Dandruff Problem In Marathi केसांमध्ये कोंडा होणे हे सामान्य बाब आहे. ही समस्या केवळ महिलांमध्येच आहे असे नाही तर बऱ्याच पुरुषांच्या डोक्यांमध्ये देखील आपल्याला कोंडा झाल्याचे दिसून येते. परंतु या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आपण केल्या पाहिजेत. तसेच कोंडा पुन्हा पुन्हा डोक्यात येणार नाही. यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे.
केसांमध्ये कोंडा झाला… काळजी करू नका…Dandruff Problem In Marathi
जाणून घ्या केसातून कोंडा काढण्याचा घरगुती उपाय
डोक्यामध्ये कोंडा होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे त्यांची त्वचा कोरडी होते. विशेषतः हिवाळ्यामध्ये ही समस्या उद्भवते. जर तुमच्या शरीराच्या इतर भागांवर त्वचा कोरडी असेल तर हे कोंडा होण्याचे कारण असू शकते. जर केस नेहमी धुतले गेले नाही आणि त्वचेच्या पेशी टाळूमध्ये वाढू लागल्या तर त्याचे रूपांतर डोक्यातील कोंड्यामध्ये होते तसेच डोक्यामध्ये खाज सुद्धा येते. त्यामुळे नियमितपणे आपण आपले केस स्वच्छ करत राहणे आवश्यक असते.
केसांमध्ये कोंडा का होतो? तसेच त्याची कारणे कोणती आहेत? हे जाणून घेऊया :
सर्वप्रथम केसांमध्ये बुरशीचा संसर्ग होतो. डोक्यावरची त्वचा सतत ओली राहिल्यामुळे त्वचेला बुरशीचा संसर्ग होऊ लागतो. त्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. बऱ्याचदा महिला वेगवेगळ्या शाम्पू, तेल किंवा साबण इत्यादींचा वापर आपल्या केस धुण्यासाठी करत असतात.
मात्र सतत ब्रँड बदलत राहिल्यामुळे त्यांची ऍलर्जी सुद्धा तुम्हाला होऊ शकते. त्याचप्रमाणे प्रदूषणातील काही घटकांमुळे एलर्जी होऊ शकते. त्यामुळे देखील तुमच्या केसांमध्ये कोंड्याची निर्मिती होऊ शकते. बरेच तर केसांमध्ये उवा होतात अशा उवा झाल्यानंतर डोक्यामध्ये कोंडा निर्माण होतो. उवांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या घटकांमुळे डोक्यावरच्या त्वचेचे आरोग्य धोक्यात येत असते, परिणामी डोक्यामध्ये कोंडा होतो.
केसातील कोंडा घालवण्याचे घरगुती उपाय :
केसातील कोंडा घालवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपाय करू शकतात. त्यातील काही उपाय खालील प्रमाणे दिले आहेत.
सिताफळ हे सर्वांच्या परिचयाचे फळ आहे. तसेच त्या फळांमध्ये त्यांचे गुणधर्म आहेत. सिताफळाच्या बिया खूपच गुणकारी आहेत. त्या बियांचे चूर्ण करून ही पेस्ट रोज अर्धा तास केसांच्या मुळाशी लावल्यामुळे डोक्यातील कोंडा कमी होतो.
डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी तुम्ही नारळाच्या दुधाचा उपयोग करू शकता. कारण या नारळाच्या दुधामध्ये पोषक घटक असतात. त्यामुळे नारळाच्या दुधामध्ये ऑलिव्ह ऑईल याचे मिश्रण करून डोक्याला मसाज करा. त्यानंतर हे मिश्रण अर्धा तास असेच राहू द्या. त्यामुळे केस लांब रेशमी आणि चमकदार देखील होतील. हा प्रयोग आठवड्यातून दोनदा करा.
कोरफडचा उपयोग आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करू शकतो. तुम्ही केसांच्या वाढीसाठी कोरफड जेल चा उपयोग करू शकता. आठवड्यातील तीन वेळा रात्री कोरफळ जेल लावा व सकाळी उठल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या किंवा मग आंघोळीच्या दोन तास अगोदरही तुम्ही कोरफड जेल केसांना लावू शकता.
केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस हा खूप महत्त्वपूर्ण आहे. डोक्यातील कोंड्यावर तुम्ही वेगवेगळे प्रयोग करून थकला असाल तर कांद्याचा रस काढून कापसाच्या मदतीने केसांच्या मुळाशी मालिश करा. व वीस मिनिटे डोक्यात तसेच राहू द्या. डोकं कोरडे झाल्यानंतर धुऊन घ्या. आता हा प्रयोग तुम्ही महिन्यातून तीन-चार वेळा केल्यास तुमच्या डोक्यातील कोंडा नाहीसा होईल. तसेच केस सुद्धा वाढतील व लांब सुद्धा होतील. कांद्याचा रस केसांच्या मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो.
तुमच्या डोक्यातील घालवण्यासाठी तुम्ही दह्याचा वेग किती उपयोग करू शकता दही आपल्या केसांसाठी खूपच उपयुक्त असते आपल्या केसात थोडेसे दही केस धुवायच्या दोन तास अगोदर लावून ठेवा. नंतर केस स्वच्छ धुऊन घ्या. असे केल्याने आपल्याला फरक जानवेल. तुम्ही हा प्रयोग आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.
केसातील कोंडा घालवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा देखील उपयोग करू शकता. कडुलिंबाच्या पानांमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. कडूनिंबाच्या वापराने बरेच रोग दूर होतात तसेच कडुनिंबाची पाने बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा व आपल्या केसांमध्ये लावा. त्यामुळे तुमची केसातील कोंडा दूर होईल तसेच केस सुद्धा काळे होतील.
बेकिंग सोडा डोक्यातील कोंडा कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. केस शाम्पू करताना त्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून डोक्याला चांगला मसाज करा आणि नंतर डोके धुवा. यामुळे केसांच्या मुळावर अडकलेला कोंडा दूर होईल व तुम्हाला सुद्धा चांगले वाटेल.
केसातील कोंडा कमी करण्यासाठी तुम्ही तिळाचे तेल व मेथीचे दाणे देखील वापरू शकता. दोन्हीही केसांना योग्य पोषण देण्याचे काम करतात. ही पेस्ट तयार करण्यासाठी मेथीची दाणे कोरडी भाजून त्यांची पावडर बनवून घ्या. तुमच्या केसांच्या लांबीनुसार एका भांड्यात याची पावडर आणि त्यामध्ये एक चमचा तिळाचे तेल मिक्स करून घ्या. तेल जास्त घेऊ नका. काही वेळ मसाज केल्यानंतर केस अर्ध्या तासानंतर स्वच्छ धुऊन घ्या. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केला तरी चालेल.
केसांच्या वाढीसाठी पोषक बदामाचे तेल किंवा खोबरेल तेल सुद्धा चांगले आहे. तुम्ही हे तेल गरम करून केसांची मालिश केल्यामुळे सुद्धा कोंडा दूर होतो तसेच पाच चमचे खोबरेल तेलामध्ये लिंबाचा रस मिसळून घ्या आणि ते आपल्या केसांमध्ये लावा. तसेच 20 ते 30 मिनिटे राहू दिल्यानंतर केस स्वच्छ धुऊन घ्या. त्यामुळे केसातील कोंडा कमी होतो.
केसांसाठी आवळा एक वरदान आहे, त्यामुळे तुम्ही आवळा ज्यूस पिऊ शकता तसेच विटामिन सी आणि लोह यांनी समृद्ध असा आवळा अनेक प्रकारे फायदेशीर आहे. केसांमध्ये आवळ्याचा रस लावल्यास केस काळे मुलायम होतात व डोक्यातील कोंडा सुद्धा कमी होतो.
भोपळा सर्वांच्या परिचयचा आहे. भोपळ्याचा रस काढून तो आपल्या केसांना नियमित लावा. यामुळे डोक्यातील कोंडा कमी होण्यास मदत होते. त्या व्यतिरिक्त दुधी भोपळ्याचा ज्यूस देखील आपल्या शरीरासाठी पोषक आहे.
डोक्यातील कोंडा जाण्यासाठी लसूण आणि नारळाचे तेल उपयुक्त आहे. त्यामध्ये चार चमचे खोबरेल तेल घेऊन दोन चमचे लसूण तेल, एक चमचा मेहंदीचे तेल असे मिश्रण करून आपल्या केसांना लावा. तसेच हे एक तास मिश्रण डोक्याला राहू द्या व नंतर ते स्वच्छ धुऊन घ्या.
कढीपत्त्याची सात ते आठ पाने खोबरेल तेलामध्ये टाका आणि तेल कोमट होऊ द्या. यानंतर ते आपल्या केसांना लावा. यामुळे केस गळती तर कमी होते तसेच कढीपत्त्याची काही पाने भाजून घ्या. ही पाने तुम्ही वापरत असलेल्या तेलामध्ये टाका आणि रात्री डोक्याला मसाज करा. सकाळी केस गरम, कोमट पाण्याने धुऊन घ्या. यामुळे केस मजबूत होतात. तसेच केसातील कोंडा देखील कमी होतो.
केसांमध्ये साचलेली घाण तसेच दुर्गंधी काढण्यासाठी मध व लसूण तेल यांची मिश्रण करून केसांना लावावे. यामुळे केसात साचलेली घाण व दुर्गंधी बाहेर तर पडतेच तसेच खाजही सुटत नाही. वर दिलेले उपाय तुम्ही नक्की करून बघा.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.