ताप आल्यावर काय करावे जाणून घ्या त्याविषयी घरगुती उपाय…Fever In Marathi

Fever In Marathi ऋतुमानानुसार वातावरणात बदल होत राहतात. या बदलाचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत असतो. बऱ्याच लोकांना हा वातावरणातील बदल झाला की ताप, डोकेदुखी, अंगदुखी, चक्कर येणे, थरथरणे किंवा इतर काही आजार होत असतात. हे आजार ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी आहे अशांनाच होतो त्यामुळे तुम्ही नेहमी शुद्ध आणि सात्विक आहार घेतला पाहिजे. पावसाळ्यात वायरल वातावरणामध्ये जिवाणू व विषाणूंचे आगमन होते, त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. तर हिवाळ्यात सुद्धा व्हायरल इन्फेक्शन दिसून येते जसा खोकला, ताप व सर्दी. तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा असेच आजार होण्याची शक्यता असते. असंच तुम्हाला जर अचानकपणे ताप आला तर काय करावे? त्याच्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर चला मग खालील माहिती पूर्ण वाचा व तुम्ही देखील या उपायोजनांचा लाभ घ्या.

Fever In Marathi

ताप आल्यावर काय करावे जाणून घ्या त्याविषयी घरगुती उपाय…Fever In Marathi

ताप येण्याची कारणे :

ताप येण्याची काही लक्षणे आपल्या शरीरात दिसून येतात जसं घसा दुखणं खोकला डोकेदुखी घसा खवखवणे सांधेदुखी उलट्या या व्यतिरिक्त डोळे लाल होणे डोकं गरम होणे अशा प्रकारचे लक्षणे तुम्हाला दिसल्यास दिसताच डॉक्टरांकडे जाऊन इलाज करून घ्यावा किंवा मग घरगुती उपाय आपले सुरू ठेवावे.

कारण घरगुती उपाय सुरू ठेवल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करता येते यामुळे आपला ताप सुद्धा लवकर बरा होऊ शकतो. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग्य व पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते.

ताप आल्यास घरगुती उपाय :

जर तुमचा ताप 100 पेक्षा कमी असेल तर तो घरगुती उपचार करून कमी करता येऊ शकतो. रुग्णाच्या शरीरावर किंवा कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या. जोपर्यंत शरीराचे तापमान कमी होत नाही तोपर्यंत ह्या पट्ट्या ठेवणे सुरूच ठेवा. तसेच तर सहा तासानंतर पॅरासिटेमॉलची किंवा तापीची गोळी तुम्हाला जी सूट होत असेल ती घ्यावी.

ताप आल्यास धन्याचा चहा घेणे फायद्याचे ठरते कारण त्यामध्ये एंटीबायोटिक तत्व असते जे विषाणूविरोधात लढण्याची शक्ती देते. धन्यांच्या बियांमधून शरीराला विटामिन मिळते. पाण्यात एक मोठा चमचा धणे टाकून पाणी उकळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध आणि साखर टाका. नंतर हे पाणी चांगले गाळून प्या.

ताप कमी करण्यासाठी लिंबाचा रस व मध उत्तम औषधी ठरते. घशाची खवखव सुद्धा यामुळे थांबते तसेच तुम्हाला जर उलटी व जुलाब असेल तर त्यापासून सुद्धा आराम मिळतो.

ताप आल्यामुळे आपल्याला घाम येतो आणि त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी कमी होत जाते. त्यामुळे जर तुमचे शरीर हायड्रेट राहत नसेल तर तुम्हाला पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही पातळ केलेला फळांचा ज्यूस पिणे फायद्याचे ठरेल.

ताप आल्यामुळे आपले शरीर गरम होत असते. त्यामुळे साध्या पाण्याने दोन ते तीन वेळा अंग पुसणे फायद्याचे ठरते. यामुळे शरीराचे तापमान देखील कमी होण्यास मदत होते.

ताप आला असल्यास तुम्ही हवेच्या ठिकाणी बसू नका. तसेच अंगावर खूप जास्त कपडे घेऊन झोपू नका. तुम्हाला जसे कम्फर्टेबल वाटेल तसे तुम्ही त्या स्थितीत आराम करावा.

जर तुम्हाला ताप आला असेल तर तुम्ही खिचडी, सफरचंद, दूध, टोमॅटोचे सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारले इत्यादी पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा.

जास्त ताप आल्यास कपभर पाण्यामध्ये दहा ते पंधरा तुळशीची ताजी पाने घेऊन उकडून घ्या. हे मिश्रण पाच ते दहा मिनिटे उकडून घ्या व नंतर कोमट झाल्यावर गाळून प्या. हा उपाय दिवसातून तीन वेळा करा.

तुम्हाला खूप ताप आला असेल आणि त्या तापामध्ये जर थंडी वाजत असेल तर दहा मिऱ्याचे दाणे घेऊन त्यात तुळशीच्या पानांचा दोन चमचे रस घालून घ्या. हे औषध दिवसातून एकदाच प्यावे. असे आठ दहा दिवस केले म्हणजे तुम्हाला नक्की आराम मिळेल.

त्या व्यतिरिक्त दहा ते बारा मिरे बारीक करून एक वाटी पाण्यामध्ये उकळून घ्या व ही वाटी अर्धी होईपर्यंत पाण्यात उकळून घ्या. हा काढा हिवताप आल्यास दररोज दोन दोन चमचे घ्यावे, यामुळे ताप जाते.

जर तुम्हाला साधा ताप येत असेल तर अर्धा चमचा बडीशेप, पाव चमचा साखर व पाव चमचा तव्यावर भाजलेली डिकेमाली एकत्र बारीक करून घ्या. ही फूड रात्री झोपताना व सकाळी घ्या. असे आठ दहा दिवस केल्यामुळे तुम्हाला ताप येणार नाही.

ताप उतरण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा धने व सुंठीचा लहान तुकडा टाकून ते पाणी छान उकळू द्या. पाणी अर्धे राहिले की पिण्यास द्यावे, त्यामुळे लवकर ताप उतरतो.

ताप आला की खूप तहान लागते, अशावेळी एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये चार लवंगाचे बारीक केलेली पूड टाका आणि हे पाणी छान उकळू द्या. पाणी अर्धे राहिले की प्या, यामुळे तुमची तहान थांबते.

ताप आला असल्यास बेल फळाची चूर्ण खाणे फायदेशीर ठरते. बेलफळाची चूर्ण पाण्यामध्ये घालून ताप.

छोट्या मुलांना जर अचानक ताप आला असेल व तो वाढत असेल तर एक कांदा किसून त्यांच्या टाळूवर ठेवा त्यामुळे ताप उतरतो.

त्या व्यतिरिक्त साप चढला असेल तर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवल्यास ताप उतरण्यास मदत होते.

तुम्हाला आणखीन काही त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना ही शेअर करा.

Leave a Comment