Gastric Problem Solution In Marathi बऱ्याच लोकांना जेवण केल्यानंतर पोट फुगणे किंवा पोटात गॅस तयार होणे यांसारख्या समस्यांना समोरे जावे लागते परंतु या समस्या केवळ एक किंवा दोन लोकांच्या नसून कित्येक लोकांच्या आहेत. यामागे नेमकी कारणे काय आहेत? तसेच यावर उपाय काय आहे? तर चला मग जाणून घेऊया आजच्या पोस्टमध्ये याविषयी सविस्तर माहिती.
पोट फुगणे किंवा पोटात गॅस तयार होणे यांसारख्या समस्यांनी तुम्ही त्रस्त आहात तर चला मग जाणून घेऊया त्याची कारणे व उपाय….! Gastric Problem Solution In Marathi
रोजच्या जीवनशैलीमध्ये खाणे-पिणे, मानसिक स्वास्थ्य, झोप व आरोग्य यावर दुष्परिणाम होत आहे. तसेच पोटाच्या लहान मोठ्या तक्रारी ही गंभीर स्वरूप धारण करत आहेत. या मागचे नेमके कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच व्यायामाचा अभाव अपुरी झोप, जंक फूडचे सेवन, तळलेले मसाल्याचे पदार्थाचे सेवन करणे किंवा बाहेरील जेवण जेवणे, ऑफिशियल बैठे काम यामुळे पोटाच्या संबंधित तक्रारीमध्ये बरीच वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आजकाल तरुणांमध्ये अशा प्रकारच्या विकारांचे प्रमाण अधिक आहे. पचनक्रिया चांगली नसेल तर बद्धकोष्ठ आतड्यातील जळजळ किंवा पित्त अशा प्रकारचे आजार उद्भवू शकतात.
18 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना पोटाचे आजार असल्याची संख्या सर्वाधिक आहे. बदललेल्या जीवनशैलीबरोबरच चहा, कॉफी किंवा मद्यपानाच्या अति सेवनामुळे पचनक्रियेसी संबंधित विकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चयापचय प्रक्रियेत व्यत्यय, चुकीचा आहार, मानसिक तणाव यांचा देखील परिणाम पचनक्रियेवर होतो.
प्रौढांमध्ये देखील पचन क्रियेशी संबंधित आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. जसे की गॅस, पोट फुगणे, अपचन अशा तक्रारी त्यांना उतरत्या वयात जाणवतात. जसे व्यक्तींचे वय वाढते तसतसे त्यांच्या सांध्यांची हालचाल जशी मंदावते तशीच त्यांच्या आतड्यांची हालचाल देखील कमी होते. यामुळे अन्न मार्गातून अन्न संथपणे पुढे सरकते. पोट जड होते व बद्धकोष्टाचा त्रास सुरू होतो. अन्न पचन न झाल्यामुळे पोट किंवा जठर लवकर रिकामी होत नाही, यामुळे आपल्याला भूक लागत नाही.
पोटात गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या का निर्माण होते?
पोटात गॅस किंवा पोट फुगण्याची आणखी कारण म्हणजे बऱ्याच लोकांना घाईघाईने जेवणाची सवय असते. ही सवय लवकरात लवकर बदलायला हवी कारण जेव्हा तुम्ही घाई घाईने खाता, तेव्हा तुमच्या पोटात अन्नासोबतच हवा ही जाते. ज्यामुळे पोटात गॅस तयार होतो. जेव्हा तुम्ही काही खाल तेव्हा ते हळूहळू आणि शांतपणे बारीक चावून खायला पाहिजे. यामुळे तुमच्या पोटात गॅस तयार होणार नाही.
बऱ्याचदा काही लोकांचे पोट फार फुगलेलं दिसतं. पोट फुगण्याची वेगवेगळी कारणे आहेत. पोट फुगण्याची किंवा सूज येण्याची कारण काय आहे तर जेव्हा तुमच्या पोटात गॅस तयार होते तेव्हा तुमच्या पोटात सूज येण्याची समस्या वाढू लागते. अनेकदा पोटात सूज ही चुकीच्या खाण्यापिण्यामुळे किंवा महिलांमध्ये मासिक पाळीमुळे येऊ शकते. याकडे जर जास्त दिवस आपण लक्ष दिले नाही. तर पोट फुगू शकतं. यासोबतच पाठदुखी, पोटदुखी या समस्या देखील उद्भवू शकतात. जर तुम्हाला या समस्यांपासून बचाव करायचा असेल तर तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला बदल करावा लागेल.
बऱ्याचदा पोटात सूज येणे वारंवार वाढू शकते. काही प्रकरणांमध्ये तर पोटात व्रण देखील तयार होतात. यामुळे पोटाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. कधी कधी जठराची सूज कोणतीही लक्षणं न दिसता असू शकते; परंतु काहींच्या बाबतीत पोटाच्यावरील भागात वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. पोट फुगल्यामुळे बऱ्याचदा ढेकर येणं मळमळ उलट्या होणं पोट भरलेले वाटणं इत्यादी लक्षणं आपल्याला दिसू शकतात.
जर गॅस्ट्रोइटीस जास्त प्रमाणात असेल तर पोटात रक्तस्त्राव होऊ शकतो आणि त्यामुळे घाम येणे, श्वास घेण्यात त्रास होणे, अशक्तपणा छातीत आणि पोटात दुखणे, उलट्या होणं यासारखे लक्षणे देखील जाणवतात. जर तुम्हाला वरीलपैकी कोणत्याही समस्या आठवड्या भरा पेक्षा जास्त असतील तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
बऱ्याच लोकांना जेवण झाल्यावर लगेच खुर्चीत बसून राहण्याची किंवा झोपण्याची सवय असते. पण असं केल्याने तुमच्या पोटावर सूज येऊ शकते. परंतु तुम्ही असे न करता जेवण केल्यावर थोडं फिरायला जाणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला अन्न पचायला सोपे होईल. यासोबतच तुम्ही दररोज काही वेळ पायी चालावे. यामुळे तुमचं शरीर व आरोग्य देखील फिट राहतं.
जर तुमचा पोटात सूज आली असेल तर अशा पदार्थाचे सेवन केले पाहिजे. ज्यामुळे जठराची सूज बरी होईल व त्याची लक्षणे कमी होण्यास मदत होईल. सफरचंद, गाजर, ब्रोकली, तंतुमय पदार्थ, मासे, कोंबडी तसेच कमी चरबीयुक्त पदार्थ खाणे फायदेशीर ठरते.
पोट फुगण्यापासून किंवा सूज उतरण्यासाठी काही घरगुती उपाय खालील प्रमाणे :
जर तुमचे पोट फुगल्यामुळे पोटामध्ये वेदना होत असतील तर बडीशोपीच्या बिया खाण्याची सवय लावा. या बियांमध्ये वेदना कमी करण्याची क्षमता असते. तसेच याच्यामध्ये असे काही तत्व असतात, जे अन्न पचवण्यासाठी देखील मदत करतात. बडीशोप खाल्ल्यामुळे तुमच्या पोटावर सुजन येणार नाही. बडीशोप पाण्यात उकडून पाण्याचे सेवन करावे यामुळे देखील आराम मिळतो.
अननस हे पोटाच्या समस्यांवर उपाय कारक आहे. जर तुमच्या पोटाच्या काही समस्या उद्भवल्या असतील तर अशा परिस्थितीत अननस तुम्ही नियमित खावे. जर पोट फुगले किंवा सुजले असेल जळजळ होत असेल तर तुम्हीही समस्या अननस खाल्ल्यामुळे दूर होतात.
दही खाल्ल्यामुळे पोट फुगण्याचा त्रास कमी होतो. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि हे पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असते.
आतड्यावर येणारी सूज बऱ्याच प्रकारे आल्याच्या मदतीने देखील कमी करता येऊ शकते जर तुमच्या पोटावर नेहमीच सूज येत असेल तर आल्याचे सेवन तुम्ही नियमित करायला पाहिजे. यासाठी आल्याची काही तुकडे एका कपात टाका व त्यामध्ये गरम पाणी टाका तसेच कपावर झाकण ठेवून दहा मिनिटे राहू द्या. त्यामध्ये एक चमचा मध आणि तेवढाच लिंबाचा रस टाका व त्या पाण्याचे सेवन करा. यामुळे नक्कीच तुम्हाला आराम मिळेल.
मध पोटाच्या अनेक समस्या दूर करते. पोटात सूज आली असेल तर अशा स्थितीमध्ये चमचाभर मध खा. मधामध्ये देखील अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे पोटदुखी बरी होते.
पोटाची सूज किंवा पोट फुगले असेल तर हळद खाल्ल्यामुळे देखील पोटाची सूज उतरते. कारण हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट अँटीफंगल असे गुणधर्म असतात. त्यामुळे पोटाला लगेच आराम मिळतो.
पोट फुगणे किंवा पोटावर सूज येणे यासाठी लिंबू हे सर्वोत्तम पर्याय आहे. लिंबामध्ये विटामिन बी आणि सी तसेच फॉस्फरस, कॅल्शियम व मॅग्नेशियम असतात. तसेच यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं. जे अन्न पचवण्यासाठी मदत करते. तसेच आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी एक ग्लास गरम पाण्यात लिंबाचा रस टाका व हे पाणी प्या.
तुम्हाला गॅसेसची समस्या झाली असेल तर सकाळी काही खाण्यापूर्वी थोडीशी जिरे पावडर खा. थोडेसे मेथी दाणे, हळद, हिंग व जिरे एकत्रित चूर्ण तयार करून ठेवा. जेवण झाल्यानंतर हे चूर्ण ताकात टाकून प्या. यामुळे गॅस आणि ऍसिडिटीची समस्या मुळापासून दूर होईल.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांना शेअर करा.