बीपी, शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी उपाशीपोटी हे करा उपाय जाणून घ्या… Blood Pressure In Marathi

Blood Pressure In Marathi ब्लड प्रेशर आणि मधुमेह यांसारख्या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस तरुणांमध्ये झपाट्याने वाढताना आपल्याला दिसते. मात्र त्यावर आपण आधीच आळा घातला तर यांसारखे आजार आपण कंट्रोलमध्ये करू शकतो. जगाच्या तुलनेत भारतात मोठ्या प्रमाणावर मधुमेहाची रुग्ण सर्वाधिक आढळतात. यामध्ये सर्वच वयोगटाचे रुग्ण आढळून येतात. हे आजार होण्यामागे बदललेली जीवनशैली व खाण्यापिण्यातील अनियमितता यामुळेच मधुमेह होतो. मधुमेह आणि रक्तदाब वाढणे या दोन अशा गंभीर समस्या आहेत. यांच्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. ही बिमारी कोणालाही होऊ शकते.

बीपी, शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी उपाशीपोटी हे करा उपाय जाणून घ्या… Blood Pressure In Marathi

आयुर्वेदिक वनस्पती मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूपच प्रभावी आहे. मधुमेह आणि रक्तदाब यावर कंट्रोल करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील आहेत; परंतु प्रत्येकाला यश येतेच असं नाही. त्याकरता आपली जीवनशैली, खानपान व नियमित व्यायाम याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर चला मग जाणून घेऊया कोणते असे उपाय आहे. ज्यामुळे बीपी आणि शुगर दोन्ही कंट्रोलमध्ये राहू शकतात.

BP व शुगर मुळे होणारा त्रास :

ब्लड प्रेशर सारखा आजार सुद्धा खूपच त्रासदायक ठरू शकतो. तुम्ही वेळेवर रक्तदाब नियंत्रित केला नाही तर तुम्हाला श्वास घेण्यात त्रास, नाकातून रक्त येणे, डोकेदुखी इत्यादी समस्या जाणू लागतात. रक्तातील शुगर आणि ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी अनेक औषधी उपचार आहेत. त्यामध्ये बरेच नैसर्गिक उपाय देखील फायदेशीर ठरतात. मधुमेह तसेच ब्लडप्रेशर सारख्या आजारांवर घरांमध्ये आढळणाऱ्या झाडाझुडपांच्या पानांमध्ये नियंत्रित करण्याची क्षमता आहे.

मधुमेह या आजारामध्ये स्वादुपिंड रक्तातील साखर नियंत्रित करणाऱ्या इन्सुलिन संप्रेरकाचे उत्पादन कमी करते किंवा थांबवते या परिस्थितीमध्ये रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी दिवसेंदिवस वाढू लागते. त्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आपण डॉक्टरांकडे जाऊन आपली शुगर चेक केली पाहिजे.

मधुमेहाची लक्षणे :

आपल्याला जर जास्त तहान लागत असेल, लघवी जास्त लागत असेल, भूक लागत असेल किंवा लघवीमध्ये जळजळ होत असेल त्याचबरोबर थकवा वाटणे जास्त गोड खाण्याची इच्छा होणे ही सर्व मधुमेहाची लक्षणे आहेत. बऱ्याच लोकांना मधुमेह हा ऑपरेशन करण्यापूर्वी करावयाच्या शुगर टेस्टमुळे समजतो.

मधुमेह हा शरीरातील सर्वच अवयवांवर परिणाम करतो. त्यात प्रामुख्याने किडनी, हृदय, रेटिना, पायातील नसा, पायाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या या अवयवांवर जास्त परिणाम करतो.

रक्तदाब व मधुमेह यांच्यावर घरगुती उपाय :

कढीपत्ता : रक्तदाब व मधुमेह असलेल्या रुग्णांनी कढीपत्त्याचा वापर आपल्या आहारामध्ये करायला पाहिजे. कढीपत्ता फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर त्यामध्ये अनेक आरोग्य गुणधर्म आहेत. कढीपत्त्यामुळे आपली पचनशक्ती चांगली राहते. पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळते.

त्यामुळे मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी या पानांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कढीपत्त्याचा नियमित वापर केल्यामुळे इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना उत्तेजित होण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखरेचे पातळी देखील नियंत्रित करतात. कढीपत्त्याची पाने तुम्ही उपाशी पोटी देखील खाऊ शकता किंवा विविध पदार्थांमध्ये घालून देखील कढीपत्त्याची पाने खाऊ शकता.

कडूलिंबाची पाने : तुम्ही उपाशीपोटी कडुलिंबाच्या पानांचेही सेवन करू शकता. कडुलिंबाचे पाने आरोग्यदायी आहे. दररोज कडूनिंबाच्या पानाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर कडुलिंबाची पाने खाणे अत्यंत पौष्टिक आहे. कडुलिंबाचा रस किंवा कडूलिंबापासून तयार झालेली कॅप्सूल जर तुम्ही महिनाभर घेतली तर उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. याशिवाय तुम्हाला अनेक रोगांपासून देखील वाचवते.

तुळस : तुळस ही औषधी वनस्पती असून आपल्या शरीराला अनेक रोगापासून वाचावते. रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे टाईप 2 सारख्या मधुमेहापासून देखील आपला बचाव होऊ शकतो. तुळशीची पाने दररोज खाल्ल्यामुळे हृदयरोग देखील कमी होतो.

लसूण : लसुन खाल्ल्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहते. तसेच दर दोन लसणाच्या पाकळ्या खाल्याने शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यास मदत होते. दररोज लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्यामुळे ब्लड प्रेशर देखील कंट्रोलमध्ये राहते.

नियमित व्यायाम : नियमित व्यायाम करणे हे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य निरोगी राहण्याची लक्षण आहे. त्यामुळे आपण नियमित व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्यामुळे शरीर ऍक्टिव्ह राहतं. त्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रित राहतो व शरीरातील शुगरचे प्रमाण देखील नियंत्रणात राहतं. त्यामुळे तुम्ही दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे व आपल्या जेवणात फायबर्स असलेल्या पदार्थांचा समावेश करा.

ब्लूबेरीची पाने : आयुर्वेदामध्ये मधुमेह हा रोग नियंत्रित करण्याकरिता ब्लू बेरीची पाने वापरली जातात. ब्ल्यूबेरीच्या पानांमध्ये रक्तातील शर्करेची पातळी कमी करण्याची क्षमता आहे. ब्लूबेरीच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात ॲथोसायनिडीन असते. यामुळे ग्लुकोज ट्रान्सपोर्टेशन आणि फॅट मेटॅबॉलिझम साठी प्रोटीन वाढण्यास मदत होते.

दालचिनी : दालचिनीमुळे इन्सुलिनचे संवेदन क्षमता वाढते व रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते.
दररोज अर्धा चमचा दालचिनी पावडर खाल्ल्यामुळे इन्सुलिनची क्षमता वाढवून वजन नियंत्रित राहते. हृदयविकाराचा त्रास देखील कमी होतो.
दालचिनीमुळे इन्सुलिनची संवेदनक्षमता वाढून रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. दररोज अर्धा टिस्पून दालचिनीची पावडर खाल्याने इन्सुलिनची संवेदनक्षमता वाढून वजन नियंत्रित राहते. हृदयविकाराचा त्रास कमी करण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे.

ग्रीन टी : ग्रीन टी मध्ये पॉलीफिनॉल हा घटक मोठ्या प्रमाणात असतो. ज्यामुळे रक्तातील शुगर नियंत्रणात राहते.

बडीशोप : रोज जेवणाच्या नंतर बडीशोप खाण्याची सवय बऱ्याच लोकांना असते. ही सवय खूप चांगली आहे. डायबेटीस असणाऱ्या व्यक्तीनी तर रोजच बडीशोप जेवण झाल्यानंतर खायला पाहिजे. यामुळे डायबिटीस नियंत्रणात राहते.

जांभूळ : जांभळामध्ये ग्लायकोसाईड हा घटक असतो. तसेच जांभळाच्या बिया देखील शुगर कंट्रोल मध्ये करण्यात सक्षम आहेत. जांभळातील काही घटकांमुळे हृदयविकार व रक्तवाहिन्यासंबंधी आजार दूर होतात.

कारले : कारल्यामध्ये इन्सुलिनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे रक्तातील शर्कराचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते कारले मधुमेहांसाठी अतिशय उपयुक्त असून त्यामध्ये कॅरोटीन आणि मोमुर्डीसीन हे घटक रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात येण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी किंवा आठवड्यातून तरी एकदा कारल्याची भाजी खावी तसेच कारल्याचा रस देखील तीन दिवस उपाशी पोटी घेतल्यामुळे शुगर लवकर कंट्रोल मध्ये येते.

जर तुम्हाला थंड पेय प्यायची सवय असेल तर ती आजच बंद करा. कारण पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण तसेच सोडा कोल्ड्रिंक यामध्ये कृत्रिम फ्लेवर्स असतात. जे शरीरासाठी घातक असतात. त्यानंतर शरीरासाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे जास्तीत जास्त पाणी तिने खूप गरजेचे आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जाण्यास मदत होते. आम्ही या पोस्टमध्ये घरगुती उपचार म्हणून दिले आहे. जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ला घ्या.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांना शेअर करा.

Leave a Comment