Fungal Infection In Marathi पावसाच्या दिवसात आपल्या आजूबाजूला खूपच आजार पसरल्याचे आपल्याला दिसून येते. जसे जुलाब, सर्दी, खोकला, ताप त्यातच पाण्यामध्ये पाय जास्त राहिल्यामुळे पायांच्या बोटांना चिखल्या होतात. ही एक प्रकारची एलर्जी आहे, जी पाण्यामध्ये राहिल्याने होते. ज्याप्रमाणे आपण इतर आजारांवर वेळीच उपचार करतो. त्याचप्रमाणे पायांच्या बोटांना चिकल्या झाल्यास त्यांचा वेळीच उपचार करणे फायद्याचे ठरते. नाहीतर पायांच्या बोटांमध्ये हे इन्फेक्शन वाढत जाते. सुरुवातीला त्यामध्ये खाज सुटते त्यानंतर त्याचे रूपांतर जखमेमध्ये होते. त्याचा हा त्रास दिवसेंदिवस वाढत जातो.
पायांना चिखल्या झाल्या…तर जाणून घ्या घरगुती उपाय Fungal Infection In Marathi
पावसाळ्यातील दूषित पाणी आणि चिखलांच्या संपर्कात पायांच्या बोटांना हे इन्फेक्शन होत असते हे जखम जरी छोटीशी वाटत असली तरी आपण याकडे दुर्लक्ष केले तर थोड्या दिवसातच खूप मोठा त्रास तुम्हाला होऊ शकतो. हा पायाचा संसर्ग लवकर लक्षात येत नाही.
सुरुवातीला प्राथमिक लक्षण म्हणजे बोटांच्या मधला भाग पांढरा पडतो व नंतर त्यामध्ये खाज सुटले नंतर रक्त बाहेर येते व इन्फेक्शन होते. अशा स्थितीत सर्वप्रथम आपण बाहेरून आल्यावर आपल्या पायांची बोटे किंवा पायाच्या चिमट्या स्वच्छ कोरड्या करून घ्याव्या. त्यामध्ये ओलावा राहाला तर इन्फेक्शन आणखीन वाढत जाईल, त्यामुळे हे कोरडे करून पुसून घ्याव्यात. जर तुमच्या पायांच्या पोटात ओलावा नसेल तर चिखल्या वाढणार नाहीत.
बऱ्याचदा आपण बाहेरून फिरून येतो व दूषित पाण्यात आपले पाय ओले होतात तेव्हा पायांच्या बोटांमध्ये चिखल अडकलेला राहतो. जरी आपण वरवर पाय स्वच्छ केले तरीसुद्धा पायांच्या बोटांमध्ये बॅक्टेरिया राहतातच. म्हणून झोपण्याच्या आधी आपण आपले पाय कोमट पाण्यात बुडवून ठेवावे. दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने नखे व लपलेले बॅक्टेरिया सर्वच स्वच्छ होतील. तर चला मग जाणून घेऊया पायांच्या बोटांची चिखल्यावर उपाययोजना.
चिखल्या कशामुळे होतात हे आपण वर जाणून घेतले आहे आता त्यावरील उपाय योजना जाणून घेऊया :
पावसाळ्याच्या दिवसात किंवा इतर वेळेत जर तुम्हाला चिखल्या झाल्या असेल तसेच त्यापासून जर तुम्हाला खूपच त्रास होत असेल तर तुम्ही तिथे एरंडेल तेल व करंज तेलाचे मिश्रण एकत्रित करून लावू शकता. तीन चमचे एरंडेल तेल व त्यामध्ये एक चमचा करंज तेल घ्या, हे मिश्रण एकत्रित करून घ्या. व दोन तेलाचे मिश्रण बोटांच्यामध्ये लावल्यास चिखल्या निघून जातील. हा उपाय दिवसातून तीन वेळा करावा.
तुम्हाला चिखल्या झाल्या असेल तर स्वयंपाकामध्ये वापरण्यात येणारे गोड तेल व आपल्या घरी विणलेली घोंगडी असते, त्या घोंगडीचा एक धागा घ्या. आता घोंगडीचा हा धागा गोड्या तेलामध्ये भिजवून घ्या व रात्रभर ज्या बोटांवर चिखल्या झाल्या आहेत, तेथे हा धागा बांधा. तसेच रात्रभर हा धागा असाच राहू द्या. त्यामुळे चिखल्या कमी होतात.
बाजारामध्ये मेहंदीची पावडर विकत मिळते ती मेहंदीची पावडर किंवा मेहंदीची पेस्ट सुद्धा घेतली तरी फक्त त्या मेहंदीमध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन नसलेले हवे. तुम्ही मेहंदीची पेस्ट तयार करून घ्या आणि रात्री पाय स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्या. आणि त्याच्यावर मेंदीचा लेप लावून द्या रात्रभर असंच राहू द्या. मेहंदी ही थंड असल्यामुळे तुम्हाला त्याचा व्यवस्थित उपाय होईल व रात्रभर ठेवल्यामुळे ती जखम सुद्धा भरून यायला मदत होईल.
बूट किंवा सॅंडल खरेदी करत असताना चवड्याकडील भाग मी मोडता न घेता चौकोनी असावा जेणेकरून पायांच्या बोटांमध्ये हवा खेळती राहील. चिखल्या झाल्या असल्यास बूट न वापरता चपला वापराव्यात. त्यामुळे पायांना हवा लागेल व इन्फेक्शन कमी होईल. जर तुम्ही बूट वापरत असाल तर त्यामध्ये सुती मोजे घालावेत. मोजे ओले झाले की बदलण्यासाठी जवळ दुसरा मोज्यांचा एक जोड शिल्लक ठेवावा. तसेच दुसऱ्यांचे बूट वापरू नयेत.
जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर दर दोन ते चार तासांनी पाच मिनिटांसाठी बूट मोचे काढून बसवावे. यामुळे पायाला घाम येणार नाही.
चिखल्या झाल्या असल्यास चिखलात जाऊ नये किंवा चिखलातून आल्यावर पाय स्वच्छ धुवावे. तसेच पायांच्या बोटाच्या चिमट्या कोरड्या करून घ्याव्यात. तसेच पावसाच्या दिवसात बोटांच्या चिमट्यांमध्ये पावडर टाकावी. ज्यामुळे इन्फेक्शन होणार नाही व पाय कोरडे राहतील.
जर तुम्हाला मधुमेह असेल आणि चिकल्याचा त्रास असेल तर तुम्ही त्याविषयी विशेष काळजी घ्यायला हवी. डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्यायला हवा. पायांच्या चिखल्यांकडे दुर्लक्ष करू नये. कारण पावसाळ्याच्या दिवसात अनेक सण येत असतात आणि त्यामध्ये आपण गोड खात असतो. त्यावेळी जर तुमची साखर नियंत्रणात राहिली नाही तर चिखली वाढू शकते व त्याचे इन्फेक्शन सुद्धा वाढू शकते.
जर तुमच्या पायांना चिखल्या झाल्या असतील आणि खूपच त्रास होत असेल तर तुम्ही तेथे खोबरेल तेल लावू शकता परंतु त्याआधी आपले पाय कोमट पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे ठेवावेत व नंतर पायांना खोबरेल तेल लावून झोपावे, हा प्रयोग रात्री करावा.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मलम, पावडर यांचा देखील तुम्ही वापर करू शकता.
सतत पाऊस पडत राहिल्यास रस्त्यांवर पाणी साचते व ते पाणी दूषित होते. त्यामध्ये अनेक प्रकारचे संसर्गजन्य किटाणू असतात. जेव्हा आपण बाहेर फिरतो, त्यातच ते किटाणू आपल्या पायांना लागून घरात येतात किंवा पाय स्वच्छ धुतले नसेल तर आपल्या पायांना चिकटून राहतात.
यामुळेच आपल्याला अनेक आजार होण्याची भीती असते व पायांना हातांना ऍलर्जी सुद्धा होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे असते. जर तुम्हाला काही उपाय करून फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.