तुम्ही सुद्धा उपाशीपोटी हे पदार्थ खाताय तर सावधान…! Be Careful If You Also Eat These Foods On An Empty Stomach In Marathi

Be Careful If You Also Eat These Foods On An Empty Stomach In Marathi हवामानामध्ये नियमित बदल होत असतात. हे बदल मानवी शरीराला मानवत नाही. त्याकरिता मानवी शरीराची प्रकृती ही निरोगी असणे किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे असते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण काय खायला पाहिजे. जेणेकरून आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल व विविध वातावरणाचा सामना करण्याची सुद्धा शक्ती निर्माण होईल.

Be Careful If You Also Eat These Foods On An Empty Stomach In Marathi

तुम्ही सुद्धा उपाशीपोटी हे पदार्थ खाताय तर सावधान…! Be Careful If You Also Eat These Foods On An Empty Stomach In Marathi

तर जाणून घ्या त्याविषयी सविस्तर माहिती

जर तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत नसेल तर तुम्हाला विविध रोगांचे संक्रमण होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत आपले शरीर निरोगी ठेवले पाहिजे. एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती जर कमी झाली किंवा कमकुवत असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कोणकोणती लक्षणे दिसू लागतात हे थोडक्यात जाणून घेऊया.

शरीरामधील आम्लाचे प्रमाण वाढवणारे म्हणजेच ऍसिडिटीत निर्माण करणारे पदार्थ आपण रिकाम्या पोटी खाणे टाळले पाहिजे. ऍसिडिटी निर्माण करणारे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर त्याचा आतड्यांवर ताण पडतो. अशा पदार्थांमुळे आतड्यांना आतील बाजूने संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

बरेच लोक असे आहेत की, जे आपल्या आरोग्याबाबत खूपच दक्ष असतात, ते निरोगी शरीरासाठी अनेक गोष्टी करतात. तसेच काही लोक निष्काळजी सुद्धा असतात. परंतु शरीर निरोगी राहण्यासाठी सकाळी उठणे गरजेचे आहे तसेच सकाळी उठून अंकुरलेले धान्य किंवा सुकामेवा रिकाम्या पोटी खातात. बरेच लोक उपाशी पोटी चहा घेतात किंवा फळे खातात; परंतु तुम्हाला हे माहित आहे का? उपाशी पोटी काय खाऊ नये याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो.

रिकाम्या पोटी काही पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्यावर कोणते वाईट परिणाम होतात.

बरेच पदार्थ असे आहेत की, जे आपण उपाशी पोटी खाऊ नयेत. तसेच त्या पदार्थांचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

टोमॅटो : टोमॅटो हे असे आहे, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात आम्ल असते आणि टोमॅटोचा उपयोग जर तुम्ही उपाशीपोटी केला तर तुमच्या शरीरामध्ये ऍसिडिटीचे प्रमाण जास्त होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला छातीत जळजळ किंवा विविध समस्या निर्माण होऊ शकतात. टोमॅटो जास्त खाल्ल्यामुळे पोट दुखी आणि गॅसेस सुद्धा होऊ शकतात.

लिंबूवर्गीय फळ : लिंबूवर्गीय फळ म्हणजे लिंबू संत्री मोसंबी या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात ॲसिड असते. त्यामुळे रिकाम्या पोटी जर हे फळ खाल्ली तर याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. जर तुम्हाला आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर तुम्ही आंबट पदार्थांचे उपाशीपोटी सेवन करणे टाळावे.

सोडा : सोडायचे सेवन तुम्ही उपाशी पोटी करू नये. कारण सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोनेट ऍसिड असते. जेव्हा हे ऍसिड पोटातील ऍसिड बरोबर एकत्रित मिसळते, त्यावेळेस पोटदुखीची समस्या निर्माण होते तसेच रिकामी पोटी जर तुम्ही सोडा पिला तर तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून रिकाम्या पोटी सोड्याचे सेवन कधीही करू नका.

थंड पेय : उपाशीपोटी थंड पेय पिणे शरीरासाठी घातक ठरू शकते. त्या व्यतिरिक्त कार्बोनेट थंड पेय हे तर शरीराला अतिशय घातक ठरते. कारण अशा पेयाचे आपण उपाशीपोटी सेवन केले तर पचनशक्ती मंदावते आणि अन्नपदार्थ पोटात जश्याच्या तसेच राहतात किंवा कुजण्यास सुरुवात होतात. त्यामुळे अपचनाच्या समस्या निर्माण होतात.

पेअर फळ : आपण उपाशीपोटी अनेक फळे खात असतो; परंतु आपले पोट रिकामे असते. त्यावेळी जर आपण पेयर फळ खाल्ली तर त्याचा आपल्या आतड्यांवर वाईट परिणाम होतो तसेच आतड्यांच्या आतून पेशीवर घातक परिणाम होतो व आपल्या पेशी निकामी होतात म्हणून पेयर फळं रिकाम्या पोटी खाणे चांगले नसते.

कच्च्या भाज्या : रिकामे पोट असेल त्यावेळी कच्च्या भाज्या किंवा सॅलड यांचा उपयोग करणे टाळावे. तुम्हाला सेलर किंवा कच्च्या भाज्या खायच्या असेल तर आधी काहीतरी खाऊन घ्यावे. नंतर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. नाहीतर तुम्हाला पोटदुखी किंवा हृदयरोग होऊ शकते.

केळी : केळी उपाशी पोटी खाणे आरोग्यासाठी हितकारक नाहीत कारण तुम्ही जर उपाशी पोटी केळी खाल्ली तर आपल्या शरीरातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा समतोल बिघडतो म्हणून उपाशी पोटी केळी खाऊ नये. जर तुम्हाला उपवास असेल तर रिकाम्या पोटी केळी खाऊ नये.

मसालेदार पदार्थ : मसालेदार पदार्थ रिकाम्या पोटी कधीही खाऊ नये कारण तुम्ही जर मसालेदार पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ले तर तुमचे पोट खराब होऊ शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

कोल्ड्रिंक : सकाळची सुरुवात कधीही थंड पेयाने करू नये. असे केल्यामुळे तुमच्या पचन क्रियेमध्ये बिघाड होऊ शकतो.

दूध आणि केळी : उपाशीपोटी दूध आणि केळी खाणे तुमच्या पोटात अपचन आणि गॅस तसेच ऍसिडिटी ची समस्या निर्माण करू शकतात त्यामुळे दूध आणि केळी उपाय खाणे टाळले पाहिजे.

गोड पदार्थ : उपाशी पोटी अतिशय गोड पदार्थ खाणे टाळले पाहिजे पोटात जर काही नसेल तर साखरेचे पदार्थ आपल्या शरीराला हानिकारक ठरतात जसे मिठाई साखर च्या पाकात असणारे पदार्थ, चॉकलेट, जेली साखर लावलेले बर्फी असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. साखरेचे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला डायबिटीस होऊ शकते.

दही : दही उपाशी खाणे टाळले पाहिजे. कारण दह्यामुळे सुद्धा ऍसिडिटी वाढू शकते. त्यामुळे दही सकाळी शक्यतो उपाशी पोटी खाणे टाळावे.

ओट्स : जर तुम्हाला कॅलरीयुक्त हाय न्यूट्रेऐन्ट फूड खायचे असेल तर तुम्ही ओट्सचा सर्वोत्तम उपयोग करू शकता. हा नाश्ता तुमच्या करिता सर्वोत्तम आहे. तसेच तुम्ही उपाशीपोटी सुद्धा हा नाश्ता करू शकता. त्यामुळे तुम्ही वजनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.

अंडी : सकाळच्या नाश्तामध्ये तुम्हाला जर भरपूर प्रोटीन घ्यायचे असेल तर तुम्ही अंडी खाऊ शकता. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला आमलेट किंवा अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी अंड्याचा सेवन केल्यामुळे दिवसभर पोट भरल्यासारखं वाटत असेल दिवसभरात तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा देखील राहते.

पपई : पपई हे अत्यंत पोषक फळ असून प्रत्येक ऋतूमध्ये तुम्हाला मिळू शकतात. हे फळ तुम्ही नाश्तामध्ये खाऊ शकता. आपण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होते. तसेच हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात.

भिजवलेले बदाम : सकाळी उठल्यावर भिजवलेल्या चार ते पाच बदाम रिकाम्या पोटी खाणे आरोग्य दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. बदाम खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला फायदे होतात. त्यामध्ये अमेगा 3, अमेगा 6 तसेच फायबरचा महत्तम स्त्रोत असतो. त्यामुळे तुम्हाला सकाळी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.
सकाळी बदाम खात असताना तशी साली काढून खाल्ली तर ते अधिक फायदेशीर ठरते. रिकाम्या पोटी खावेत. हे बदाम खाताना त्याची सालं काढून फायदेशीर ठरते.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment