Hair Care Tips In Marathi प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की, आपले केस सुंदर काळेभोर व आकर्षक दिसावेत, त्याशिवाय लांब व घनदाट देखील असले पाहिजे. मुलीचे सौंदर्य केसांमुळे आणखीनच खुलते. परंतु आज काल वेगवेगळ्या प्रकारच्या शाम्पू केमिकल युक्त असल्यामुळे केसांची गळती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच बऱ्याच लोकांचे टक्कल देखील पडले आहे. तुम्हालाही काळे व घनदाट केस हवे असतील तर आम्ही दिलेल्या टिप्सचा उपयोग नक्की करून बघा. या पोस्टमध्ये आपण केसांचे आरोग्य आपल्याला कसे नीट ठेवता येतील याविषयी माहिती बघणार आहोत.
नैसर्गिकरित्या आकर्षक व काळेभोर केस बनवण्यासाठी खालील उपाय करा ? Hair Care Tips In Marathi
आपले आरोग्य स्वस्त राहण्यासाठी जसे योग्य आहार, योगा, फळांची सेवन करणे आपल्याला आवश्यक असते. ज्याप्रमाणे आपण आहार घेतो, त्याचप्रमाणे आपल्या शरीराला विटामिन्स प्राप्त होतात. या विटामिन्समुळे आपल्या केसांचे आरोग्य देखील स्वस्त राहते. केस गळती थांबते, केस काळे व घनदाट होतात. तर चला मग जाणून घेऊया खालील माहिती.
आजकाल तरुणांमध्ये केस गळती, अकाली केस पांढरे होणे, केसाला तेलकटपणा येणे व डोक्यात कोंडा होणे यांसारख्या समस्या सतावत आहेत. केसांचा तेलकटपणा आणि टाळू कोरडी झाल्याने होणारे नुकसान केस गळतीचे कारण बनते.
आपल्या शरीरातील पोषण आणि पाण्याची कमतरता झाल्यास केसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्या व्यतिरिक्त वातावरणाचा प्रभाव संसर्ग किंवा एखादा आजार झाल्यास देखील केसांची मोठ्या प्रमाणात हानी होते. सूर्याच्या हानीकारक किरणांच्या प्रभावामुळे देखील केसांची हानी होते.
अशातच आपण आपल्या केसांची निगा सुरुवातीपासूनच राहायला हवी. आपले केस कोणत्याही प्रकारात जरी मोडत असले तरी सौम्य शाम्पू वापरायला पाहिजे. तीव्र शाम्पूचा वापर करत असाल तर त्यापासून आपल्या टाळूला व केसांना धोका होऊ शकतो.
केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण कोणता आहार घ्यावा?
केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण समतोल आहार घेणे आवश्यक आहे. आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, दही, चिकन, सँडविच, अंडी, दूध, अक्रोड, बदाम, मोड आलेली कडधान्य तसेच विटामिन व प्रोटिन्स युक्त अन्नाचे भरपूर प्रमाणात सेवन करावे. हे पदार्थ आपल्या केसांच्या वाढीसाठी पोषक असतात.
योग्य प्रमाणात पाणी पिणे :
आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी किमान आपण रोज 8 ते 10 ग्लास पाणी पिणे गरजेचे असते. तहान लागेपर्यंत आपण पाणी पिणे थांबवणे योग्य नाही. तहान लागणं ही शरीरातील पाण्याचे प्रमाण अतिशय कमी झाल्याची सूचना देते, त्यामुळे आपण पाणी पिले पाहिजे व योग्य आहार घेतला पाहिजे.
नियमित व्यायाम योगासन केले पाहिजे :
नियमित व्यायाम किंवा योगासने केल्यामुळे आपल्याला फ्रेश वाटते, त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते व शरीराचे सर्व अवयव व्यवस्थित कार्य करतात. त्यामुळे आपल्या केसांची वाढ देखील चांगली होते. किमान दिवसातून वीस मिनिटे धावणे किंवा चांदणे यामुळे आपल्या शरीरातून भरपूर घाम निघेल. दिवसातून दोन वेळा वेळ मिळाल्यास दीर्घ श्वसन करा. यामुळे रक्ताला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतं.
केस वाढण्यासाठी घरगुती उपाय :
नैसर्गिक रित्या केस वाढवण्यासाठी आपण घरगुती उपाय नियमित केले पाहिजे.
केसांची योग्य निगा राखण्यासाठी बरेच लोक मेहंदीचा देखील वापर करतात. मेहंदीमुळे केसांना रंग प्राप्त होतो. तसेच केस घनदाट व मुलायम देखील बनतात म्हणून मेहंदी लावणे केसांसाठी फायद्याचे आहे. मेहंदी भिजवण्या अगोदर त्यामध्ये कॉफी पावडर, लिंबाचा रस, मेथी पावडर, आवळा पावडर व खोबरेल तेल घालून हे मिश्रण एका लोखंडी भांड्यामध्ये एक रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी केसांना लावून एक ते दोन तास ठेवा नंतर केस धुऊन घ्या.
कांद्याच्या रसापासून बनवलेले तेल हे केस गळतीसाठी व केस घनदाट बनवण्यासाठी उपयोगात आणले जाते. आपल्या केसांच्या लांबी व घनदाट असण्याच्या क्षमतेनुसार एक किंवा दोन कांदे बारीक कापून मिक्सरला बारीक करून त्याचा रस गाळणी द्वारे काढून घ्यावा. कांद्याचा रस कापसाच्या बोळ्याने केसांच्या मुळाशी लावावा. तेल लावून झाल्यावर तेथे दोन ते तीन मिनिटे मसाज करावी. नंतर एक किंवा दोन तासांनी केस धुवून घ्यावे.
केस काळे व आकर्षक दिसण्यासाठी मेथीचा देखील वापर फायद्याचा ठरतो. दोन चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी मेथीदाणे मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. त्यामध्ये दोन चमचे दही, दोन चमचे मध व दोन चमचे कोरफडचा गर घालून त्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करून एक हेअर पॅक बनवा. यामुळे केसांचा रंग काळा व केस आकर्षक व मुलायम होतात.
आवळा पावडरपासून केसांना लावण्यासाठी एक उत्तम प्रकारचे पॅक तयार करावे. ज्यामुळे आपले केस काळे मुलायम होतात. आवळा पावडर भिजवत असताना एक ते दोन तास भिजवत घालून त्यामध्ये लिंबाचा रस व आवळा पावडर याचे मिश्रण एकत्र करावे. हे मिश्रण केसांना लावून एक ते दोन तासांनी केस धुवावेत.
जास्वंदाची फुले व पाने केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. जास्वंदाचे चार ते पाच फुले व पाच सहा पाने घेऊन, त्यामध्ये एक चमचा एरंडेल तेल, दोन चमचे खोबरेल तेल, दोन चमचे एलोवेरा जेल एकत्र करून चांगले बारीक मिश्रण करावे. नंतर हे मिश्रण आपल्या केसांना लावून घ्यावे. हे मिश्रण एक तास केसांना लावून ठेवा नंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्या.
कोंडा जाण्यासाठी उपाय :
केसांमध्ये जर नियमित कोंडा होत असेल तर केस धुतल्यानंतर एक ग्लास पाण्यामध्ये अर्धे लिंबू पिळून घ्यावे व ते पाणी केसांना व्यवस्थित पसरून लावावे. मात्र केस धुवू नयेत. यामुळे लिंबाच्या रसामुळे रक्त प्रसादन होऊन कोंडा कमी होतो.
आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर केसांमध्ये कोमट खोबरेल तेल लावून गरम पाण्यात टॉवेल बुडवून तो घट्ट पिळून घ्यावा व डोक्याला गुंडाळून ठेवावा. त्यामुळे डोक्याला व केसांना वाफ बसते. नंतर केस धुऊन घ्यावे. यामुळे केसातील कोंडा कमी होतो.
जर डोक्यामध्ये कोंडा जास्त होत असेल तर तुम्ही वापरत असलेल्या खोबरेल तेलामध्ये एक ते दोन कापराच्या वड्या घालून विरघळून घ्याव्यात. केसांमध्ये हे मिश्रण लावून पाच ते दहा मिनिटे मसाज करावी दुसऱ्या दिवशी केस धुवून स्वच्छ घ्यावे. त्यामुळे केसातील कोंडा नाहीसा होईल. अशा प्रकारे आपण आपल्या केसांची निगा राखू शकता. आपण केस गळतीसाठी डॉक्टरांचा देखील सल्ला घेऊ शकता.
मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.