोणाचीही उंची कमी असेल तर त्यांचे जीन्स तुमच्या मध्येही प्रवेश करू शकतात. त्यामुळे तुमच्या उंचीला बांधा येऊ शकते.
बऱ्याचदा उंची न वाढण्यामागे कुटुंबातील कोणालाही कमी उंचीची समस्या नसली तरी सुद्धा तुमची उंची कमी असू शकते. त्यामध्ये पौष्टिक आहाराची कमतरता. कमी शरीरिक हालचाल व व्यायाम न करणे उठता, बस्ता, चालता फिरताना शरीराची योग्य पोज न ठेवणे.
लहानपणी एखाद्या बिमारीने जखडणे आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणातील वातावरण देखील आपल्या उंचीवर परिणाम करू शकते. तसेच कमी वयात जिममधील व्यायाम सुरू केल्यामुळे देखील तुमच्या उंचीवर फरक पडू शकतो.
उंची वाढवण्यासाठी खालील उपाय योजना :
सर्वप्रथम मुलांची उंची वाढवायची असेल तर त्यांच्या आहारामध्ये कॅल्शियम या घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश करणे आवश्यक असते. कॅल्शियममुळे हाडांचा विकास होऊन उंची वाढते. याकरता तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारामध्ये दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ घेणे आवश्यक आहे.
उंची वाढवण्यासाठी आणखी दुसरा उपाय म्हणजे व्यायाम. व्यायाम हा शरीराच्या वाढीसाठी खूपच महत्त्वाचा घटक आहे. नियमित व्यायाम केल्याने किंवा योगा केल्याने वजन उंची दोन्ही देखील वाढवू शकतो. त्यामुळे उंची वाढवण्यासाठी लटकण्याचा व्यायाम करणे फायदेशीर ठरते.
जर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर वाकून बसणे किंवा वाकून चालणे टाळली पाहिजे. कधीही शरीराचा बांधा सरळ दिसला पाहिजे. जर तुम्हाला वाकून बसायची किंवा चालायची सवय असेल तर तुमचे शरीर झुकल्यासारखे दिसेल व शरीराचा उठाव पणा दिसत नाही, तसेच शरीराची उंची देखील कमी दिसते.
वाढवण्यासाठी शरीरामध्ये हार्मोन्स ग्रोथ वाढवणे गरजेचे असते. यामुळे आपण नियमित थोड्या थोड्या वेळाने खाणे गरजेचे असते. दिवसातून किमान पाच ते सहा वेळेस खाणे गरजेचे असते.
उंची वाढवण्यासाठी केवळ खाली गरजेचे असते असे नव्हे त्यामध्ये आपण काय खावे याचा देखील विचार केला पाहिजे कारण नियमित संतुलित आहाराच्या सेवनामुळेच उंची वाढण्यास मदत होते. आपणास कितीही जंगफूड खाण्याचा मोह होत असेल किंवा तिला इच्छा होत असली तरी देखील आपण ती टाळली पाहिजे. चांगले आणि सकस जेवण नेहमीच शरीराला चांगले व सुरक्षित ठेवते.
शारीरिक विकास वाढ होण्यासाठी हेल्दी जेवण घेणे आवश्यक असते त्यामुळे उंची देखील वाढते. जेवणामध्ये कॅल्शियम विटामिन बी 12 आणि विटामिन डी यांच्यासारखे आवश्यक पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात घेणे आवश्यक असते. तसेच रोजच्या जेवनामध्ये प्रोटीन घेणे गरजेचे असते. प्रोटीनमुळे देखील शरीराची उंची चांगली वाढते.
उंची वाढवण्यासाठी झोप देखील तेवढीच महत्त्वाची असते म्हणून झोपेकडे कधीच दुर्लक्ष करू नका. एका संशोधनामध्ये असे सुद्धा दिसून आले आहेत की, झोप घेत असताना शरीरातील घटक ग्रोथपॅटर्नवर प्रभाव टाकत असतात.
उंची वाढवण्यासाठी आणखी शरीरामध्ये विटामिन डीचे प्रमाण योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. कोवण्यास सूर्यप्रकाशामधून शरीराला नैसर्गिकरित्या विटामिन डीचा पुरवठा होत असतो. सकाळ किंवा संध्याकाळ किमान 20 ते 30 मिनिटे कोवळ्या उन्हामध्ये फिरणे गरजेचे असते.
उंची वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय :
प्रत्येक रोगावर काही ना काही घरगुती उपाय असतातच, तर चला मग जाणून घेऊया उंची वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय.
तुम्हाला जर उंची वाढवायची असेल तर रात्रभर पाण्यामध्ये काळ्या हरभऱ्याची डाळ भिजवत घाला. सकाळी उपाशी पोटी या डाळीचे सेवन करा यामध्ये शरीरात प्रोटीन्स वाढतात. हा उपाय कमीत कमी एक महिना केल्याने तुमची उंची नक्की वाढते. तसेच शारीरिक शक्ती व रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते.
उंची वाढवण्यासाठी एक ग्लास दूध मध्ये अर्धा चमचा हळद घालून दोन ते तीन थेंब शिलाजीत आणि अर्धा चमचा अश्वगंधा टाका व हे मिश्रण दररोज रात्री झोपण्याआधी प्या. असे महिनाभर केल्यामुळे आपल्याला नक्कीच लाभ होईल.
उंची वाढवण्यासाठी योगासने देखील महत्त्वाचे ठरतात. तर जाणून घेऊया कोणती योगासने आपण केली पाहिजे.
भुजंगासन :
उंची वाढवण्यासाठी भुजंगासन हा योगा करणे फायदेशीर ठरते. हा योगा केल्यामुळे उंची तर वाढतेच याशिवाय कंबर बारीक आणि खांदे चवडे राहतात. भुजंगासन अत्यंत फायदेशीर असं आसन असून याला इंग्रजी भाषेत कोब्रा पोज देखील म्हटले जाते. भुजंगासन करण्यासाठी पोटावर झोपावे लागते. नंतर दोन्ही हाताच्या सहाय्याने शरीराला कमरेपासून वर उचला व मानेला वर वळवून आकाशाकडे पहा. शक्य होईल तेवढा स्थान देऊन या स्थितीत थांबावे. यानंतर पुन्हा पूर्वस्थितीत यावे.
ताडासन :
ताडासन हे आसन उंची वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये दोन्ही पायांमध्ये एक फूट अंतर ठेवून दोन्ही हात शरीरालगत ठेवावे. शरीर ताट असावे आणि शरीराचे वजन दोन्ही पायांवर समांतर असावे. नंतर हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर करावे. वर नेल्यावर हाताची बोटे एकमेकात गुंतवा. आता जेवढा हाताना ताण देता येईल तेवढा द्या. नंतर दोन्ही पाय म्हणजेच टोचवर उभे राहा आणि आसन स्थितीत काही वेळ थांबा. हे आसन सोडताना सर्वप्रथम हात रिलॅक्स करावे व नंतर पूर्वस्थितीत यावे. थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा हे आसन करा.
सूर्यनमस्कार :
सूर्यनमस्कार मध्ये अनेक व्यायाम केले जातात. उंची वाढवण्यासाठी देखील सूर्यनमस्कार या व्यायामाचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही पाच ते दहा वेळा दररोज हा व्यायाम करा. यामुळे तुमची उंची वाढेल.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना देखील शेअर करा.