डोळ्यांचा त्रास होतोय तर डोळ्यांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या…Eye Care In Marathi

Eye Care In Marathi डोळे शरीराचा खूप महत्त्वाचा अवयव असून तो खूपच नाजूक आहे. वाढत्या वयात जर आपण डोळ्यांची आवश्यक तेवढी काळजी घेतली नाही तर आपल्याला डोळ्यांचे अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे आपण आधीच योग्य ते काळजी घेणे आवश्यक आहे.

Eye Care In Marathi

डोळ्यांचा त्रास होतोय तर डोळ्यांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या…Eye Care In Marathi

तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक असते. त्याकरिता विटामिन ए युक्त आहार म्हणजेच हिरव्या पालेभाज्या, अंडे, पपई व संत्रे इत्यादींचे नियमित आपण सेवन केले पाहिजे किंवा आपल्या आहारामध्ये हे सर्व फळभाजी, पालेभाज्या यांचा समावेश केला पाहिजे.

लहान मुलांच्या डोळ्यात नेहमी पाणी येत असेल किंवा तिरडेपणा जाणवत असेल तर नेत्र विकार तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. छोट्या मुलांनी वाचायला सुरुवात केल्यास तुम्ही डोळ्यांची नियमित तपासणी करायला पाहिजे. वयाची पहिली दहा वर्ष डोळ्यांच्या वाढीसाठी खूपच महत्त्वाचे असतात. जर याच वयात डोळ्यांची वाढ चांगली झाली नाही तर हे कायमचेच कमजोर राहतात.

डोळ्यांचे आजार होण्याची कारणे :

तुम्ही योग्य आहार घेत नसाल किंवा जो आहार घेता त्यामध्ये पोषण मूल्यांची कमतरता असेल, जीवनसत्वांची कमतरता असेल विटामिन अ, ब, क ची कमतरता असेल तर तुम्हाला डोळ्यांचे आजार होऊ शकतात.

जर तुम्ही सतत टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईलच्या स्क्रीन कडे पाहत असाल तर तुम्हाला डोळ्यांचे आजार होऊ शकतात.

प्रदूषण, धूळ वाऱ्यांपासून डोळ्यांचे संरक्षण व्यवस्थित झाले नसेल तर तुम्हाला डोळ्याचा संसर्ग होऊ शकतो. किंवा एखादा संसर्गजन्य रोग तुम्हाला झाला तर त्यापासून देखील डोळ्यांचे आजार निर्माण होऊ शकतात.

डोळ्यांचे आजार :

डोळ्यांच्या आजाराविषयी बोलायचे झाले तर जगभरात तसेच भारतातही नेत्र रोगाचे अनेक पेशंट तुम्हाला दिसतील. भारतामध्ये मोती बिंदूचे प्रमाण सर्वात जास्त तसेच लघुदृष्टी, दूरदृष्टी यांचे प्रमाण सुद्धा त्या खालोखाल आहेत. डोळ्यांच्या बुबुडात फुल पडणे, काचबिंदू, डोळ्यांच्या आतील आजार तसेच इतर डोळ्यांचे अनेक आजाराचे रुग्ण भारतामध्ये आढळतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

डोळ्यांना उन्हाची झळ बसू नये म्हणून आपण विशेष काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोळ्यात जळजळ होणे, अधून मधून डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे अशा डोळ्यांच्या समस्या आपल्याला दिसून येतात. तसेच जंतुसंसर्ग होण्यापासून आपण आपल्या डोळ्यांचे संरक्षण केले पाहिजे.

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी :

डोळ्यांचे काळजी घेत असताना आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, त्यामुळे आपल्या डोळ्यांचे संरक्षण होईल. डोळ्यातून चिकट स्त्राव येत असेल किंवा संसर्गाची जर तुम्हाला लक्षणे दिसत असतील तर नेत्र तज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधांच्या दुकानातून कोणतेही ड्रॉप्स विकत घेऊन डोळ्यांमध्ये घालू नयेत.

जर डोळ्यांची आग होणे कोरडेपणा तसेच लाली आली असेल तर अशा तक्रारीसाठी ल्युब्रिकंट, डोळ्यांना थंडावा देणारे आय ड्रॉप्स डोळ्यात घातले तर चालतील परंतु एंटीबायोटिक्स, स्टिरॉईड अशा प्रकारचे घटक डोळ्यांमध्ये कधीच घालू नये. कारण बऱ्याचदा आपण उपाय म्हणून हे ड्रॉप्स डोळ्यात घालतो; परंतु त्याचा परिणाम उलटा होतो. शक्यतो तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डोळ्यांच्या साध्या स्वरूपातील समस्यांसाठी पुढील उपाय घरच्या घरी करता येतील :

तुम्हाला डोळ्यांचा कोणताही त्रास नसला तरी सुद्धा आपल्या डोळ्यांची काळजी स्वतः घ्यावी उन्हाळ्याचा दिवस असेल तर घराबाहेर जाताना गॉगल, टोपी व छत्री अशा संरक्षण गोष्टींचा तुम्ही वापर केला पाहिजे.

साध्या नारळाच्या पाण्याने तुमचे डोळे दिवसातून स्वच्छ दोन ते तीन वेळा धुतले पाहिजे.

रात्री झोपताना तसेच इतर वेळी शक्य होईल तेव्हा डोळे बंद करून त्यावर थंड दूध किंवा गुलाब जल यात भिजवलेल्या पट्ट्या तसेच काकडी किंवा कोरफडीच्या गराचे तुकडे पाच ते दहा मिनिटे ठेवले पाहिजेत.

तुमच्या डोळ्यांना उजेडापासून त्रास होत असेल तर आधीच त्यावर योग्य ती उपचार करणे गरजेचे असते. खरं तर शरीरामध्ये विटामिन्सची कमतरता झाली की, असे आजार वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे योग्य तो आहार घेणे आवश्यक असते.

शरीराला निरोगी राहण्यासाठी आपण व्यायाम करतो तसेच डोळ्यांनाही निरोगी ठेवण्यासाठी डोळ्यांच्या व्यायाम केला पाहिजे.

सकाळी सूर्योदयापूर्वी उठल्यावर मैदानात किंवा छतावर जाऊन चटाई अंथरून त्यावर झोपावे. डोळे उघडे ठेवून निळ्या आकाशाकडे पहावे. डोळे सर्व दिशांना आपण फिरवायला पाहिजे. केल्यामुळे डोळ्यांच्या समस्या काही दिवसात दूर होतील.

सकाळी उठल्याबरोबर गार किंवा कोमट पाण्याने आपण आपले डोळे स्वच्छ धुतले पाहिजे. डोळ्यांच्या पापण्याची चिपळी स्वच्छ केली पाहिजे.

आपल्या जेवनामध्ये दूध, अंडी, हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट, पपई तसेच मोसमी फळांचा समावेश केला पाहिजे. डोळे दुखत असतील तर डोळ्यांची हलकी मसाज केली पाहिजे.

डोळ्यातून सतत पाणी येत असेल तर कडू लिंबाच्या झाडाच्या पानांचा लेप डोळ्यावर लावावा. त्यामुळे डोळ्यातून येणारे पाणी थांबते व डोळ्यांना थंडावा देखील मिळतो.

दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी तरी वीस फुटांचे लांब वरची वस्तू पाहुणे आपल्या डोळ्यां करता आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही जर या नियमांचा वापर केला तर तुमचे डोळे चांगले राहू शकतात. अधून मधून डोळे बंद करून हाताने हलके झाकावे, दीर्घ श्वसन करावे.

डोळ्यांचे आरोग्य जर तुम्हाला उत्तम ठेवायचे असेल तर तुम्हीला पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या जेवणामध्ये ‘अ’ जीवनसत्वाचा समावेश करणे गरजेचे असते. जेवणामध्ये माशांचा देखील समावेश करणे आवश्यक आहे. त्यामधून डोळ्यांना योग्य ते पोषण मिळत असते. त्या व्यतिरिक्त द्राक्ष सुद्धा डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.

डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घेणे गरजेचे असते. पूर्ण झोप घेतल्यामुळे आपले डोळे सतेज राहतात. अपूर्ण झोपेमुळे डोळे कोरडे व लाल होतात. त्यामुळे दररोज पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. या सोबतच आपण झोपतो तेव्हा संपूर्ण शरीर व अवयव यांना आराम मिळतो. तेव्हा डोळ्यांची कार्यक्षमता देखील सुधारते.

अशाप्रकारे डोळ्यांचे आजार होऊ नये म्हणून तुम्ही पूर्व उपाययोजना केल्या पाहिजे.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना ही शेअर करा.

Leave a Comment