Heart Care In Marathi आजकाल तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात हार्ट अटॅकच्या समस्या दिसून येत आहे. आपण जर आपल्या हृदयाची आधीपासूनच काळजी घेतली तर हृदय निरोगी राहू शकते. त्याकरिता आपल्याला योग्य आहार, नियमित व्यायाम व पुरेशी झोप घ्यावी लागते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणाऱ्या मृतांची संख्या जगभरात सर्वात जास्त आहे आणि याला कारणीभूत सुद्धा आपणच आहोत कारण आपण आपली जीवनशैली बदलून घेतली आहे. ज्याचा खाण्यापिल्यावर थोडाही ताबा नाही.
तुम्हालाही हृदयविकाराची चिंता सतावत असेल तर अशी घ्या तुमच्या हृदयाची काळजी…Heart Care In Marathi
आपण आपल्या हृदयाची स्वतःच काळजी घेतली पाहिजे. आपले हृदय निरोगी आहे किंवा नाही याची आपण वेळोवेळी तपासणी केली पाहिजे किंवा हृदय निरोगी राहण्यासाठी कोणती फळे खाणे तुमच्या हिताची आहेत. ते आम्ही तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी व मजबूत राहील. या फळांच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका देखील कमी होईल तर चला मग जाणून घेऊया त्या आरोग्यदायी फळांविषयी माहिती.
आरोग्यदायी फळ :
सफरचंद : आपण दररोज एक सफरचंद खाल्ल्यामुळे बरेच आजार दूर होतात. जर आपण रोज एक सफरचंद खाल्ले तर शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदय देखील निरोगी राहू शकतं. सफरचंदामधील पौष्टिक घटकांमुळे हृदयविकाराचा धोका देखील टळू शकतो.
जांभूळ : जांभूळ या फळांमध्ये असे पोषक तत्व आढळते, जे आपल्या हृदयासाठी अतिशय आवश्यक असते. तसेच हृदय निरोगी ठेवण्यासाठी जांभळाचे सेवन करणे अतिशय आवश्यक आहे. बेरी व्यतिरिक्त तुम्ही स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी देखील खाऊ शकता. बेरीमध्ये ॲटीऑक्सिडेंट गुणधर्म असल्यामुळे हृदयविकाराचा धोका यामुळे कमी होऊ शकतो.
संत्री : संत्री या फळांमध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विटामिन सी आणि पोटॅशियमचा चांगलाच करत असतो. जे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे. संत्रा हे फळ हृदय निरोगी राहण्यासाठी देखील मदत करते. नियमित संत्राचे सेवन केल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो व हृदय देखील तंदुरुस्त राहते.
द्राक्ष : द्राक्ष शरीरासाठी पौष्टिक फळ आहे. त्यांची चव व प्रकार वेगवेगळे असू शकतात. मात्र द्राक्षांमध्ये पॉलिफिनॉल आणि फेनोलिक ऍसिड असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. द्राक्षांमध्ये अँटी-इम्प्लेमेटरी गुणधर्म असतात. जे आपल्या हृदयाला निरोगी बनवू शकतात आणि बऱ्याच रोगांपासून दूर ठेवू शकतात.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी एखाद्या पदार्थांमध्ये काय घ्यावे :
हृदय हे शरीरातील मुख्य असून ते निरोगी ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. त्याकरिता आपण निरोगी आहार घेतला पाहिजे. अतिशय तेलकट, फॅट असणारे पदार्थ आपण जर खाल्ले तर त्यापासून हृदयाला धोका हृदयविकार होऊ शकतात असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
जास्तीत जास्त फळ, भाज्या, कमी प्रोटीन असलेले पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करावे. त्या व्यतिरिक्त बदाम, सॅलेड, अक्रोड अशा पदार्थांचा देखील आपल्या आहारामध्ये समावेश करावा. जेवणामध्ये मिठाचे प्रमाण हे मर्यादित असावे. याकडे मात्र विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
गाजर आणि टोमॅटो : हृदयाच्या आरोग्यासाठी गाजर तसेच टोमॅटो यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे खूपच गरजेचे आहे. कारण टोमॅटो आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून रक्त गोठण्यास प्रतिबंध करते. तसेच गाजर हे विशेष पोषक तत्त्वांचा स्त्रोत आहे.
गाजरामध्ये विटामिन सी विटामिन के, विटामिन B1, B2, B6, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात. जे आपले हृदय निरोगी ठेवू शकतात. तुम्ही गाजर कच्चे किंवा त्याचा रस काढून भाज्यांमध्ये देखील घालू शकता.
बिया : बियामध्ये चिया, भोपळा आणि फ्लेक्सिड यांसारख्या बियांमध्ये अमेगा थ्री तसेच फायबरचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. हे आपल्या हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहे. बिया आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात. मात्र या बिया भाजूनच खाणे आवश्यक आहे. भूक लागल्यावर मूठभर बिया खा आणि निरोगी हृदय बनवा.
सुकामेवा : सुकामेवा शरीरासाठी किंवा तुमच्या हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. सुकामेवामध्ये बादाम, अक्रोड, शेंगदाणे यांचा समावेश तुम्ही हृदय निरोगी राहण्यासाठी करू शकता. यातील कोलेस्ट्रॉल असते, जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी घटवण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे तुमचे हृदय चांगले राहते.
मसाले : तुमच्या आहारामध्ये मसाले यांचा वापर करणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे तुमचे हृदय देखील चांगले राहते. जसे त्यामध्ये असणारे धने, हळद, जिरे आणि दालचिनी हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. स्वयंपाक घरात हे मसाले नियमित वापरावे.
लसुन : लसूण हा आपल्या शरीरातील रक्तदाब व कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील लसूण अत्यंत फायदेशीर आहे. लसूण हा भारतीय संस्कृतीमध्ये ठेचा, भाजी, ग्रेव्ही, डाळ तसेच इतर पदार्थांमध्ये देखील वापरला जातो. रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे अतिशय फायदेशीर ठरते. यामुळे आपले हृदय निरोगी राहते.
पालक : हिरव्या पालेभाज्यांमध्ये पोषक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी हृदयासाठी आरोग्य असतात. पालकामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा स्त्रोत भरपूर प्रमाणात असतो. ते रक्तदाब नियंत्रित करतात. यामुळे हृदय रोगाचा धोका कमी होतो. पालक जास्त शिजवल्याने त्याचे पोषणमूल्य कमी होते. म्हणून पालक भाजी जास्त शिजू नये. तसेच पालक चिरल्यानंतर सुद्धा घेऊ नये. पालक चिरल्यानंतर धुतल्यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात.
धूम्रपान टाळा : जर आपल्याला हृदयाचे आयुष्य वाढवायचे असेल तर कोणत्याही प्रकारची धूम्रपान टाळावे. धूम्रपानामुळे अनिष्ट परिणाम होऊन रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही व हृदयविकार होण्याची शक्यता असते.
नियमित व्यायाम करा : वाढणारे वजन केवळ नियमित व्यायाम केल्यामुळे कमी होऊ शकते तसेच संतुलित आहार व व्यायाम दोन्हीही हृदयविकारासाठी महत्वाच्या आहे.
विश्रांती : आरोग्याच्या बाबतीत आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही रात्रीची झोप पुरेशी घ्यायला पाहिजे कारण आपण दिवसभरात जे काही कार्य केले असेल किंवा आपले शरीर थकले असेल तर हे थकलेल्या शरीराला आराम मिळतो; परंतु तुम्ही जर झोपेमध्ये घोरत असाल तर वाढलेले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण किंवा रक्तदाब हे एकदा तपासून घ्या.
हृदयाची तपासणी वेळोवेळी करून घेणे गरजेचे आहे. तसेच ईसीजी तपासणी करून घेणे आरोग्यासाठी आवश्यक असते. जेव्हा तुम्हाला हृदयाविषयी काही त्रास जाणवत असेल तर योग्य वेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या व आरोग्यपूर्ण जीवन जगा.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.